Skip to main content

मॅच

लेखक चाफा यांनी मंगळवार, 03/01/2012 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
"येत्या सहामाहीत आपण पुण्याच्या टीम बरोबर मॅच घेतोय" सकाळच्या प्लॅनिंग मीटिंग नावाच्या टाईमपास सेशनमधे बॉसनं तोफ डागली. " आँ " " कसली ?" आणि काहीश्या चमत्कारिक आवाजात प्रतिक्रिया उमटल्या " आपण येत्या सहामाहीत पुण्यातल्या कंपनीच्या टीम बरोबर क्रिकेटची मॅच घेणार आहोत " बॉसच्या या निवेदनावर आमच्या गोटात उत्साह सळसळला. " मॅच स्टेडियमवर असेल, किमान पन्नास ओव्हर्सची आणि सीझन बॉलवर खेळायची आहे " उत्साह आणखी वाढला " आपल्याला ट्रेनिंग द्यायला एक प्रशिक्षक बोलावला आहे तो परवा येईल, त्याच्या बरोबर रोज किमान दोन तास सराव करणं गरजेचं आहे " उत्साह चरमसीमेला भिडला. " पण ते ऑफीसअवर्स नंतर " उत्साहावर पाणी पडल

कां वागतो माणूस असा?

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 03/01/2012 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
कां वागतो माणूस असा? कां नाही जगत माणूस म्हणून? . आयुष्यभर सावल्यांशी खेळतो, सावल्यांमध्येच रमतो सगळीच आंधळी कोशिंबीर, सावलीचा संसार सावलीशीच लख्ख सूर्यासारखे सत्य डावलून सावलीचा आभास आपलासा करतो कां? कां वागतो माणूस असा? सत्य तरी किती खरे, कुणास ठाऊक!! कुठेतरी मनात साठवलेले काही क्षण हे कां सत्य? कातड्याच्या डोळ्यांनी पाहिलेले, अन मांसाच्या कानाने ऐकलेले हे जर सत्य तर मग प्रत्येक माणूस "हरिश्चंद्र" कां नाही? उगाचं काही माणसे सत्य शोधण्यात आयुष्य वाया कां घालवतात? त्यांच्या आयुष्याचे हे सत्य त्यांना कळत कां नाही!! कां?
काव्यरस

ती .....

लेखक फिझा यांनी मंगळवार, 03/01/2012 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
ती ..... जमलेच होते तिला मस्त जगायला आखून दिलेल्या चौकटीत मुक्त फिरायला खंत नव्हती कसली आभाळ तिचेच होते दोरी असली तरीही, पतंगाचे रंग तिचेच होते ..... होईलच पहाट वाट बघुनी होईलच सकाळ मग रंग भरुनी आकाश कधी झोपते का असे विचारायची उगीचच हसून हसून मग रडायची ...... जमलेच होते तिला हसायला आणि खोटे खोटे रुसायला संगतीला बरेच होते पण .. साथ कुणाचीच नव्हती जगायला........ पतंग असूनही पक्षासारखी उडायची दुरूनच मग क्षितीज पहायची जगण्यासाठी धडपड नसायची तिची हसण्यासाठी मात्र ......कारणे शोधायची ती....... हातात येईपर्यंत प्रत्येक गोष्ट निसटायची हट्ट नव्हता कसलाच, पण तगमग मात्र व

कळसुबाई नळीच्या वाटेने

लेखक बज्जु यांनी मंगळवार, 03/01/2012 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
कळसुबाईला बारी गावाच्या व्यतिरिक्त आणखी दोन वाटांनी जाता येत अशी माहिती होती, बरेच दिवस जाण्याचा विचार देखील होता पण योग काही जुळुन येत न्हवता. शेवटी नाक्य़ाच्या मुलांनी ३१ डिसेंबरला मज्जा करण्यासाठी भंडारद-याला एम.टी.डी.सी.त जाण्याच नक्की केलं, २० जणांच बुकींग सुध्दा झालं, आणि आम्ही सुध्दा एका दगडात दोन पक्शी होतील म्हणुन कळसुबाई नळीच्या वाटेने आणि नंतर भंडारदरा असा बेत नक्की केला. नाक्याची काही मुलं तर ३० तारखेला दुपारीच एम.टी.डी.सी.त थडकले, ऊगीच चांगल्य़ा (?) कामाला ऊशीर नको.

