Skip to main content

विवाहबाह्य संबंध आणि वैवाहिक स्थैर्य : नवे संशोधन

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 28/10/2010 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
एकनिष्ठते मधून प्रेम सिद्ध होत नाही. अधिक वाचण्या साठी इथे भेट द्या... http://timesofindia.indiatimes.com/life-style/relationships/man-woman/E…

वाचने 21151
प्रतिक्रिया 108

प्रतिक्रिया

काहिच्या काहिच... ह्या ईंग्रजी वर्तमानपत्रांना असले काही छापण्यात विषेश रस असतो.. ते ईतकं सिरीअसली घ्यायचं नसतं. ठीक आहे घेतले तर घेतले, पण लगेच त्याचा धागा बनवून ईथे मिपावर लटकवायचाही नसतो.. लटकवले तेही एकवेळ ठीक, पण त्यात स्वतःचे काय विचार आहेत, काय मत आहे हे तरी जोडावं ना ? एक फुटकळ धागा... अशीच याची संभावना खेदाने करावी लागत आहे..

In reply to by पंख

एका वृत्तपत्रान बाबतच्या सर्वेक्षणानुसार 'TOI' पांचटपणाच्या बाबतीत अग्रस्थानी आहे. आणि याउपर हि विक्री पृथ:करण करणाऱ्या तज्ञांनी शेरा दिलाय कि नको त्या चर्चा, भडक छायाचित्रे यामुळेच हा पेपर जास्त चालतो. 'द हिंदू ' या वृत्तपत्राला सर्वोत्कृष्ट दर्जाचे इंग्रजी दैनिक म्हणून या सर्वेक्षणामध्ये गौरवण्यात आले आहे.

तुम्ही याकडे 'फुट्कळ धागा' म्हणून बघता तसे मी बघत नाही. वर नमूद केलेलं संशोधन प्रवाहाच्या विरुद्ध् मत नोंदवते. त्यातून निसर्गाच्या नियमांबद्दल आदर व्यक्त होतो म्हणुन माझे लक्ष त्याकडे गेले.

In reply to by Nile

निसर्गात कपडे असतात. अस्वले, फर असलेले प्राणी म्हणजे अजुन काय आहे? कपडे काढून ठेवता येतात आणि परत तसेच घालता येतात. माझ्या माहीतीत असे (किंवा कसलेच ;) ) अस्वल नाही जे थंडी संपल्यावर हायबरनेशन मधून बाहेर येते आणि काय उकाडा होतोय म्हणत फर काढून ठेवते, जमल्यास पाण्यातून खळबळून काढून वाळत टाकते आणि नंतर ते धूतवस्त्र म्हणून परत घालते. :-) तुम्हाला माहीत असल्यास अवश्य सांगा.

In reply to by विकास

तुमची कपड्यांची वाख्या थोडीशी मॉडर्न आहे, पण तरीही काही प्राणी त्यांचे कपडे कमी जास्त करतात. कपडे हे निसर्गापासुन संरक्षणाचे साधन आहे ही सोपी आणि सरळ व्याख्या आहे असे मला वाटते. ते जर मान्य असेल तर हिवाळ्यात जाड फर असलेले आणि उन्हाळ्यात ते तेच फर त्यागुन पातळ करणारे प्राणी निसर्गात आहेत तसेच उन्हाळ्यात जास्तीचा(हिवाळ्यासाठीचा) पिसारा त्यागणारेही पक्षी आहेत असे वाचल्याचे आठवते, संदर्भ शोधुन देतो.

In reply to by Nile

आता तुम्ही कपड्यांची पण व्याख्या करणार तर! ;) अहो कपडे हे परत परत घालता येतात का नाही? का डिस्पोजेबल असतात?

In reply to by Nile

म्हणजे लज्जा हे प्रमुख कारण आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का? असे कसे वाटले? माझे वाक्य काय आहे?
अहो कपडे हे परत परत घालता येतात का नाही? का डिस्पोजेबल असतात?
म्हणजे इंग्रजीत "reuse" आता लोकं अनेक गोष्टी reuse करतात ते काय लाज वाटते म्हणून का? :)

In reply to by विकास

निसर्ग आणि मानव ह्यात तुलना केलीत ना तुम्ही? मग रीयुझ हा मुद्दा असेल तर मग फक्त कपडे इतकेच संकुचित रहायचे कारण नाही. निसर्गात रीयुझ आहे का? (तुमच्या मुळ प्रश्नात नाही असे तुमचे प्रतिपादन आहे.) इतपत बरोबर आहे का? मग चर्चा पुढे चालवुयात.

