वारं येणे, भूत काढणे वगैरे वगैरे - काही प्रश्न - मिपाकरांकडून उत्तरे मिळतील ही अपेक्षा
काही वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग
मी मालवणी माणूस, सुट्टीसाठी म्हणून गावी गेलो, त्यावर्षी आमच्या घरात "देवाची कामे" करणार होते. तर त्या दिवशी
सकाळी "देवाच्या कामांना" सुरूवात झाली. कोंबडा कापणे, महापुरुषाला नैवेद्य दाखवणे असे प्रकार झाले. रात्री जेवण
आटपून सगळी मंडळी एकत्र जमली. तेव्हा नेहमी प्रमाणे आमच्या एका काकांच्या अंगात "वारं संचारलं". सगळे जण
त्यांच्या पाया पडू लागले आणि आपल्या समस्या त्यांच्या समोर मांडू लागले. आता साक्षात देव आहे तर त्याला सगळं
माहित असणार असा विचार करून मी देवाला काही न विचारता फक्त पाया पडून बाजूला झालो. थोड्यावेळाने माझी एक
चुलत आत्या देवाच्या पाया पडायला आली. देवाने तिला सांगितले की "माझा भोवती सात प्रदक्षिणा घाल". देवाने तिचे
एक बोट पकडले आणि ती देवाला प्रदक्षिणा घालू लागली. एक झाली, दुसरी झाली आणि तिसरी प्रदक्षिणा झाल्याबरोबर
तिने अतिशय जोरदार झटका दिला. चार माणसं तिला धरायला धावली. आता तिचे रूप पालटले होते. ती अतिशय
भेसूर आणि भयानक दिसायला लागली. दात विचकून हसायला लागली. डोळे लालेलाल आणि विस्कटलेले केस. एरवी ती
अतिशय शांत स्वभावाची आहे. बारिक चणीची असून उंचीला ही कमी आहे. तिचं वजन ४० किलो पेक्षा जास्त नसावं.
मात्र आता ती ४ जणांना सुद्धा आवरायला कठीण झाली होती. असा काही प्रकार मी या पूर्वी कधीही पाहिला नव्हता. ती
आवरत नव्हती म्हणून अजून २ जण तिला पकडायला गेले. ६ जणांनी मिळून तिला देवाच्या समोर धरली. देवाने तिचे
केस पकडले. देवा आता तिला प्रश्न विचारू लागला. आणि अतिशय विचित्र आवाजात आत्याच्या अंगातील भूत उत्तरे देऊ
लागले.
देव: कोण आहेस तू?
भूत: मी सुनंदा. (आत्याचे नाव स्वाती आहे)
देव: कुठची तू?
भूत: मी अमूक अमूक ठिकाणची (मालवण शहरातील एका विभागाचे नाव घेतले जो आमच्या घरापासून दूर आहे)
देव: हिला का पकडलंस?
भूत: तिने मला पाहिलं आणि ती मला घाबरली.
मग अजून काही प्रश्न विचारले गेले. भूत आत्याला सोडायला तयार नव्हतं. मग देवाने त्याला शिक्षा करण्याची धमकी दिली.
मग भूत विनवण्या करू लागले.
देव: तूला जे काय हवं ते घे आणि निघून जा, तुझ्यासाठी अमूक अमूक ठिकाणी बकरा कापून ठेवण्यात येईल.
मग देवाने आत्याच्या तोंडावर तांदूळ आणि पाणी असे काही पदार्थ टाकले आणि आत्या शांत झाली.
मी व्यक्तिश: या भूत प्रेत प्रकारावर विश्वास ठेवत नव्हतो. पण हे जे माझ्या डोळ्यासमोर घडले त्यामुळे माझी चांगलीच तंतरली होती. त्यामुळे पुढील प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाले.
१) वारं येणे म्हणजे नक्की काय?
२) ६ माणसांना न आवरता येणारी शक्ती एखाद्या काटकुळ्या व्यक्तीच्या अंगात अचानक कशी येईल?
