मेला मैदा
'आईईई.... प्लीईज्ज्ज... पिझ्झा कर न...किंवा नूडल्स .. पास्ता? तो पण नाही? मग नुसतं sandwich तरी कर न मग? असं काय? आम्ही काही पण करायला सांगितलं की तू नाहीच म्हणते! maggi पण नाही खाऊ देत. पिंकी ची आई तिला दररोज maggi किंवा ब्रेड बटर देते.'
आमची आई: काय ते सगळे नुसते मेले मैदे खायचे असतात तुम्हाला! दूध पोळी खा पाहू मुकाट्याने!
हा आमच्या लहानपणचा कायमचा संवाद. आमच्या आई ला हे माहित होतं की मैदा खाल्लेला चांगला नाही, त्यात काहीच जीवन सत्व नसतात असं ती आम्हाला सांगायची. पण जीवन सत्व म्हणजे काय? मैद्यात ती नसतात तर त्यात एवढा काय बिघडलं? किंवा मैद्यात ती का नसतात?
मिसळपाव