दास्तान एका (खरड) वहीची...
हे लेखन पुर्णपणे काल्पनिक असून त्याचा वास्तवातल्या कुठल्याच गोष्टीशी कोणताही संबंध नाही. या लेखाचा शेवटचा बराचसा भाग वाचताना मिपाच्या कुणा सन्माननिय सभासदाची खरडवही जशीच्या तशी उचलून इथे चिकटवली आहे असे वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
ही गोष्ट आहे आमच्या सोसायटीतल्या दोन लहान मुलांची. खरं तर एका लहान मुलाची आणि एका लहान मुलीची. मुलाचं नाव गणनायक आणि मुलीचं नाव सुखदा. गणनायक आमच्या सोसायटीच्या बी विंगमधल्या नातलग काकांचा मुलगा. तर सुखदा आमच्याच ए विंगमधल्या कुलकर्णी काकांची मुलगी. गणनायकला खरं तर सारी सोसायटी तसेच आमच्या शाळेतील मुलं गण्या म्हणूनच हाक मारतात.
मिसळपाव