सर आले दुरुनी

लेखक विदेश यांनी मंगळवार, 03/01/2012 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
(चालः स्वर आले दुरुनी ) सर आले दुरुनी गेल्या सगळ्या त्या मैतरणी || खुर्चीत उसासे साऱ्यांचे होस्टेलमधील त्या पोरांचे कुजबुजही नव्हती पोरींची धुसफुसही नव्हती कोणाची ऐशा रमलेल्या त्या स्थानी || वर्गात मनोरथ किति रचले गालावर हासू पाघळले काही हृदयातचि ते घुसले बाणांतुनी स्पंदन जाणवले झेली सुंदर मैत्रीण कुणी || प्रतिसाद सरांचा तो न कळे अवसान परी का पूर्ण गळे संधीच न मिळता पोरांचे घबराट पुन्हा सर ते दिसले चहाडी चुगली का केली कुणी || (पूर्व प्रसिद्धी- शब्दगाssरवा २०११)

सत्यम-शिवम-सुंदरम

लेखक नरेंद्र गोळे यांनी मंगळवार, 03/01/2012 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव डॉट कॉम ह्या संकेतस्थळावरील व्यक्तीरेखा “स्पा”, यांनी माझे गाव हा लेख लिहीला आणि तो माझ्या वाचनात आला. खरे तर असे गाव कित्येकांचे असू शकेल. मात्र ज्या ज्या गोष्टी वास्तव (सत्यं), पवित्र (शिवं), सुंदर (सुंदरम्‌) वाटाव्यात, त्या त्या सर्व गोष्टींचा आलेख तपशीलवार काढावा तसा तो लेख, मला वाटला. त्या लेखातील उदात्त स्मृतींच्या सान्निध्यात सतत राहावे असे मला वाटू लागले. असेही वाटले की असे सुंदर घर, गाव सोडून लोकं डोंबिवलीत येऊन राहूच कशी शकतात? असो.

पांडूरंग माझा गरीब राहू द्या

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 03/01/2012 04:40 या दिवशी प्रकाशित केले.
पांडूरंग माझा गरीब राहू द्या पांडूरंग माझा गरीब राहू द्या गरीब राहू द्या गरीबांना पाहू द्या पांडूरंग माझा गरीब राहू द्या ||धृ|| नका अर्पू त्याला सोने अन नाणे त्याला नसे त्याचे देणे घेणे आपलीच श्रीमंती आपलीच श्रीमंती उगा जगाला का दावता ||१|| नका लावू त्याला सुखाचे डोहाळे नका करू त्याचे उत्सवी सोहळे तोच दाता असता तोच दाता असता कशाला त्याला देणगी तुम्ही देता?
काव्यरस

गडदेचा बहिरी

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 03/01/2012 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
दूर सह्याद्रीच्या कडेकपारीत मुग्ध होऊन बसलेल्या ढाकच्या बहिरीला प्रकाशात आणण्याचे श्रेय जाते ते गोनिदांना.आतापर्यंत केवळ तिथल्या ठाकरांमध्येच परिचीत असणार्‍या ढाकच्या बहिरीची सर्वसामान्यांना ओळख झाली ती गोनिदांच्या 'गडदेचा बहिरी' या कादंबरीवाटे. सुहासच्या इर्शाळच्या जबरदस्त चढाईमुळे पुर्वी आम्ही केलेल्या ढाकच्या बहिरीच्या सफरीची आठवण ताजी झाली . पिंपरीहून आम्ही ८ जण रात्री ९.३० च्या लोकलट्रेनमध्ये बसून तासाभरातच लोणावळ्याला उतरलो. तुंगार्ली, पांगळोली मार्गे राजमाचीच्या वाटेवर लागलो.