Skip to main content

उद्धव-राजने एकत्र का यावे ?

लेखक आम्हाघरीधन यांनी सोमवार, 17/05/2010 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
उद्धव-राजने एकत्र का यावे ? एकाच घरातील दोन व्यक्ती महाराष्ट्राचे 'राज'कारण अन स'माज'कारण ढवळुन काढ्त आहेत. वेगवेगळ्या माध्यमातुन एकमेकांवर शरसंधान करण्याची संधी शोधत असतात. कुणी रक्तदानाचे महात्म्य वर्णन करतो........कुणी खादाडांवर टिका करतो. कुणी पाणीचोरांवर टिका करतो...... ह्या सर्व गोष्टीची सवय झालेलो आम्ही मात्र अस्वस्थ होतो यांच्या एकत्र येण्याच्या बातमीने..... आपणाला काय वाटते?

मृगजळ

लेखक शैलेन्द्र यांनी सोमवार, 17/05/2010 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
लवचिक अंतर जरी निरंतर,हळवे आपुले नाते ख़ास, जवळ येईना दूर जाईना, तरी सुखावे खोटा भास. भासामागे धावत जाता, मनात हीरवळ पायी आग, बेधुंदित ना दाह जाणवे, स्वप्नी राहो नकोच जाग! अशी बंधने हलके धागे, वार्‍यावरती फिरती विरती, कधी हव्याश्या कधी नकोशा, गाठी त्याला आपसुक पडती, नसता गुंता - ओढातान, अडकत जाते आपली मान, तुला दुखावे मला दुखावे, असे मोकळे अंतर छान! अनामिक हे भाव असुदे, अनाम असता अर्थ अपार, अस्फुट राहो गुज मनीचे, का द्यावा शब्दांना भार, तुला कळावे मला कळावे, असो वेगळा अर्थ तयांस, कुरवाळु हे मृगजळ र्‍हदयी, सत्याहुनही सुखद भासं...

कानुन का बेटा...!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 17/05/2010 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
"कानुन का बेटा" "मै हर काम कानुन के दायरेमें रहकर करता हूं! कोइ गुनाह भी करता हूं तो इस तरह की कानुन कि कोइ भी दफा उसे गुनाह ना कह सके! कानुन की दफाओंके बीच सुरंग बनाकर कानुन को भी इन्साफ दिलाता हूं मैं! लोग मुझे कानुन का जादुगर कहते है... मगर मै हूं "कानुन का बेटा!" हिंदीचं वेड शाळेत असल्यापासुनच होतं, कदाचित त्यामुळेच वैकल्पिक भाषा म्हणून संस्कृतच्या ऐवजी हिंदी घेतली होती. अगदी दहावी - बारावीलादेखील हिंदीला ९५ च्या पुढे मार्क होते. पुढे पुढे जसे हरिशंकर परसाई, प्रेमचंद, शैल चतुर्वेदी, अशोक चक्रधर हे वाचनात येत गेले तसे हिंदीचे वेड अजुनच वाढत गेले. कॉलेजला आल्यानंतर मात्र टेस्ट बदलत गेली.

सचिनचं ट्विटर वरून कर्करोगपीडीत मुलांना मदतीचं आवाहन

लेखक बहुगुणी यांनी सोमवार, 17/05/2010 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्याच आवाहनानंतर सचिनच्या आवाहनास प्रतिसाद देऊन त्याच्या चाहत्यांनी ६७ लाख रुपये जमा केले आहेत. Indiacancer.org या पूर्वी टाटा हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणार्‍या आणि सध्या मुंबईच्या लीलावती हॉस्पिटल मध्ये असलेल्या डॉ. जगन्नाथ यांनी चालवलेल्या संस्थळाच्या माध्यमातून ही मदत जमा होत आहे.

धनाची पेटी.... ?

