नाहीश्या होत चाललेल्या पाककृती
नमस्कार मंडळी,
आज एक लेख वाचता वाचता "धनगरी मटणा"चा उल्लेख पाहीला. मी आंतरजालावर शोधूनही पाहीलं पण त्याबद्दल माहीती काही मिळाली नाही. (कुणाला ठाऊक असेल तर नक्की द्या...). मग मनात आलं की आपल्या प्रत्येकाच्या घरातही आई-आज्जी असेच काही पदार्थ बनवत होत्या, अगदी निगुतीने नी सीझनल जसे डिंक-मेथीचे लाडूंचा रूबाब तो हिवाळ्यातच आणि आंब्या-फणसाच्या पदार्थांचा मान उन्हाळ्यात...
असाच माझी आई हिवाळ्यात एक धिंडे म्हणून प्रकार बनवायची , तो ज्वारी आणि मेथ्यांपासून बनतो...अतिशय वेळखाऊ पण इट'स वर्थ वेटिंग फॉर एवरी सिंगल मिनट अस्सा...ज्वारी ३ दिवस भिजत घालून मग मिक्सरमध्ये वाटायचं, आईतर म्हणे माझी आज्जी ते पाट्यावर वाटायची...मग ते गरगट....हो गरगटच, मला तर वाटतं की 'गरगट' हा शब्द या पिठावरूनच आला असावा...तर मग हे वाटलेलं गरगट शिजवायचं नी दुसर्या दिवशी डोश्यांसारखे धिंडे बनवायचे...धिंडे गरम असतानाच त्यावर बारिक चिरलेला गूळ घालून २ मिनीटे गरम तव्यावरच ठेवायचं नी मग ताटात दुधासोबत घेऊन ओरपायचे...हे लिहीतानाही तोंडाला पाणी सुटतंय...
अस्सेच अजून एक असायचे ते नागपंचमीचे दिवे...तेही ज्वारीपासूनच बनत... कांडलेल्या ज्वारीमध्ये थोड्याश्या तांदूळकण्या, गूळ, किसलेले खोबरे, वेलची, जायफळ घालून वाफवलेले दिवे...अहाहा...अतिशय सुंदर दुधाळ-मधाळ चव असलेले हे दिवे साजूक तुप घेऊन गरम गरमच खायचे, तसे शिळेही छानच लागत...पण अतिशय परफेक्ट गोडपणा...आणि साजूक तुपासोबत खाताना त्यांची चव अश्शी काय लागे की विचारूच नका...आम्ही भावंडं गरम गरम दिव्यांवर घट्ट तुप टाकत असू, ते तुप वितळलं की सुर्रकन घसरगुंडीवरून घसरल्यासारखं वाटे...मस्त असाच तुकडा मोडायचा दिव्याचा नी तुपाचा ओघळ कोपरापर्यंत कां जात असेना पण तोंडात गेला पाहीजे या ईर्षेने खायचा...
एकादश्या, महाशिवरात्री या दिवशी तर नेहमीपेक्षा जास्त चंगळ असते, म्हणतातच ना "एकादशी नी दुप्पट खाशी"...साबूदाण्याची खिचडी, स्पेशली याच दिवसाकरिता बाबांनी आणलेले पेण-खजूर, साबूदाण्याच्या चकल्या- पापड्या, घरी बनवलेले बटाटा वेफर्स,साबूदाणा-बटाटा पापड, काय काय नी काय काय पण एक वेगळीच ओळख असलेला पदार्थ असायचा तो म्हणजे बोरोनी...हवं असल्यास शुध्द भाषेत "बोरावणी" म्हणा पण मी तर बोरोनीच म्हणणार....गावठी बुटकी, गोलमटोल नी हमखास आंबट असणार्या बोरांपासून बनवतात हा पदार्थ, ही बोरं तशी आंबटच असतात पण बोरोनी तर गोड-आंबट अशी मस्त चट्ट चट्ट करत खायची असते...बोरं भिजवून त्यांना २-३ शिट्ट्या मारतात मग त्यात मीठ आणि गूळ घालून उकळी आणतात पण खरी चव लागते ती शिळ्या बोरोनीची...आई आदल्या दिवशी नाही बनवायची कारण आम्ही बोरोनी संपवणार याची तीला फुल्ल ग्यारंटी होती...मग ती सकाळी-सकाळी बोरोनी बनवून लपवून ठेवायची नी संध्याकाळी भगर-आमटीसोबत द्यायची...पातेलंभर बोरोनीमध्ये मुठभर कच्चे शेंगदाणे असत...अहाहा!!! काय सुंदर चव असते की मला शब्दांमध्ये लिहीताच येत नाहीये...तर ही बोरोनी, आई तर मोठ्ठं पातेलंभर बनवून ठेवायची पण जास्त द्यायची नाही म्हणे जास्त खाल्ल्याने तिकडे ;) जास्त जावं लागतं... :D पण आम्ही विचार करायचो की गेल्यावेळी तर आम्हाला असं काही झालं नव्हतं... :) आम्ही कसले ऐकतोय, मग दुसर्या दिवशी आई दुपारी झोपली की तिन्ही भावंडं फ्रिजमधनं वाट्या पास करायचो... ते पण चोरांसारखं पायाचा आवाज न करता, वाट्या बाहेरच्या नळावर धूऊन चकाचक परत जागच्याजागी .... :D
