Skip to main content

'डर्टी पिक्चर' : उलाला...उलाला...उलाला...उलाला

लेखक सोत्रि यांनी शुक्रवार, 02/12/2011 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
बराच गाजावाजा करत आज एकदाचा ’डर्टी पिक्चर’ झळकला. फ़र्स्ट डे फ़र्स्ट शो असला भक्तीभाव कधीच नव्हता. सध्या जास्त काही कामधाम नाही त्यात शुक्रवार, त्यामुळे फ़र्स्ट डे फ़र्स्ट शो नाही पण फ़र्स्ट डेला पिक्चर टाकता आला. एका सी ग्रेड अभिनेत्री, सिल्क स्मिता, हीची शोकांतीका पडद्यावर दाखवली. पिक्चर मधे विषेश तसे काही नाही. तसे काही नाही म्हणजे, चांगली पटकथा, उत्कृष्ट दिग्दर्शन, उच्च निर्मीतीमुल्य वगैरे असले काही. साधी सरळधोपट कथा आहे. तसा 'आंबटशौकीन' मसाला भरपूर आहे. एका खेड्यातली लहान मुलगी जीला मोठ्या शहराचे आकर्षण आहे आणि तीची आई तीला शहरात नुसता झगमगाट आहे जो तिच्यासाठी चांगला नाही हे सांगत असते.

आजोबांच पेन

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 02/12/2011 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, कधी कधी उन्हाळ्यात एक थंड हवेची झुळुक येते, ऊर भरून आपण श्वास घेतो, थंडावा अंगभर पसरतो. श्वास न सोडावासा वाटतो. पण निसर्गाचा नियम.. श्वास सोडावाच लागतो. असंच काहीसं सुख आणी दु:ख. ते यावं आणि जावं हेच कदाचित आयुष्य. :) कॉलेज मधे होतो तेव्हा "मेस"वर जेवायचो. मेसवर एक आजोबा यायचे. खळखळून हसायचे. आम्हाला सामील व्हायचे. वय ८५ आहे असे ते म्हणायचे. दुपारी आणि रात्री भेटायचे. आम्हाला बघून खुप खुश व्हायचे. हसायचे, आमच्याबरोबर विनोद करायचे आणि स्वतःचे तरुणपण आठवून पुन्हा खुश व्हायचे. आजोबा एकदा जेवणानंतर गप्पा मारताना म्हणाले की त्यांच्या वयाचे त्यांच्याबरोबर कुणीच नाही.

कोलावरी कोलावरी डी..

लेखक धमाल मुलगा यांनी शुक्रवार, 02/12/2011 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
एक दिवस असाच आपला घरी बसून निवांत टिवल्याबावल्या करत होतो. तेव्हढ्यात इमारतीमधले वय वर्ष ७-८ असे एक बालकृष्ण फिरत फिरत आमच्या घरी प्रवेश करते झाले. एंट्रीलाच सप्तक लाऊन टाळ्या घेणार्‍या संगीतनाटकातल्या कलाकारासारखं हे महाराज गात आले.. "व्हाय धिस कोलावरी कोलावरी डी". मी चमकुन त्याच्याकडं पाहिलं, तर ह्याला कशाचं काहीच नाही. गातोय आपला जोरजोरात. काय ही पोट्टी, काय काय पाहतात त्या टिव्हीवर, कळो न कळो, आपलं म्हणतच सुटायचं! मग मीच खेकसलो, " एऽ गप रे. तुझं वय काय, तू गातोयस काय? आँ? जरा चार चांगल्या गोष्टी ऐकाव्या माणसानं." त्या बाळासाहेबांनी एकदम 'अरे!

म्युच्युअल फंड गुंतवणूकीची काळजी कशी घ्यावी?

लेखक सदानंद ठाकूर यांनी शुक्रवार, 02/12/2011 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
म्युच्युअल फंड गुंतवणूकीची काळजी कशी घ्यावी? ज्याप्रमाणे गुंतवणूक कोठे करावी हा जसा महत्वपुर्ण निर्णय आहे त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक केल्यानंतर ती योजना योग्यप्रकारे काम करत आहे हे तपासणे हे सुध्दा अतीशय महत्वाचे आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणा-या ब-याच व्यक्तींचा असा समज असतो कि एकदा का म्युच्युअल फंडाच्या एखाद्या चांगल्या कामगीरी करणा-या योजनेत गुंतवणूक केली कि आपले काम संपले व त्यानंतर त्या गुंतवणूकीचे व्यवस्थापनाचे काम फंड मँनेजर्स पहातील.

