असाही एक अनुभव
स्थळः बंगलोर च्या जवळचे एक छोटेसे गाव
काळः हल्लीचाच
वेळ : सायंकाळी पाच्/सहा
घसा फारच खवखव करायला लागला लवंग घ्यावी म्हणून एका दुकानात गेलो.
भोवताली ज्या वस्तु दिसल्या त्यात लवंग वगैरे काहीच नव्हते.
लवंगेला कानडी/ तमिळ भाषेत काय म्हणतात या बद्दल एकूणच अज्ञान.
आता दुकानदाराला लवंग द्या या साठी काय म्हणायचे याचा विचार सुरु झाला
मी इंग्रजीत क्लोव्ह दे असे म्से म्हणालो.
क्लोव्ह चा उच्चार दुकानदाराने काहीतरी भलताच घेतला असावा.
त्याने दुकानातल्या कामगाराला काहीतरी आणायला पिटाळले.
कामगार कसलेतरी कडधान्य घेऊन आला.
मी नकार दिल्यानन्तर दुकानदार आणखी काही धान्ये दाखवू लागला.
असे पाच सहा वेळा झाल्यानन्तर मी क्लोव्ह चे स्पेलिंग लिहून दिले. दुकानदार आणखीनच बुचकळ्यात पडला
त्याने तो कागद कामगाराला दाखवला. कामगार ते स्पेलिंग कोणत्या डब्यावर दिसते ते पाहू लागला.
शेवटी मी लवंगेचे चित्र काढले.
कामगाराने तत्परतेने लवंग आणली.
मी दुकानादाराला विचारले " याला कन्नड मध्ये काय म्हणतात"
दुकानदार म्हणाला "लवंग"
याद्या
4079
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
हा हा
मी एका
खलास
गुजराथी
म्हणून नेहेमी मराठीतच बोलावे
आरारारारा
+ १ हेच आले मनात!
In reply to आरारारारा by टारझन
हेच माझ्या
In reply to आरारारारा by टारझन
शेवटी मी
टार्झन
आईशप्पथ,
अनुभव सहीच....
हा हा हा
बेष्ट... __________
जबर्या........
हॅ हॅ हॅ ...