पावसाळ्यातली हमखास ठरलेली भाजी म्हणजे टाकळा आणि त्याची भजी...लहानपणी आम्ही चारजणं बजाजच्या स्कूटरवर....चार जणं म्हणजे गाडी चालवणारे बाबा...त्यांच्यामागे लहान भाऊ, त्याच्यामागे बहीण आणि सगळ्यात मागे मी...अणि अश्शीच सेम टू सेम माझ्या मामाची स्कूटर....अस्सा लवाजमा निघायचा तो सरळ शिळफाट्याच्या डोंगरावर...तिकडे काय मस्त टाकळ्याची भाजी मिळे म्हणून सांगू...आणि लगेहाथों शंकराचं दर्शनही करायचो..मला तर शंकरापेक्षा त्या मंदिराच्या बाजूच्या तळ्यातल्या माश्यांमध्येच भारी इंटरेस्ट होता...त्यांना ब्रेड टाकला की ते उड्या मारून ब्रेड खायचे...खुप मज्जा वाटायची...आणि देवाकडे मागून मागून काय मागणार तर "देवा मला चांगल्या मार्कांनी पास होऊदे" एव्हढंच... :) . नंतर तिकडेच असलेल्या गोठ्यांमधून चीकाचं दूधही आणायचं खरवसासाठी आणि त्यासाठी आईने दिलेला एक मोठ्ठा कडीचा स्टीलचा डब्बा, टाकळ्याची भाजी असलेल्या दोन प्लास्टीकच्या पिशव्या...स्वारी निघाली लंडनला च्या थाटात काहीतरी मोठ्ठं काम फत्ते केल्यासारखं घरी येत असू...त्या स्कूटरवर तोल सांभाळताना उडणारी धांदल नी काय काय...आज आठवलं की काय ठ्ठो करून हसायला येतं...आजही आम्ही भावंड एकत्र जमलो की लोळून लोळून हसतो...
मग ओट्यावर पेपर पसरवून भाजी निवडण्याचा प्रोग्रॅम व्हायचा, तेव्हा बर्याच नातेवाइकांचे स्वभाव समजायचे, आता कसं ते नका विचारू... :D, मग दोन-चार दिवसांनी कधीतरी दुपारी आई टाकळ्याची भाजी करायची, मस्त शाळेतून येताना पावसात ओलं होऊन आलं की गरम गरम पाण्याने हातपाय धूवून ऊन-ऊन वरण भात तुपासोबत टाकळ्याची भाजी, बनवायला अत्तिशय सोप्पी...कांदा, लाल तिखट, मीठ आणि तुरीची डाळ घालून केलेली...खर्या चवीला कशाचीच गरज लागत नाही त्याचं हे अगदी सुंदर नी चविष्ट उदाहरण आहे...
व्वा, मस्त म्हणत म्हणत मस्त आळस देऊन ताणून द्यावीशी वाटे पण रप्पाटेच पडत...कारण एकच.... "अ भ्या स"...तरीही आम्ही "थंडी वाजतेय"चं कारण सांगून चादर जवळ घ्यायचोच आणि थोड्यावेळाने सरकत सरकत झोपत असूच ती बाब अलाहिदा... :D ....तर अशी ही टाकळ्याची भाजी बहूधा दुपारीच होत असे कारण बाबांना ही भाजी म्हणजे पावसाळ्यात उगवलेलं गवत वाटे आणि भजी म्हणजे अगदी उलट, बहुधा त्यांना अजून्ही माहीत नसावं की भजी टाकळ्याची होती :D ... बारिक चिरलेली टाकळ्याची भाजी, भिजवून भरड वाटलेले तांदूळ,मीठ नी बारिक वाटलेली मिरची...यांपासून बनवलेली भजी म्हणजे स्वर्गसुख आणि त्यातही बाहेर रिपरिपणारा पाऊस पाहीजेच नाहीतर अख्ख्या लव्याजम्यासहीत शिळफाट्याला गेल्याची मेहनत पाण्यातच गेली म्हणायची...
आज नेहमीपेक्षा घरची आठवण जास्तच येत आहे कारण इकडे पाउस पडत आहे नी अगदी मनापासून वाटतंय की आलं-गवतीचहा घातलेला चहाचा आयता कप मिळावा, या वर्षी ना धिंडे खायला मिळाले ना दिवे ना टाकळ्याची भाजी...बोरोनी मिळू शकेल बहुतेक,जर पुढच्या वर्षी भारतात गेलोच तर आणि तिकडून येताना बोरं ठेवायला बॅगेत जागा असलीच तर...
तुमच्याही आयुष्यात असतीलच की अश्या आठवणी आणि पाककृती ज्या आता "कोणाकडे वेळ आहे" या कारणाखाली नाहीश्या होत आहेत...तर नक्की सांगा...
आहो मी तर तुमच्याकडच्या पाककृत्या टंकायला सांगितल्या होत्या...खुप कमी सदस्यांनी लिहील्या आहेत....
दिपाली :)
वर्गीकरण
आठवणींच
सुंदर!!!
डिसेंट आणि
In reply to डिसेंट आणि by टारझन
+१
In reply to +१ by मीनल
+२
आयला!
वा वा! अगदी
मस्त..
धोंडस
In reply to धोंडस by चिरोटा
धोंडस..
गव्हाचा चीक
भारी
In reply to भारी by चित्रा
अजून काही
In reply to अजून काही by चित्रा
+१
In reply to +१ by मिसळभोक्ता
:)
In reply to :) by चित्रा
+१
In reply to +१ by सहज
खारात
In reply to खारात by गणपा
आणखी एक,
फक्कड!!
सुपर!
सुंदर
मस्त ग
फार
on the similar lines
मी तर