"माय लिट्ल यल्लो बास्केट"

लेखक प्रास यांनी शुक्रवार, 02/12/2011 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार दोस्त हो! छोट्या भाचीशी खेळताना बालगीतांचा विचार डोक्यात घोळू लागला. आपल्या मराठीत बालगीतं, बडबडगीतं यांची बर्‍यापैकी रेलचेल आहे. तशीच ती इंग्लिश मध्येही आहे. सध्या तर या इंग्लिश नर्सरी र्‍हाईम्स जागोजागी ऐकायला मिळतात.... अर्थ कळो अथवा नाही..... काय आहे, मराठी शाळाच कमी होतायत ना..... असो. पण आज मराठी-इंग्लिश वादाचा दिवस नाही आणि हा तसा या लेखाचा विषयही नाही..... महाजालात शोधता शोधता १९४१ सालचं एक अप्रतिम रत्न गवसलं आणि तुमच्या बरोबर वाटून घेतल्याशिवाय राहिलं नाही.... काही सेकंदातच मी हे गाणं गुणगुणू लागलो.... 'एला फिट्झराल्ड' रॉक्स......

आई, असं का ग केलंस?

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 02/12/2011 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो हे एका अतीशय संवेदनशील विषयावरचे काही मला वाचायला मिळाले. एखाद्या जिव्हाळाच्या विषयावरचे हे लिखाण वाचताना डोळ्यात नकळत पाणी येते. ज्यानी हे मनोगत लिहिले त्याच्या भावना एखाद्या आईच्या/बापाच्या/सासू सासर्‍यांच्या पर्यन्त आपल्याला पोहोचवता आल्या तरी खूप काही मिळवले खरेतर काही अपरीहार्य वैद्यकीय कारणामुळे होणारी भ्रूण हत्या सोडता सरसकट होणारी स्त्री भ्रूण हत्या हा चिंतेचा विषय आहे. काहीही अपराध नसताना केवळ स्त्री आहे म्हणून जन्माअगोदरच हत्या होते आणि हजारो निष्पाप कळ्या उमलण्या अगोदरच खुडल्या जातात. हा आपल्या समाजाला काळीमा आहे.

लाल बत्ती

लेखक ए.चंद्रशेखर यांनी शुक्रवार, 02/12/2011 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
माझे एक जवळचे नातलग मोठे सरकारी अधिकारी होते. आपल्या कार्यकालातील अखेरीच्या काही वर्षात त्यांची मुंबईला अतिशय वरिष्ठ पदावरील अधिकारी म्हणून नेमणूक झालेली होती. या कालात त्यांच्या दिमतीला असलेल्या सरकारी गाडीला लाल बत्ती लावण्याचा मान मिळत असे. काही कामानिमित्त मुंबईला गेलेलो असताना दोन किंवा तीन वेळा त्यांच्या बरोबर या सरकारी लाल बत्तीच्या गाडीतून थोडा प्रवास करण्याचा योग आला होता.

मुल्ला नसीरुदीन

लेखक मन यांनी शुक्रवार, 02/12/2011 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसापूर्वीच मीमवर "मुल्ला नसरुद्दिनच्या कथा"(http://www.mimarathi.net/node/3298) पाहून पुन्हा लहानपणीचे दिवस आठवले. उन्हाळ्याचे सुट्ट्यात खेळून दमलो,थकलो, की घरी येउन मस्त कलंडून जात असू. कधी कधी एखाद्या शांत दुपारी निव्वळ आजूबाजूचे पस्ख्यांचे आवाज, शेजारच्या दाट झाडीत लपलेली वानरे,हळुवार येणारी झुळूक्,दूरून जाणार्‍या तांबड्या गायींच्या गळ्यातला घंटेचा नीरव शांततेला मंजूळ आवाज, व त्याला निरखणारे आमचे बालमन असा योग जुळून मस्त तंद्री लागे.

आत्याबाईला मिशा असत्या तर ...

लेखक आनंद घारे यांनी शुक्रवार, 02/12/2011 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
आत्याबाईला मिशा असत्या तर ... तिला 'काका' म्हंटले असते. ही म्हण माझ्या लहानपणी खूप प्रचलित होती. कदाचित मी जरा जास्तच चौकस (किंवा आगाऊ) असल्यामुळे नाही नाही ते प्रश्न विचारून मोठ्यांना भंडावून सोडत असेन आणि त्यामुळे वैतागून ते लोक मला ही म्हण वरचे वर ऐकवत असतील. 'आत्या' म्हणजे पित्याची बहीण म्हणजे ती बाईच असणार आणि 'काका' हा पित्याचा भाऊ असल्याने बुवाच असणार हे या शब्दांच्या व्याख्यांवरून स्पष्ट होते. हिंदी भाषेत आत्याला 'बुवा' म्हणतात हे मी पहिल्यांदा ऐकले तेंव्हा माझी हंसून हंसून पुरेवाट झाली होती.

कोणते मराठी पेपर सध्या चांगले आहेत !

लेखक नर्मदेतला गोटा यांनी शुक्रवार, 02/12/2011 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
कोणती वृत्तपत्रे सध्या चांगली आहेत. काही पेपर आता बदलायला लागले आहेत. काही पेपर तर पेड न्यूजवर चालतात