अण्णा, प्लीज जपा..!
प्रिय अण्णा,
सर्वप्रथम तुमच्याबद्दल अत्यंत आदर व्यक्त करतो. तुमचं स्वच्छ चारित्र्य, तुमची साधी राहणी, तुमची सात्त्विकता, तुमच्यातली सादगी, तुमच्यातली निरागसता, तुमचं सेवाव्रत या सर्वांना माझा सलाम. अगदी मनापासून. अण्णा, खूप भावता तुम्ही मला..
आता काही मुद्दे -
१) काही दिसांपूर्वी तुम्ही आणि तुमची टीम असं म्हणत होतात की सरकारनं त्यांच्या लोकपालपदासोबत तुमचंही जनलोकपाल बील संसेदेपुढे किमान सादर तरी करावं; मग संसद त्यावर जो निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य असेल. किंवा त्यावर आधारीत पुढील वर्चा किंवा आंदोलनाची दिशा ठरवता येईल.
२) पण सरकारने नेहमीप्रमाणे सगळ्यांना धोका दिला आणि फक्त स्वत:चंच बील सादर केलं. त्यामुळे सरकारच्या या फसवणुकीविरुद्ध तुम्ही उपोषणाला बसलात ज्याला माझ्यासकट अनेकानेकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला.
३) या आंदोलनाच्या दरम्यान तुम्ही हेही म्हणत होतात की तुम्हाला सरकार पाडण्यात वगैरे काहीही स्वारस्य नाही, तुम्ही फक्त भ्रष्टाचाराविरुद्ध एक सशक्त कायदा आणू इच्छिता.
४) परंतु काल तुम्ही सरकारला असा इशारा दिलात की सरकारने ३० ऑगस्ट पर्यंत हे बील पास करावं किंवा जावं! (पायउतार व्हावं), जे 'हे सरकार पाडण्यात मला काहीही स्वारस्य नाही..' या विधानाशी विसंगत ठरतं..!
५) अण्णा, अनेक सरकारांनी गेल्या ४२ वर्षात काहीना काही कारणं, सबबी सांगून लोकपाल बील अस्तित्वात आणलं नाही हे अगदी मान्य. त्याकरता जनतेतल्या प्रचंड असंतोषाला तुम्ही तोंड फोडलंत हेही नक्कीच खूप मोठं काम. परंतु एक गोष्ट मी इथे सांगू इच्छितो की,
अ) जरी एखाद्या कायद्याला ४२ वर्ष उशीर झालेला असला तरी,
ब) किंवा आज प्रचंड लोकपाठिंब्याच्या बळावर तुम्ही लौकरात लौकर हा कायदा करण्यास सरकारला भाग पाडलं असलं तरी,
क) किंवा याच लोकबळावर तुम्ही सरकारच्या सिंहासनाला धक्का लावलेला असला तरी,
येत्या चार आठ दिवसात घाईघाईने एखादा कायदा उरकल्यासारखा मंजूर करणं हे कधीही कधीही उचित होणार नाही, किंबहुना इतक्या कमी काळात भ्रष्टाचारासारख्या कॅन्सर विरोधातला एखादा कायदा मंजूर होणं ही मला तरी अशक्य गोष्ट वाटते. त्यावर निश्चितच समाजातल्या अगदी सर्व बुद्धिवंतांकडून, विद्वानांकडून, वकिलांकडून अधिकाधिक चर्चा व्हायला हवी असं माझं मत आहे.
आणि म्हणूनच ३० तारखेच्या आत आमचंच लोकपाल बील जसंच्या तसं पास करा नाहीतर चालते व्हा, हा मला तरी थोडासा अट्टाहासच वाटतो. परंतु हा केवळ तुमचाच अट्टाहास आहे/असेल असंही मला मुळीच वाटत नाही. या मागचा तुम्हाला पुढे करून आपला अजेंडा मांडणारा बोलविता धनी कोण आहे हे मला माहीत नाही..! असं वाटण्याचं कारण असं की महाराष्ट्रातही तुम्ही अनेक आंदोलनं/उपोषणं केली आहेत आणि आवश्यक तिथे किंवा बहुतांशी वेळेला समजुतीनं घेऊन आवश्यक ती माघार घेऊन संबंधितांना आवश्यक ती स्पेसही दिली आहे असा अनुभव आहे. परंतु या वेळेला मात्र इतर काही मंडळींकडून तुम्हाला मुद्दामून जिवघेण्या जिद्दीला भाग पाडलं जात आहे असा मला संशय आहे..!
६) अण्णा, अजून काही गोष्टी मांडू इच्छितो -
अ) आम्ही तुम्हाला ओळखतो अण्णा, तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. परंतु अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया ह्या गेल्या ३-४ महिन्यातच अचानक उगवलेल्या व्यक्तिंना मी किंवा इतर भारतीय जनता ओळखत नाही. यांच्या अजेंड्याबद्दल, किंबहुना 'त्यांच्यात काहीही हिडन अजेंडा नाही..' असं निदान मी तरी छातीठोकपणे म्हणू शकत नाही..!
