कन्नथिल मुथ्थुमित्ताल ( २००२) ... राष्ट्रीय पुरस्कारविजेता चित्रपट
लेखनप्रकार
कथा पटकथा आणि दिग्दर्शन मणिरत्नम....
हम्म्म....
दहशतवादाच्या आणि हिंसेच्या पार्श्वभूमीवरच्या प्रेमकथा मणिरत्नमने यापूर्वी रोजा ( १९९३) , बॊम्बे ( १९९५) आणि दिल से ( १९९८) बनवल्या होत्या. त्यातला रोजा आवडला होता ( अगदी डायरीत मणिरत्नमची नोंद करून ठेवली होती.. मॆन टू बी वॊच्ड :) म्हणून ) आणि दिलसे ठीकठाक वाटला होता... शेवट भलताच गुंडाळल्यासारखा वाटला होता..
बर्याच वर्षांपूर्वी एका मित्राने मला या "कन्नथिल मुथ्थुमित्ताल" सिनेमाबद्दल सांगितल होते, कोणत्यातरी फेस्टिवलमध्ये त्याने पाहिला आणि बघच म्हणाला होता....
मणिरत्नम आणि तामिळ दहशतवाद वगैरे म्हटल्यावर मी तोंडदेखले बरं बरं असे म्हटले होते... आता टेररिस्ट मंडळी , त्यांच्यात अडकलेला सामान्य माणूस किती निराळ्या पद्धतीने दाखवणार असं आपलं मला वाटत होतं.... पण काल चित्रपट पाहिल्यावरती आपली तर बोलतीच बंद झाली... अप्रतिम सिनेमा आहे...
( ... टाईम मासिकात आलेल्या सत्यघटनेवरून या सिनेमाची प्रेरणा घेतली आहे... एका अमेरिकन कुटुंबाने त्यांच्या दत्तक मुलीची खरी आई शोधण्यासाठी फिलिपाईन्सपर्यंत प्रवास केला, अशी काहीशी ती कथा होती)
थोडक्यात कथा अशी...
चेन्नईमध्ये राहणार्या एका लेखकाला (आर. माधवन)आणि त्याच्या बायकोला ( सिम्रन) तीन मुले , त्यतली अमुधा ( कीर्तना) ही नऊ वर्षांची.... तिच्या नवव्या वाढदिवसाला तिचे वडील तिला सांगतात की ती त्याची मुलगी नाही, तिला दत्तक घेतले आहे. मुलीचे भावविश्व टोटल गंडते. आपली खरी आई कोण? आपल्या आईने आपल्याला का सोडून दिले असेल असे प्रश्न तिला सतावायला लागतात... आई शोधण्यासाठी मुलगी स्वत:च प्रयत्नाला लागते , ते पाहून मुलीसाठी तिचे दत्तक आईवडील तिची खरी आई शोधायचे मान्य करतात... त्यांना अर्थात खर्या आईचे नाव आणि श्रीलंकेतले एक गाव इतकेच ठाऊक असते. पुढे सुरू होतो, तुटपुंज्या माहितीवरचा श्रीलंकेतला प्रवास.....
हा सिनेमा दहशतवादावर काहीच स्टँड घेत नाही असा काहींचा आक्षेप आहे.. ( मला काही असे वाटले नाही... गोष्ट एका नऊ वर्षे वयाच्या मुलीची आहे, तिच्या आईला शोधण्यासाठी केला गेलेला प्रयत्न आणि त्यांची होणारी भेट इतकाच आहे...
२००२ च्या या सिनेमाला ६ राष्ट्रीय पारितोषिके मिळाली.
रजत कमळ उत्कृष्ट प्रादेशिक सिनेमा, संगीत ( रहमान) , गीत ( वैरामुथु), बालकलाकार ( कीर्तना) , सिनेमॅटोग्राफी ( रवि के चंद्रन).......
हॅप्पी फ्यामिली
माझी आई कुठाय?
मी तुला तुझ्या आईकडे घेऊन जाईन
प्रवास
आई सापडली??
ल्यापटापावर पाहतानाही सिनेमेटोग्राफी भारी वाटत होती, थिएट्रात तर काय होत असेल? बालकलाकार कीर्तना अप्रतिम.... मणिभाऊ पोरांकडून मस्त काम करून घेतात...
आप्ली सिम्रन ( पूर्वी फ़क्त हिच्यावर आम्चा फ़ार जीव ..टायपातली कामं करताना पाहिली होती...इथे ती चक्क उत्तम अभिनय करते)... रहमानचं संगीत नेहमीप्रमाणेच मस्त..... शिवाय या सिनेमात दलपती, रोजा,गुरू सारखं म्हातार्या खेडुत बायांचा नाच नाहीये ते एक बरं आहे....... दोन तीन गाणी अजिबात अनावश्यक... आम्ही पुढे ढकलून पाहिली... जालावर एका पाश्चात्य मानवाचे परीक्षण वाचले... तो म्हणतो ,'सिनेमा आवडला पण मध्ये मध्ये म्यूझिक व्हिडिओसाठी इतका वेळ थांबतात का देव जाणे..." :)
हा पिक्चर सोडून आपण ऑस्करसाठी २००२ साली देवदासला पाठवले हे समजल्यावर मन भरून आले.... ( ०१ साली लगानला बक्षीस न दिल्यामुळेच ज्यूरी मंडळींची खोड मोडण्यासाठी असा लांबुळका सिनेमा पाठवला असावा , असे एक मत वाचले. :) मज्जा आली.. )
या सिनेमावर एका दत्तक मुलांसाठी काम करणार्या एन्जीओमधल्या एका ताईंनी प्रचंड शिव्या घातलेल्याही वाचल्या... ( हा सिनेमा पाहून आईवडील मुले दत्तक घ्यायला घाबरतील , यात दत्तक कोणाला घता येते यासंबंधी अपूर्ण माहिती आहे , वगैरेवगैरे त्यांचे आक्षेप होते...... चित्रपट पाहताना काही असे वाटले नाही, हे खरे...
चुकवू नये असा हा सिनमा आहे...
जरूर बघा...

वाचन
14199
प्रतिक्रिया
28