Skip to main content

तारुण्य ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 20/01/2011 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
तारुण्य किती मस्त असते एक छान कविता असते तारुण्य म्हणजे सळसळनारा कल्लोळ असतो बेदम असा उत्साह असतो मस्तीचा एक डंख असतो डंख मारण्याची डंख घेण्याची हीमत म्हणजे तारुण्याचा कैफ असतो तारुण्याला नसतो भविष्यकाळ नसतो भूतकाळ त्याला असतो फक्त वर्तमानकाळ भूतकाळाने तो नाही मन रिझवत तो जगत असतो आजची स्वप्ने आणि ठाऊक असतात उद्याची बहाणे तारुण्य पाखराच्या मस्तिसारखे असते फुलपाखरासारखे झुलत असते काय करू नि काय नको त्यांचे मस्त एक गाणे असते तारुण्यात असते आभाळावर मुठ उगारण्याची हिम्मत कोठल्यातरी ध्यासाने त्यांचे मन जाते झिंगत काविता सुद्धा जमून जातात अस्सल मस्त टिकून राहतात जन
काव्यरस

भविष्य / ज्योतिष वगैरे वगैरे वगैरे

लेखक बंडू यांनी गुरुवार, 20/01/2011 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
१. युयुत्सु ह्यांच्या भविष्य अथवा ज्योतिष शास्त्र पद्धती प्रमाणे ते कोणताही तोडगा अथवा उपाय करायला सांगत नाहीत. आणि एकूणच त्यांची पद्धती ही प्रचलित लोकप्रिय पद्धतींपेक्षा वेगळी दिसत आहे. त्यानी ही पद्धत नीट मराठी भाषेत समजावून सांगितली तर कदाचित होणारे गैरसमज टळतील. २.अ. युयुत्सु ह्यांचा देव आणि धर्म ह्या गोष्टीशी संबंध नसल्याने ते हा मुद्दा मान्य करतील असे नाही. परंतु ज्या गोष्टींचे कारण आपल्याला समजले नसेल त्या गोष्टी बहुधा नशीब अथवा प्रारब्ध ह्यावर ढकलल्या जातात.

सावलीतला कोलाहल

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 20/01/2011 07:11 या दिवशी प्रकाशित केले.
रोज संध्याकाळी फ़िरून परत येण्याच्या वाटेवरच शॉप अ‍ॅन्ड सेव्ह सुपरमार्केट आहे. त्यामुळे अचानक लागलेले किंवा अचानक आठवलेले वाणसामान तिथून आणण्याची सोय आहे. एकदम मोठी यादी वगैरे बनवून दोन तीन आठवड्यांचे सामान जरा दुरच्या मार्केटमधून आणून टाकलेले असतेच. तरीही वाटेवर हे जास्त वर्दळ नसलेले दुकान दिसले, की पाउले तिकडे उगाचच वळतात. मग आलोच आहोत तर माझे उगाच अबरचबर खादाडीचे जिन्नस टोपलीत टाकणे, त्यावर चित्राचे ठरलेले भाष्य ऐकणे वगैरे प्रसंग नेहमीचेच. आज देखील हा मराठीतला प्रेमळ संवाद ऐकून तिथे नेहमी दिसणारी चायनीज म्हातारी मंदसे हसली.

पंतप्राधान ?????

लेखक चिंतामणी यांनी गुरुवार, 20/01/2011 02:04 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच एक (खरेतर शिळी) बातमी वाचनत आली. धक्का बसला. धक्का आपले पंतप्रधान, जे उच्च विद्या विभुषीत आहेत, ते रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते, त्यांनी अशी प्रतिक्रीया द्यावी??????????? http://news.in.msn.com/national/article.aspx?cp-documentid=4817477 (तिनही भाग वाचा)

!!!!!!! पहिला नंबर असा हि , तसा ही !!!!!!!

लेखक jaydip.kulkarni यांनी गुरुवार, 20/01/2011 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वीच बातमी वाचली कि कॅट च्या परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थी अव्वल ठरले , वाचून खूप आनंद झाला . पिढ्यानपिढ्या नोकरी हेच सर्वस्व मानणारा मराठी समाज आता कात टाकतोय असं वाटू लागलं . पण या बातमीचा आनंद व्यक्त करतो तेवढ्यात आणखी एक बातमी आली कि सलग दहाव्या वर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्यात महाराष्ट्र अव्वल ........ ! नकळत जाणवले कि उंच भरारी मारताना आपण आपली जमीन विसरतोय ! क्षणात मन विषण्ण झालं . ज्या राज्याचा कृषिमंत्री केंद्रात आहे त्याच राज्यावर ही वेळ यावी यापेक्षा दुर्दैव ते काय .

तीन प्रकारचे डेव्हलपर्स

लेखक शुचि यांनी गुरुवार, 20/01/2011 01:08 या दिवशी प्रकाशित केले.
व्यवस्थापनाबद्दलचा विशेसषतः संगणक क्षेत्रातील व्यवस्थापनाबद्दल खूप मस्त लेख वाचनात आला. यामध्ये कोणत्याही आय टी कंपनीमधील डेव्हलपर्स ची प्रमुख ३ व्यक्तीमत्वे अधोरेखित केलेली आहेत. त्यांचा कंपनीवर होणारा परीणाम आणि दुष्परीणाम टाळण्याचे उपाय सुचविले आहेत. लेख मूळातून वाचण्यासारखा आणि उल्लेखनिय आहे. प्रथम व्यक्तीमत्व - वेठीस धरणारे डेव्हलपर्स या पठडीत येणारे डेव्हलपर्स हे बरेचदा स्ट्रॅटेजिक प्रॉड्क्टवरती अनेक मुख्य निर्णय स्वतःचे स्वतः घेतात मग भलेही त्यांना परवानगी असो वा नसो.

शेवयांचा उपमा

लेखक स्वाती दिनेश यांनी गुरुवार, 20/01/2011 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- २ वाट्या शेवया, १ लहान कांदा, २ हिरव्या मिरच्या,मीठ चवीनुसार, १लहान चमचा साखर २ लवंगा, एक दालचिनीचा तुकडा,काजूचे तुकडे,२ वाट्यांना थोडे कमी गरम पाणी ,लिंबू,नारळ, कोथिंबिर, फोडणीसाठी- तेल,कढिलिंब, जिरं, मोहरी, उडदाची डाळ कृती- शेवया कुस्करा आणि तांबूस भाजून घ्या व एका ताटलीत काढून ठेवा. तेल गरम करुन जिरं, मोहरी, हिरव्या मिरच्या, कढिलिंबाची पाने,उडदाची डाळ, लवंगा, दालचिनी अशी खमंग फोडणी करा. नंतर त्यात कांदा तांबूस होईपर्यंत परता.काजूचे तुकडे घालून परता. आता त्यात गरम पाणी घाला.मीठ व साखर घाला व उकळू द्या. चांगली उकळी आली की त्यात भाजलेल्या शेवया घाला.