In reply to by Nile

युयुत्सुंचा मुद्दा होता की ते "निसर्गाचे नियम जास्त श्रेष्ठ असतात" असे मानतात. म्हणून मग म्हणले निसर्गाच्या नियमात कपडे बसत नाहीत तर ते मग तो नियम पण मानणार का. थोडक्यात युयुत्सुना तो प्रश्न त्यांच्या मताच्या संदर्भात विचारला ज्यात तुम्ही कपडे आणि फर आणि अस्वल वगैरे मधे आणलेत. (आता युयुत्सुपण तुमचाच आयडी असल्यास गोष्ट वेगळी). म्हणून तुम्हाला अस्वलाच्या अंगावरील फर आणि कपडे यातील फरक कळण्यासाठी म्हणून reuse हा शब्द वापरला. बाकी मूळ प्रश्नाला उत्तर युयुत्सुंकडून त्यांच्या नियमांच्या मतासंदर्भात अपेक्षित आहे.

In reply to by विकास

तुम्हाला युयुत्सुंकडुनच उत्तर हवे असल्यास तुमच्या प्रतिसाद-प्रणयात हड्डी बनल्याबद्दल क्षमस्व. ;-) (ह. घेणे) निसर्गाचे नियम आणि कपडे यातील संबंध मला तरी अजुन कळलेला नाही. असो.

अहो ती फ्रेंच बाई तिच्या पुस्तकाचा( Men, Love, Fidelity) खप वाढवतेय.गेल्या वर्षी ह्याच बाईची बातमी इथे होती-http://www.telegraph.co.uk/news/worldnews/europe/france/6908022/Husband… सुट्ट्या येताआहेत, तेव्हा हे सगळ्या गोष्टींचे मार्केटिंग चालु होणारच.जगात सतत दु:ख घेवून जगणार्‍या व्यक्तींच्या मुलाखती घेवून मी पण संशोधन करु शकतो.

ज्या देशामध्ये सेक्स पार्लर हि कन्सेप्ट official आहे त्या देशा साठीच हे विचार शोभतात, आणि त्यांना अशीही सवय आहेच अनैसर्गिक गोष्टी नैसर्गिक म्हणून इतरांच्या माथी मारायची. आपणही मग मुर्खासारखे ३७७ वगैरे कायदे काढतो.

In reply to by मालोजीराव

तुमचे नैसर्गिक आणि अनैसर्गिक विषयीचे फण्डे चुकीचे आहेत याची जाणीव करुन देऊ इच्छितो.

In reply to by मालोजीराव

तुमचे नैसर्गिक आणि अनैसर्गिक विषयीचे फण्डे चुकीचे आहेत याची जाणीव करुन देऊ इच्छितो.

In reply to by युयुत्सु

पशु आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीप्रमाणे वागतात. आणि मनुष्य हा एकच असा प्राणि आहे ज्याने संस्कृति तयार केली आहे. माणूस आणि पशु यांच्यात हा एक मोठा फरक आहे. त्यातूनही काही माणसे विकृतीकडे वळतात. प्रवृत्ति, संस्कृति आणि विकृती यातून ज्याला जे भावतं आणि परवडतं ते त्याने निवडावं!