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 17/05/2010 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
धनाची पेटी.... ? `धवल क्रांती' हा शब्द जिथे रूढ झाला, त्या गुजरातेच्या शेजारी, पंजाब, हरियाणामध्ये एक भीषण सामाजिक समस्या केव्हापासून थैमान घालते आहे. ती दूर करण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि सामाजिक भान असलेल्या संघटना कधीपासून अक्षरश: झगडताहेत. पण होतेय उलटेच. या समस्येचे हातपाय देशभर पसरतायत. यातून एक भयावह भविष्य रुजते आहे, याची जाणीवही सगळ्यांना आहे. या समस्येवर पुरेशी जनजागृती झाली नाही, असेही नाही. कदाचित, ही समस्या इथे कधीतरी डोके वर काढणार, याची चाहूल आपल्या पूर्वजांनाही कित्येक वर्षांपूर्वी लागली असावी, म्हणूनच, तेव्हापासूनच या समस्येच्या जाणीव जागृतीला सुरुवात झाल्याचे पुरावे सापडतात.

(गढूळगावचा तिरंदाज)

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 17/05/2010 08:50 या दिवशी प्रकाशित केले.
अध्याऋत डांबरट दंगल खाज गढूळगावचा तिरंदाज ----- पोरासोरा पिसाट दंगा शर दिनी-दिनी आभास गंगा ----- घासावारी मिपात्र अंकन संबंधाला बादरायण चर्वण निर्वेसण रसाळ खादन चौदश छेदरी कडकड टाळीधून ----- अक्षयबाला जपीजे माळा ऋषीजटा आणि बिरुदाला वामन उत्तुंग पूज्य चौघडा गढूळगावी शून्य बावडा
काव्यरस

मिळेल का?

लेखक स्पंदना यांनी सोमवार, 17/05/2010 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
मन्डळी माफ करा . पण ही विनन्ती कोणत्या सदरात लिहावी या कन्फुजन मध्ये मी स्वत: आहे. मग विचार केला कवीता सन्दर्भात असलेली विनन्ती याच ठिकाणी करावी. मला "सायन्काळची शोभा " कवी कदाचीत भा.रा.ताम्बे नक्की आठवत नाही. आणि "चन्दन" ही कवी क्रु. ब. निकुम्ब या दोन कवीता हव्या आहेत. जमल तर द्याल?

आपण काय खातो ...

लेखक अडाणि यांनी सोमवार, 17/05/2010 06:50 या दिवशी प्रकाशित केले.
खाणे आणि त्याचे आपल्यावर होणारे परीणाम हा मोठा विस्तृत विषय आहे. ह्या अनुषंगाने लेख लिहायचे बरेच दिवस मनात होते पण जमून येत नव्हते. नुकताच मिपा वर आलेला शिल्पा चा लेख आणि त्यातील प्रतिक्रिया वाचून शेवटी लिहायला सुरूवात केली... आपण खातो ते अन्न , त्याचा आपल्या शरीरावर, मनावर होणारा परीणाम आणि मुख्य म्हणजे अन्नप्रक्रीयेच्या ओद्योगीकरणामुळे होणारे परीणाम ह्यावर बरेच संशोधन झालेले आहे. ह्या (आणि अजून बर्याच) विषयातील तज्ञ डॉ. पीटर सींगर हे आहेत.

डुडुळगावचा गोलंदाज

लेखक शरदिनी यांनी रविवार, 16/05/2010 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नी निवडू धुडूम्म गाज डुडुळगावचा गोलंदाज तोराबोरा ओमरसामा काय ललाटी ओ ओ मामा गोलाबारी सुसूत्र ताडन रुजुवातीला करूण धावन शोषण भीषण पोषण वेसण धवल गिटारी कडकड मंथन तित्तिरबाला ग्रंथीलाला ग्रसनी जिव्हा कुरूप भोला यमनाला घालू तेलघडा हाका बिचारी मुकी चिडा
काव्यरस