आजकाल कावळ्याचे खिडकीवर बसून ...!!
काऊ तोगे कोकताहे
शकुणतोगे मागताहे
आजकाल कावळ्याचे खिडकीवर
बसून शकून देणे
खोटे ठरू लागलेय
काल कावळा
ओरडत होता
माझ्या माहेरच्या घराच्या खिडकीवर बसून
मान तिरपी करून
वाटले येतात की काय हे ..?
मन कसे उधाणले
ह्यांची आठवण येऊन
कशी उठली शिरीशिरी
नि मन गेले हरवून
घराच्या बाजूची पाउल वाट
सापासारखी वळत गेलेली
नागमोडी
टोकाला गुलमोहराचे झाड
गाडी तेथेच उभी राहते लाल रंगाची
हे उतरले की दिसतील मला खिडकीतून
किती आसासून गेलेय मन
ह्यांच्या आठवणीने
सेल दिलाय सोबत
पण रेंज येतेय कोठे ...?
म्हणून कावळ्याने दिलाय शकून
काऊ तोगे कोकताहे
शकुणतोगे मागताहे
मी वाट बघतेय
सकाळची गा
काव्यरस
मिसळपाव