In reply to by पैसा

"पशु आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीप्रमाणे वागतात. आणि मनुष्य हा एकच असा प्राणि आहे ज्याने संस्कृति तयार केली आहे. " माणुस हाही शेवटी प्राणीच आहे(तुम्ही "पशु" ज्या अर्थी म्हणालात तो अर्थ अभिप्रेत नसल्याने मी तो शब्द टाळतो) , त्याने निर्माण केलेली तथाकथीत संस्कृती ही इतर काही नसुन प्रकृतीच्या(निसर्गाच्या) नियमांना (व अकांक्षांना) काही एका साचात बसवण्याचा केलेला प्रयत्न आहे. हा साचा जर अती घट्ट केला तर त्यातुन विकृती तयार होते. म्हणुन तो वारंवार मोडुन नवा बनवावा लागतो. जे समाज हे करतात त्यांची संस्कृती बदलती राहुनही टिकुन राहते. स्त्री पुरुष संबधाबद्द्ल म्हणाल तर वंश सातत्याची आदीम ईच्छा ही प्रकृती, सतत बदलती विवाहसंस्था व तीचे नियम ही संस्कृती, व तिच आणी तिच अंतीम सत्य हे समजणे ही विकृती. स्त्री पुरुष संबन्धात बळजबरी सोडता(सर्व प्रकारची) इतर सारे प्रकार नैसर्गीक समजायला हवेत.

मला एक सांगा..कोण ती फ्रेंच बाई तिला पहिजे तस लिहिते..त्या ड्बड्या टाईम्स मधे छापुन येते. तुम्हाला वैयक्तिकदृष्या हा विचार पटतो का?पटला तर तुम्ही ठेवणार का बाईला?? नसेल पटत तर मग हा खटाटोप कशासाठी???

In reply to by Dhananjay Borgaonkar

पटला तर तुम्ही ठेवणार का बाईला??
मला हा प्रश्न जाम आवडला. बाई ठेवणे म्हणजे बाजारातून एक जुडी कोथिंबीर आणण्यासारखे सोपे असते असे वाटते का लोकांना. (हे धनंजय यांना उद्देशून नाही. वरची चर्चा वाचून सहज वाटले.)

In reply to by प्रियाली

हीच ती फ्रेंच बया...मानसोपचार तज्ञ आहे म्हणे ....पण सध्या तरी तिलाच गरज वाटते मानसोपचार तज्ञाची

In reply to by धमाल मुलगा

म्हातारी हेलन सुदृढतेच्या सगळ्या व्याख्यांमध्ये बसते हो. सलमान खानची ;">(सावत्र)span> आई ती हीच हो.

In reply to by मृत्युन्जय

सलमान खान च्या सावत्र आईच नाव हेलन आहे हे बरोबर आहे. मात्र हिंदी सिनेमात आयटेम गाण्यावर नाचणारी हेलन (महेबुबा महेबुबा...शोले) ही ती नव्हे. सलमान खान ची आई हेलन हिने सिनेमात कधीही काम केलेल नाही.

In reply to by प्रियाली

परवा आठवड्याच्या बाजाराला जायला उशीर केला, तर शेतकर्‍याच्या कोथिंबिरीच्या जुड्याही संपल्या होत्या :-( कोथिंबीर आणून ठेवणे इतके हिट-ऑर-मिस. बाई आणून ठेवणे म्हणजे हिट-ऑन-मिस(-अँड-मिस)!

In reply to by धनंजय

आणखी एक मिस! तो अर्थातच तुमच्या लक्षात आला असावा म्हणा. वरचे धनंजय तुम्ही नाही, ते धनंजय बोरगावकर. (मला बोरगावकर लिहायला कंटाळा आला होता. ;)) पण इथे लोकांना लग्न करायला मुलगा किंवा मुलगी मिळत नाही आणि इथे लग्न करून वर बाया ठेवायच्या गोष्टी चालतात. एका बाईला सांभाळणारा पुरुष महान असतो. दोन बायकांना सांभाळणारा पुरुष देव असावा. ;-) ही व्याख्या आता उपक्रमावर लिहिते.

In reply to by धनंजय

लॉळ लॉळ लॉळ* आमचा रेमंड म्हणतो, हीज मिसेस इज ओन्ली मिसेस.. म्हणुनच आय 'थिंक यु कान्ट मिस (विथ मिस)' असे मत झाले असावे? ;-) *साभार 'पेन'

प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या आयुष्यात एक तरी राधा असते, हे राम शेवाळकरांचे विधान मटा मध्ये वाचल्याचे स्मरते.

