आठवणीचे छोटे छोटे तुकडे -मालेगाव क्याम्प .!!
घर नं -. ३३
सोनार गल्ली
मटण मार्केट जवळ
मालेगाव क्याम्प ,मालेगाव
जिल्हा ;-नासिक
पत्ता अजून पाठ आहे. आता आम्ही मोठे झालो होतो. पाचवीत गेलो होतो. मिरजे वरून सरळ मालेगावात आमचा तंबू पडला होता. ट्रकमध्ये सामान नि आम्ही आख्खे कुटुंब.सोनार गल्लीत घर घेतले होते.
एकदम जुने नि अंधारलेले.
आम्ही म्हणालो -
बाबा किती अंधार आहे ..?
छी... कसले हे घर....!!
गल्लीत एक घर बांधून तयार होते. माडीचे. चौकशी केली. घर मालक आले.
विचारले. मालक घर भाड्याने द्यायचे म्हणाला.
भाडे ठरले. पसंत पडले.
पाया
राम राम मंडळी.
धाग्याच नाव वाचुन बीगी बीगी आला असान तर जरा सबुर. तो उजवीकडच्या फोटो खालचा 'पाया' वायला आन आमचा ह्यो 'पाया' वायला. उगा येगळ्या आशेने ह्यो धागा उघीडला आसनं तर वांदे हुयाचे.
मी म्हंत्यो तो पाया म्हंजी बकर्याच्या पाया पासुन बनीवलेला रस्सा. तवा फुडलं झ्येपनार आसनं तरच खाली बगा.
आमचा बा ह्यो पाया बनीवन्यात यकदम येक्ष्पर्ट. आम्ही तेच्या कडनचं धडं गिरवलं ल्हान आसताना. आज लै दिसानं बकर्याचं पाय दिसलं दुकानात, तवा बाची आठवन आली. लगेच बकयाचं पाय घेतलं आन बाला फोन लावला. थोडी उजलनी केली. आन खुशीत घरला निघालू.
आवं आवं जरा दम खावा. सांगतु की सम्द बैजवार.
ती खरी का मी खरा ..?
ती खरी का मी खरा ..?
हे कधी कळलेच नाही
शब्द तिचे नि शब्द माझे
सूर कधी जुळलेच नाही
हे न माझे हे न तिचे
हे कधी वळलेच नाही
रंग माझे रंग तिचे
मिसळणे जमलेच नाही
ती अशी नि मी असा
चिंब कधी झालोच नाही
ती खरी का मी खरा ..?
हे कधी कळलेच नाही .
काव्यरस
आय गॉट अ वूमन- रे चार्ल्स
सुप्रभात मित्रांनो!
सकाळी सकाळी आठवण झाली 'रे चार्ल्स'ची.
या अमेरिकन गीतकार, संगीतकार आणि गायकाने चांगली ५०-५५ वर्ष संगीत रसिकांवर आपल्या सूरांचं गारुड घातलं.
आधी उल्लेख झालेल्या 'ब्लूज' संगीताचाच एक प्रकार असलेला 'सोल' (Soul) संगीत, हे याची खासियत!
बॅचलर्स भजी - खेकडा भजी ;)
खेकडा भजी:
या भजांच्या वेड्यावाकड्या आकारामुळे याला खेकडा भजी म्हणत असावेत . जितका सोपा तितकाच लाजवाब प्रकार
सहज बनवता येइल असा ;)
एखाद्या सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी वाफाळत्या चहाबरोबर जर गरमागरम कुरकुरी भजी असतील तर ......
...तर सौदीत कुमारी राहणार नाहीत
आज ऑन लाईन म.टा. वाचताना अजून एका बातमीने लक्ष वेघले. त्या बातमीतील जावईशोध वाचून मी उडालो.
त्यात म्हणले आहे "स्त्रियांनी वाहन चालविले तर सौदी अरेबियात एकही कुमारी महिला शिल्लक राहणार नाही, असा विचित्र दावा सौदी अरेबियातील 'मजलिस अल-इफ्ता अल-आला' या सवोर्च्च धार्मिक संस्थेने एका अहवालात केला आहे. वाहन चालविण्यासाठी स्त्रियांवरील बंदी शिथील केली, तर अनेक स्त्रिया आणि पुरुष समलिंगी बनतील किंवा पोनोर्ग्राफीकडे वळतील, असाही दावा या तथाकथित अहवालात करण्यात आला आहे. आपला अहवाल 'वैज्ञानिक' असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
चेतना
विस्तीर्ण नभावर मेघदळे घनदाट
पवनास न बंधन धावतसे फुंफाट
क्षितिजास फडकल्या भोर ध्वजा कनकाच्या
नांदी दिवसाची उगवे रमल पहाट
तिमिरास किनारी कांचनमय अल्हाद
भरल्या अंबरभर पुन्हा नव्या अभिलाषा
तो अथक प्रवासी चाले आपली वाट
पल्लवीत कुसुमे जीवन; नवओघात
सृजनाचे दालन; उमले रोज प्रभात
चेतना सकल हृदयात; चेतवी वात
दुरितांस ऊब तरुछाया कधि अपघात
चिरअनंत चाले योगभारला संवाद
मी अंश तयाचा आक्रमतो एकांत
विसरतो कसा मग मावळणे अभिजात
जे ज्यास हवे ते द्यावे आपल्या हातांनी
उत्तुंग वागणे राहिल चिरस्मरणात
............................अज्ञात
काव्यरस
चॉकलेट हिरो देव आनंद यांचे निधन.
आत्ताच ऑन लाईन म.टा मधे बातमी वाचण्यात आली.
सदाबहार देवानंद काळाच्या पडद्याआड
सदाबहार, चिरतरुण, चॉकलेट हिरो असे ज्यांचे वर्णन केले जायचे ते ज्येष्ठ सिनेअभिनेते देवानंद यांचे लंडन येथे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. अखेरच्या क्षणी देवानंद यांच्यासोबत त्यांचा मुलगा सुनील आनंद होता.
मिसळपाव