दु:ख आता फार झाले
दु:ख आता फार झाले
स्वप्नही लाचार झाले
दु:ख आता फार झाले
झोपलेले ते निखारे
जाग येता गार झाले
झुंजण्याची वेळ येता
शौर्य-धैर्य बिमार झाले
झुंजणारे वीर खंदे
आरशांचे हार झाले
खेळ येथे माकडांचे
या भुईला भार झाले
पान कोरे अक्षरांना
सांगते आचार झाले
बांधलेली भोवताली
भिंत होती दार झाले
उत्तरांना पेलताना
प्रश्नही बेजार झाले
“अभय”तेच्या ’त्या’ नशेचे
बंद आता बार झाले
...............गंगाधर मुटे...........
मिसळपाव
स्वातंत्र्यविर विनायक दामोधर सावरकर यांना ईग्रजांनी दुस-या जन्मठेपेची शिक्षा सुनावली तो दिवस म्हणजे ३० जानेवारी १९११ आज ३० जानेवारी २०११ रोजी त्याला १०० वर्षे पुर्ण झाली, स्वातंत्र्यासाठी दोनवेळा जन्मठेप भोगणा-या स्वां.सावरकरांना विनम्र अभिवादन.
१ जुलै १९०९ रोजी मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायलीला ठार केले, त्यानंतर नाशिक मध्ये २९ डिसेंबर १९०९ रोजी अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर ऑर्थर मेसन जॉक्सन याला गोळ्या घालुन ठार मारले ब्रिटीशांनी या दोन्ही घटनांचे खरे सुत्रधार म्हणुन स्वा.सावरकरांना १३ मार्च १९१० (रविवार) रोजी इंग्लंडच्या व्हिक्टोरीया स्टेशनवर अटक क