Skip to main content

दिग्गजांची ओळख :- छत्रपती शिवाजी

लेखक मन यांनी रविवार, 04/12/2011 02:03 या दिवशी प्रकाशित केले.
दुसर्‍या एका स्थळावर एका चर्चेत शिवाजी महाराजांबद्द्ल काही बोलणे सुरु असताना एका प्रतिसादात शिवाजी महाराजांचा एक प्रोफाइलच तयार झाला. त्यांच्या बद्दल लघुनिबंध म्हणता येइलसा किंवा संक्षिप्त परिचय म्हणता येइल असा तो आहे.

परीणाम ( गफलत भाग २ )

लेखक चाफा यांनी रविवार, 04/12/2011 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
निषाद देवनार यांच्या डायरीतून : आदित्य, माझा खास मित्र, सध्या काहीतरी सैरभैर झाल्यासारखे वागतो. एकदम नक्की सांगायचं झालं तर तो त्या `झांबीडी' नावाच्या गावाला जाउन आल्यानंतरच. त्याच्या लेखाला योग्य तो प्रतीसाद न मिळाल्यामुळे असु शकेल कदाचीत. आणि तसं असेल तर त्यात अशक्य असं काही नाही कारण आपल्या लेखाच्या प्रसिध्दीसाठी कुठे कुठे फ़िरला हा माणुस.... पण त्याला योग्य न्याय मिळाला नाहीच. त्या दिवशी मी त्याच्याकडे गेलो तेंव्हाच त्याची अवस्था पाहुन मला वाईट वाटले. खरोखर उत्तम आणि अभ्यासपुर्ण लेखन असते त्याचे अर्थात त्याची मेहनतही तितकीच असते त्या मागे.

भेट !

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 03/12/2011 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
भेट ! ३० जून १९४३. बॅलार्ड पिअरच्या पोस्टऑफिसच्या समोर जो रस्ता आहे, तेथे तो पोलीस नेहमीप्रमाणे करडी गस्त घालत होता. खांद्यावरच्या तार्‍यांनी तो एक आधिकारी आहे हे सहजच लक्षात येत होते. तसा रस्त्यावर शुकशुकाटच होता. पण त्याला काय फरक पडणार होता म्हणा. तो त्याचे काम सवयीने चोख पार पाडत होता. रात्रीचे १० वाजायला आले होते आणि हवेतला गारठा ही उत्तरेकडे झुकत होता. समुद्रावरचे गार वारे सुटले होते आणि पावसाच्या शक्यतेने त्या रस्त्यावर नेहमी असणारे नेहमीचे लोकही आज गायब होते. दरवाजांकडे लक्ष देत स्वारी हातातील दंडुका मधेच गरागरा फिरवत डौलात चालली होती.

मन

लेखक navinavakhi यांनी शनिवार, 03/12/2011 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
मनात गुंतते मन .. जनन अन मरण अभिलाषेच्या हिंदोळ्यावर चढणं अन उतरणं गुंतलेल्या मनाला आता सावर पुढे अवघड असेल वळण भावनांच्या पुराला आवर दुःखाचे अन्यथा हेच होई कारण मन होईल कावरं बावरं पण ऐक सांगते हेच असे जगणं !!

भोलू गोपाळाची गोष्ट

लेखक हरिकथा यांनी शनिवार, 03/12/2011 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
वृंदावनातल्या श्रुंगारवट या स्थानी नित्यानंदवंशीय श्रीनंदकिशोरदास गोस्वामी यांचा आश्रम आहे. त्यांच्याकडे त्यांच्या गायींच्या देखभालीसाठी भोलू नावाचा एक ब्रजवासी मुलगा राहत होता. भोलू हे काही त्याचं खरं नाव नव्हतं पण लोकं या गुराखी मुलाला भोलूच म्हणायची कारण तो स्वभावाने अतिशय भोळा होता. त्याच्याजवळ फारशी व्यावहारिक चतुराई नव्हतीच पण बुद्धीनेही तो अगदीच सामान्य होता. कुणी त्याला मस्करीतही काही गोष्ट सांगितली तरी तो ती खरी मानायचा. शंकेखोरवृत्ती तर त्याच्याजवळ नावालाही नव्हती.