In reply to by युयुत्सु

प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या आयुष्यात एक तरी राधा असते, हे राम शेवाळकरांचे विधान मटा मध्ये वाचल्याचे स्मरते.
सहमत आहे ! मी पण कुठेतरी वाचले आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, आणि त्या स्त्री च्या मागे त्याची बायको असते.

In reply to by युयुत्सु

प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या आयुष्यात एक तरी राधा असते, हे राम शेवाळकरांचे विधान मटा मध्ये वाचल्याचे स्मरते.
या न्यायाने प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाला सोळा सहस्त्र बायकाही हव्यात. ;)

In reply to by प्रियाली

या न्यायाने प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाला सोळा सहस्त्र बायकाही हव्यात.
कर्तृत्ववान राहु दे ;) आम्ही तर वाचलय की जगात म्हणे फक्त दोनच पुर्णपुरुष होउन गेले. एक श्रीकृष्ण आणि दुसरा अर्जुन.

In reply to by परिकथेतील राजकुमार

अर्जुनाचे माहित नाही पण कृष्णाला पूर्णपुरुष म्हणतात कारण त्याला स्तनाग्र नाहीत जी सर्वसामान्य इतर पुरुषांना असतात. संदर्भः व्यासपर्व किंवा दुर्गाबाईंशी ऐसपैस गप्पा. (दुर्गाबाई नक्की) पण मग या संदर्भाने बाकीचे सर्व..... :(

In reply to by प्रियाली

थोडा गोंधळ होतोय. तुम्ही जे सांगितल ते अर्जुनाच्या बाबतीत होत बहुदा कृष्णाच्या नाही!

In reply to by रन्गराव

>>>>>थोडा गोंधळ होतोय. तुम्ही जे सांगितल ते अर्जुनाच्या बाबतीत होत बहुदा कृष्णाच्या नाही! 'व्यासपर्व' या दुर्गाबाईंच्या पुस्तकात 'पूर्णपुरुष कृष्ण' पहिलेच प्रकरण आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पु. पे , कृष्ण आणि अर्जून ह्यापैकी रेमंड्सचे कपडे ज्याने एंडॉर्स केले तो पूर्ण पूरूष अस म्हणून मुद्दा निकलात काढुया. कारण दुर्गाबाई बरोबर का आमच्या लहानपनीच्या शाळेतल्या बाई ह्या भांडणात पडण्यात काही अर्थ नाही. ;)

In reply to by रन्गराव

बृहन्नडेच्या वेशात शोभून दिसणारा आणि रणांगणावर हातपाय गाळणारा अर्जुन पूर्णपुरुष? हे राम!!!!!! रामाकृष्णा वाचव रे या पूर्णपुरुषांपासून. ;)

In reply to by विकास

आणि ते काय जे आहे ते पुरुषार्थ (धर्म, अर्थ, काम, मोक्ष) या दृष्टीने आहे. (इथे जी चर्चा चालू आहे त्यावरून या लोकाना 'कामापुरताच' पुरूषार्थ समजलेला आहे असे वाटते. ते पौरूष मतिमन्दामधे पण व्यवस्थित असू शकते. म्हणा मतिमन्दाला अमर्याद पुरुषोत्तम!)

In reply to by रन्गराव

रगराव म्हणतात ते बरोबर आहे.

In reply to by विसोबा खेचर

दुर्गाबाई म्हणाल्या हे माहित आहे. ;) तुमचं आणि त्या व्यासांची जुनी दुष्मनी बॉ! आम्ही लक्ष देत नाही. ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

पुरुषांच्या छातीवर रुडीमेंटरी स्तन असतात .घोड्याच्या छातीवर तसे नसतात म्हणे म्हणून घोडा पूर्ण पुरुष.*

In reply to by रामदास

उपक्रमावर आमच्या एका स्नेह्यांनी हेच म्हटले आहे आणि त्यांना मी सहमतीही दाखवली आहे. ;) पण घोड्याने विवाहबाह्य संबंध कसे ठेवावे? :(

मला सध्या वैवाहिक स्थैर्याची नितांत गरज आहे. आणि नुकतंच धम्याने अतिशय छान आमंत्रण दिले आहे. आलोच, जाऊन !!!

In reply to by धमाल मुलगा

बराच वेळ विचार करत होते, हे नेमकं काय आहे?

