Skip to main content

आवर्तन.....

लेखक स्पंदना यांनी मंगळवार, 18/01/2011 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी नमस्कार. राधेची व्यक्तीरेखा मला नेहमीच भुरळ घालत आलेली आहे. जरी काव्य समजल तरी या व्यक्तीरेखेला त्या काव्यातही कुठेच पुर्णत्व वा 'न्याय' म्हणता येइल तो नाही मिळालेला अस मला मनापासुन वाटत. इतक जीव ओवाळुन टाकुन , सर्वस्वाला विसरुन केलेल्या प्रेमाला, पुढे कृष्णाच्या वाढत्या सामाजिक,राजकिय महत्वात अगदी नामोनिशाणी न राखता अनुल्लेखात विलीन व्हाव लागण हे एक दुर्दैवच नाही का? नुकताच प्राजुचा 'वनराणी....' वाचला. या शबरीच्या भोळ्या भक्तीवर भाळुन तिला पुढील जन्मी पुन्हा भेटण्याच आश्वासन श्रीरामानी दिले, तीच ही राधा! या वचनावर आधारित ही कविता.
काव्यरस

[खुलासा] एकोळी धागे

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 18/01/2011 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
एकोळी धाग्यांचे मिसळपावावर एवढे वावडे का आहे कळायला मार्ग नाही. एकोळी धागा अनेक कारणांनी निघू शकतो. - फेसबुक वर असलेल्या स्टेटस आणि लिंक च्या सुविधा या एकोळी धाग्यांशी साधर्म्य दाखवतात. त्याच धर्तीवर माझे एकोळी धागे असतात. यात फार मोठा अपराध आहे असे मला वाटत नाही. मिसळ्पाव हे फेसबुक नाही असा युक्तीवाद काहीजण करतील पण पुण्यात गाडी चालवायची ज्याना सवय आहे ते मुंबईत (सहसा) पुण्यासारखीच गाडी चालवतात आणि त्याउलट मुंबईत गाडी चालविणारे पुण्यात गोंधळून जातात. - फालतु चर्चा टाळायला कमीत कमी शब्दात माहिती शेअर करणे मला श्रेयस्कर वाटते.

वनराणी..२

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 18/01/2011 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
वनराणी १ आज.. काहीतरी विपरीत घडलं. मला उशिर झाला की मातंग ऋषी लवकर आले ध्यान धारणेसाठी?? .. आज झाडलोट करून कुटीमध्ये आले.. तर पाठोपाठ हे ऋषी!!! प्रसन्न चेहरा.. धारदार नाक.. आश्वासक डोळे, जटा पाठीवर सोडलेल्या... विलक्षण तेजस्वी रूप!! माझी कुटी उजळून निघाली. एका भिल्लिणीच्या घरी असा योगी!!! हा योगायोग होता की नशिबाचा भाग? ********************** पुढे.. मी नुसतीच बघत राहिले त्यांच्याकडे. असं वाटतंय की मला माझा मार्ग मिळाला आहे. ती अज्ञात शक्ती म्हणजे हे मुनी तर नव्हेत!! आज.. हो आज..

माझ्या शेतावरचे काळे ढग...!!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 18/01/2011 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
कठीण होत चाललेय सगळे हे शेताचे बहरणे आता गायब झालीय विहिरीतील मोटेचे पाणी बैलाच्या गळ्यातील घुन्गारांचा लडिवाळ आवाज शेती नापीक दाखवून न.अ करीत चाललेत खूपशे शेतात बंगले बांधून दिवाळी साजरी करू लागलेत आपली माणसे हिरवळीचा स्वर्ग होत चाललाय नर्क बैलगाडीच्या पायवाटा पुसून गेल्यात कधीच नि फटफटीचा चाक्राळलेला रस्ता तयार झालाय संपन्नता आलीय डोक्यावर ह्या छोट्याशा खेड्यात फड लागतोय एखाद्या नारायणगावच्या तमाशाचा बहकून गेलेत श्रीमंत शेतकर्याचे ही पोरे स्टार हॉटेल शेतात काढण्याच्या विचारात जातात ही पोरे स्वप्नात हरवून शेतकर्यांच्या पासोड्या हरवून गेल्यात पैश्याच्या थैल्या घेऊन उडवल्या जा
काव्यरस

वैशाख छाया

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 18/01/2011 06:39 या दिवशी प्रकाशित केले.
कोण्या सुस्त दुपारी असता भानू धरा जाळीत कोणी अर्ध जागृत पहुडले कोणी सुरा ऐकीत रस्ते एकले झळा झेलीता पसरुनी सुस्तावले छाया किंचीत कुठे तरी तिच्या उष्म्याने ताडीयले झिजल्या पायतणाला ओढीत महिला फ़ळे घेउनी भिजल्या पदराशी घट्ट धरुनी शिरभार सांभाळुनी संत्री घ्या संत्री वदे अविरत आवाजही चिरकला घर्मे अंग पाणी ते निथळता शुष्कावला कि गळा नसे मुळीच जाणीव तिजला नव्हती भूक तहान विकतील का फ़ळे थोडी, घरी निजले बाळ लहान संत्री संत्री स्वरांमुळे उघडले गृहद्वार कोणी तरी निद्रा नष्ट झाली यास्तव तो वदिला क्रोधित स्वरी भाव काय बोल गे झडकरी का झोप तू मोडिली संत्री स्वस्त चांगलीही नसता घेणार नाही मु
काव्यरस

कलम, आज उनकी जय बोल - रामधारी सिंह दिनकर

लेखक शुचि यांनी मंगळवार, 18/01/2011 04:40 या दिवशी प्रकाशित केले.
जालावर भटकत असताना अतिशय गेय अशी एक कविता माझ्या वाचनात आली. वीररसाने ओथम्बलेली ही रचना हिंदीतील नामवंत कवी "रामधारी सिंह दिनकर" यांची असून खाली उधृत केलेली आहे. अनाम ,नामवंत, अमर, लहान, थोर अशा स्वातंत्र्यवीरांना ही कविता अर्पण केलेली आहे. पहीले कडवे चटका लावणारे आहे आणि ते वाचत असताना भगतसिंग, राजगुरु, चाफेकर बंधूंची आठवण झाल्याखेरीज रहात नाही. "जो चढ़ गये पुण्यवेदी पर लिए बिना गर्दन का मोल।" हे वाचतानाच काळजात चर्र होते. दुसर्‍या कडव्यातील रुपक अप्रतिमच आहे.

सान्डग्याची आमटी

लेखक मुलूखावेगळी यांनी सोमवार, 17/01/2011 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
ही सान्डग्याची आमटी माझी फेवरेट आहे मह्नुन मी ती इथे शेअर करत आहे सान्डगे- वाळवनातला १ प्रकार आहे बाहेर किराना दुकानात पन मिळतात. साहित्य- १ कान्दा मध्यम चिरुन घ्यावा. १०-१५ लसनाच्या पाकळ्या निवडलेल्या आनि बारीक केलेल्या किन्वा पेस्ट आनि १/२ इन्च आले ठेचलेले १ वाटी सान्डगे २- मोठे डाव तेल जिरे,मोहरी,हिन्ग्,तिखट्,मीठ्,मसाला. जेवढे लागेल तसे १ वाटी सान्डगे त्यात १ मोठा डाव तेलात तळुन घ्यावे.