३) विज्ञानाच्या चौकटीत हा प्रकार बसवता येईल का? असेल तर कसा?
वाचने
28602
वाचनखूण
प्रतिक्रिया
47
>>>>१) वारं येणे म्हणजे नक्की
In reply to >>>>१) वारं येणे म्हणजे नक्की by अवलिया
:)
In reply to >>>>१) वारं येणे म्हणजे नक्की by अवलिया
>>काही काही जण तर १६ लोकांना
मि स्वत; भुत आहे. त्यामुळे
व्हर्चुअल वारं येणं आणि भुतं
असाच एक प्रकार!
खरेच हे असे कसे असते मला ही
अरे ये तो कुछ भी नही..
In reply to अरे ये तो कुछ भी नही.. by टारझन
वाचुन (माझि) बोटं (माझ्याच)
In reply to अरे ये तो कुछ भी नही.. by टारझन
पीर
In reply to अरे ये तो कुछ भी नही.. by टारझन
ह ह पु वा
बहुतेक गावतल्या चालु लोकांची
मनाचे खेळ दुसरं काय !!
या प्रकाराला हिस्टेरीया असे
In reply to या प्रकाराला हिस्टेरीया असे by विजुभाऊ
हिस्टेरीया विषयी विकी आत्ताच
In reply to हिस्टेरीया विषयी विकी आत्ताच by आवशीचो घोव्
अनेक कारणे असू शकतात. ते
In reply to हिस्टेरीया विषयी विकी आत्ताच by आवशीचो घोव्
पण २/३ प्रदक्षिणा घातल्यावर
In reply to पण २/३ प्रदक्षिणा घातल्यावर by विजुभाऊ
>>>>बाबरी मशीद
In reply to >>>>बाबरी मशीद by अवलिया
काहीजणाना प्रतिसाद देण्याचा
In reply to काहीजणाना प्रतिसाद देण्याचा by विजुभाऊ
>>काहीजणाना प्रतिसाद देण्याचा
In reply to >>काहीजणाना प्रतिसाद देण्याचा by अवलिया
तो विवादीत ढाचा पाडल्यानंतर
मनाची संभ्रमित अवस्था असू शकते.
In reply to मनाची संभ्रमित अवस्था असू शकते. by विनायक बेलापुरे
अंगात देव येण्यापेक्षा
In reply to अंगात देव येण्यापेक्षा by आवशीचो घोव्
सकारात्मक दृष्टिकोन असणारच
अश्या अंगात येणार्यांना "
सुरत चा हंतर बाबा गाजतोय
हा माझा अनुभव आहे, मी साधारण
मिपावरच्या
आवशीचा घोव
In reply to आवशीचा घोव by sagarparadkar
तुमची चुलत आत्या 'पेड (payed)
In reply to आवशीचा घोव by sagarparadkar
payed ????
In reply to payed ???? by अग्रजा
होय ...
संस्कृतीच्या पाऊलखूणा पूस्तक आठवले....
हे सगळे माणसाच्या मनाचे खेळ
कोकणातल्या माणसांना
संमोहन Uncovered
इथे प्रतिसाद दिल्यास ताबडतोब
In reply to इथे प्रतिसाद दिल्यास ताबडतोब by अप्पा जोगळेकर
अहो आप्पा
भूते आणि हिंदू धर्माच काय
In reply to भूते आणि हिंदू धर्माच काय by विजुभाऊ
खी: खी: खी:
हा माझा अनुभव, माझा दादा आणि
In reply to हा माझा अनुभव, माझा दादा आणि by RUPALI POYEKAR
>>मग आमच्या शेजारच्या आजीने
फोरेन
In reply to फोरेन by अप्रतिम
घोस्ट नावाचा डेमी मूरचा
In reply to घोस्ट नावाचा डेमी मूरचा by नितिन थत्ते
हिडिंबा मांत्रिक = व्हूपी
In reply to घोस्ट नावाचा डेमी मूरचा by नितिन थत्ते
कसली आठवण दिलीत... मस्त
अरे रे, यावर गोट्याने २०-२५