साडेसाती

लेखक JAGOMOHANPYARE यांनी शनिवार, 03/12/2011 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
साडेसाती अजून काय लिहायचं? हे नावच इतकं महान आहे.. . इथे साडेसातीबद्दल सगळी चर्चा असावी. १. साडेसाती आणि शनी २. साडेसातीची कारणे ३. या कालात काय होते? ४. साडेसातीवर उपाय व शनी उपासना कशी करावी? ५. इतर काही धर्मिक उपाय ६. आपले काही अनुभव, किस्से ७. सध्या साडेसाती कुठल्या राशीना आहे? अशा समदु:खी लोकानी काय करावे? ८. साडेसातीचे एकंदर जीवनावरील दूरगामी परिणाम. ९. साडेसाती सत्य की थोतांड १०. इतर धर्मातील लोकाना साडेसाती लागते का? असे आणि या विषयी असलेले इतर अनेक मुद्दे विचारात घेता येतील.

भीती

लेखक जयनीत यांनी शनिवार, 03/12/2011 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
बंदिस्त पिंज-यात वाघ दुखा:त दिवस कंठीत होता . किती काळ झाला आपल्याला इथे येऊन ? आलो तेव्हा पानगळीचे दिवस होते . त्यानंतर दोनदा पाऊस येऊन गेला , आता तर पुन्हा पावसाचे दिवस येण्याची लक्षणं दिसताहेत . बाप रे ! बराच काळ झाल की आपल्याला . किती सुंदर दिसायचं आपलं रान पावसाच्या दिवसात , हिरवगार ! अन इथे ! इथल्या वृक्षांना रानातल्या वृक्षांची सर कुठून येणार ? त्यांचे बुंधे किती डेरेदार ? किती तरी पक्षी त्यांच्या आंगाखांद्यावर खेळायचे ? अन ती खोडकर माकडं ! किती किती गंम्मत होती त्या रानात .

मीही हलवाई होणार

लेखक प्रचेतस यांनी शनिवार, 03/12/2011 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा: मीही कवि होणार. अलिकडे 'आव आव, झटपट जिलब्या पाडके हलवाई बन जाव' असली काही मोहीम चालू असलेली दिसते. इथं असं नव्हे एकूणच सगळीकडे. तेंव्हा म्हटलं त्याच भूमिकेत शिरून त्याच भूमिकेचा जरा समाचार घ्यावा! हे अतिटुकार विडंबन करताना स्पा यांची खूपच मदत झाली त्यांचे आभार. डिस्क्लेमरः खालील कविता पूर्णपणे काल्पनिक असून श्री मेवे यांच्या कवितेचे विडंबन आहे.
काव्यरस

वांग्यची भजी/तळलेले काप

लेखक जागु यांनी शनिवार, 03/12/2011 01:37 या दिवशी प्रकाशित केले.
कमी बिया असलेली मध्यम किंवा मोठी वांगी. तांदळाचे पिठ २ ते ३ चमचे चवीपुरते मिठ हळद पाव चमचा मसाला १ चमचा तळण्यासाठी तेल १) वांगी धुवून त्याच्या गोल थोड्या पातळ चकत्या पाडायच्या. २) चकत्यांवर मिठ, हळद, मसाला टाकायचे. ३) थोडेसे पाणी शिंपडून जिन्नस चांगले कापांवर एकजीव करायचे.

जगातल्या नवनवीन गोष्टी

लेखक विभा यांनी शनिवार, 03/12/2011 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावरची हि माझी पहिलीच पोष्ट आहे.. तेव्हा गोड मानून घ्यावी.... जगात रोज नवनवीन गोष्टी घडतात. स्वाभाविकच आपल्याला प्रत्येक प्रसंगाची माहिती असणे शक्य नाही, परंतु कधी कधी आपण आपल्या आजूबाजूला काय चाललंय त्याच्याशी पण अज्ञात असतो. जगातल्या अशाच काही गोष्टी ज्या आपल्या रोजच्या आयुष्याशी निगडीत आहेत त्या नव्याने मांडत आहे..
  • आज 'गुगल' ह्या शब्दाशी कोणच अनोळखी नाही. माहितीचा खजाना मिळविण्यासाठी गुगल सर्च करण अगदी सामान्य झालाय. पण काय तुम्हाला माहित आहे कि खरं तर गुगल हे १० लाखाहून पण जास्त शून्याचा आकडा साठी वापरण्या जाणारं सामान्य नाव आहे.