In reply to by बिपिन कार्यकर्ते

प्रेषक बिपिन कार्यकर्ते दि. गुरू, 28/10/2010 - 18:18. मला सध्या वैवाहिक स्थैर्याची नितांत गरज आहे. आणि नुकतंच धम्याने अतिशय छान आमंत्रण दिले आहे. आलोच, जाऊन !!!
बिका हे असले काहितरी नका लिहित जाउ हो. एकतर तुम्ही असता शेख लोकांच्या घोळक्यात ;) उगाच गैरसंबंध गैरसमज नकोत.

पुरातन ग्रीसमध्येही विवाहित पुरुषांना विविध सेवा पुरवणार्‍या वेश्या असत. काही वेश्यांचा विशिष्ट विषयांचा अभ्यासही असे (राजकारण, साहित्य वगैरे). त्यामुळे निव्वळ लैंगिक सुखाच्या पलीकडच्या गोष्टीही वेश्यांकडून मिळत. प्रतिष्ठित समाजातल्या स्त्रीला शिक्षणाचं स्वातंत्र्य नव्हतं त्यामुळे कदाचित ती पुरुषाची प्रत्येक गरज भागवू शकायला पुरेशी सक्षम नव्हती. याउलट वेश्या स्वतंत्र आणि कमावती असल्यामुळे ती स्वतःला अधिक रोचक बनवू शकत असे. त्यामुळे लैंगिक गरजांखेरीज इतर (म्हणजे बौध्दिक वगैरे!) गरजांसाठीही स्त्रियांशी संबंध ठेवण्याचा इतिहास युरोपात आणि विशेषतः फ्रान्समध्ये दिसतो. दमीमोंद या संकल्पनेत त्याचा समावेश केला जातो. तूलूज लोत्रेक या फ्रेंच चित्रकारानं काढलेली वेश्यांची चित्रं प्रसिध्द आहेत. नमुन्यादाखल हे पाहा: Au Salon de la rue des Moulins सगळी जरी नसतील तरी काही लग्नं अशा पर्यायांमुळे नक्कीच टिकत होती. आजच्या जगाविषयी बोलायचं झालं तर मुख्य मुद्दा हा या विषयी किळस वगैरे बाळगण्यापेक्षा असा आहे - ज्या न्यायानं स्त्रियांनी पुरुषांचा बाहेरख्यालीपणा स्वीकारावा त्याच न्यायानं पुरुषांनीही स्त्रियांचा बाहेरख्यालीपणा स्वीकारावा. मग काही अडचण येणार नाही. तसं करण्याला किती पुरुष तयार आहेत यात कदाचित आजच्या सुखी वैवाहिक जीवनाचं रहस्य असेल :-)

आहो ते ती फ्रांस बद्दल सांगते आहे. तुम्ही मनाला का लावुन घेता???? बर अस काहे आहे का की हा ईशारा त्या सगळ्यांना (तुमच्या सकट) कि "विवाह बाह्य संबंधाचे फायदे आहेत म्हणुन करा.... दोन चार होउन जाउद्या......" ;) स्व पा आताच्च बायको ला वरील TOI ची लिन्क देउन जाम खुश आहे. माझा लोचा सोल्व झाला....... ठन्क्स

निसर्गाचे नियम पाळण्याची हौस असलेल्यांनी जंगलात जावे. सगळ्यात बलवान नर आहोत हे सिद्ध करून हव्या तितक्या माद्या सांभाळाव्या. थोडी शक्ती क्षीण झाली की अंगभर मार खाऊन पळून जावे. (सुसंस्कृत समाजात राहून, त्याचे सगळे फायदे घेऊन आपल्या सोयीने निसर्गनियमाचे दाखले देणे हा आचरटपणाच आहे असे वाटते. चू. भू. दे. घे.)

In reply to by मूकवाचक

सुसंस्कृत समाजात राहून, त्याचे सगळे फायदे घेऊन आपल्या सोयीने निसर्गनियमाचे दाखले देणे हा आचरटपणाच आहे
अगदी सहमत,त्यातले आपल्या सोयीने हे जास्त महत्वाचे.