ब) एक कर्त्यव्यदक्ष पोलिस अधिकारी या नात्याने मी किरण बेदींना नक्कीच आदारपूर्वक ओळखतो. परंतु ह्या आंदोलनात मात्र 'त्यांच्याकडेही काहीही हिडन अजेंडा नाही..' असं का माहीत नाही, परंतु मी ते म्हणू शकत नाही..!
तेव्हा अण्णा, लहान तोंडी मोठा घास घेतो आणि इतकंच सांगतो, की अण्णा जपा. स्वत:ला जपा..! आज तुम्ही अरविंद केजरीवाल, सिसोदिया आणि किरण बेदी यांच्या पूर्णपणे नसलात तरी बर्याच अंशी कह्यात गेला आहात असं मला जाणवतं आहे आणि भितीही वाटते आहे.
अण्णा, तुम्ही खूप आपले वाटता म्हणूनच इतक्या मोकळेपणाने लिहितो आहे. दिल्ली, आपला देश इत्यादींबद्दल मलाही नि:संशय खूप आदर आहे. परंतु अण्णा, आजही तुम्ही राळेगणसिद्धीला हवे आहात, देशापेक्षाही महाराष्ट्राला प्रथम हवे आहात इतकंच नम्रपणे सांगू इच्छितो..
अजून काय लिहू..?
तुमचाच,
तात्या.
वाचन
50044
वाचनखूण
प्रतिक्रिया
138
.
समर्थन
In reply to समर्थन by श्रावण मोडक
+१
In reply to समर्थन by श्रावण मोडक
या मुद्यांवर अधिक चर्चा
In reply to समर्थन by श्रावण मोडक
भरपूर वेळ देऊनही मोहीम 'फुस्स' होईल या आशेने सरकारने वेळ दवडला!
गुळाचा गणपती
In reply to गुळाचा गणपती by सुनील
परवाच वाचलेली बातमी - राळेगण
In reply to परवाच वाचलेली बातमी - राळेगण by विसोबा खेचर
कदाचित सुरक्षिततेच्या
In reply to परवाच वाचलेली बातमी - राळेगण by विसोबा खेचर
सांगोवांगीच्या गोष्टी!
In reply to सांगोवांगीच्या गोष्टी! by बाळकराम
=))
अरे.......
सर्वच मुद्यांशी पूर्णत: सहमत
In reply to सर्वच मुद्यांशी पूर्णत: सहमत by चेतन सुभाष गुगळे
कृपया..
In reply to कृपया.. by पल्लवी
असहमती दर्शवावी असा एकही
In reply to कृपया.. by पल्लवी
गरीबांचा सुमार केतकर!
In reply to सर्वच मुद्यांशी पूर्णत: सहमत by चेतन सुभाष गुगळे
बाब्बौ!!
पटले.
In reply to पटले. by पल्लवी
मग
In reply to मग by बाळकराम
आणि
In reply to आणि by पल्लवी
स्वातंत्र्य मिळाल्यावर सगळे
In reply to स्वातंत्र्य मिळाल्यावर सगळे by मराठी_माणूस
गॅरंटी
In reply to गॅरंटी by स्वतन्त्र
ठीक आहे. तुम्हाला तशी हमी
In reply to ठीक आहे. तुम्हाला तशी हमी by मराठी_माणूस
म.मा.
In reply to म.मा. by पल्लवी
>>तुम्हाला तशी हमी मिळेपर्यंत
१)सरकारचे वागणे जर "नाक
चार आठ दिवसात घाईघाईने एखादा
In reply to चार आठ दिवसात घाईघाईने एखादा by मालोजीराव
खासदार मंडळी "तू नहीं और सही, और नहीं और सही" हे गाणे गाताहेत!
शंका
In reply to शंका by नितिन थत्ते
जल्ला तुम्ही एकपण संधी सोडु
In reply to शंका by नितिन थत्ते
+१
३) या आंदोलनाच्या दरम्यान
मी पण म्हणतो : अण्णा, प्लीज
In reply to मी पण म्हणतो : अण्णा, प्लीज by पाषाणभेद
ही नालायक भ्रष्टाचार-रक्षकांची कोंडी फोडली गेली पाहिजे
मुद्दे बरोबर आहेत. एक वेगळा
In reply to मुद्दे बरोबर आहेत. एक वेगळा by गवि
उपोषणादरम्यान पाणी प्यायले जाते.
In reply to उपोषणादरम्यान पाणी प्यायले जाते. by मन१
आँ!!
In reply to आँ!! by बाळकराम
होय. ते तसे मानत होते.
In reply to होय. ते तसे मानत होते. by मन१
मनोबा,
In reply to मनोबा, by बाळकराम
"इंग्रज हे विष्णूचे अवतार
In reply to मुद्दे बरोबर आहेत. एक वेगळा by गवि
माझ्या माहितीत
In reply to माझ्या माहितीत by प्रियाली
त्यास पर्युषण पर्व असे
In reply to त्यास पर्युषण पर्व असे by वपाडाव
अरे हो!
In reply to त्यास पर्युषण पर्व असे by वपाडाव
चातुर्मासात हा लवकर जेवण्याचा
In reply to मुद्दे बरोबर आहेत. एक वेगळा by गवि
हायपोग्लायसेमिया हा फक्त मधुमेह असलेल्या व्यक्तीलाच होत असावा?
In reply to हायपोग्लायसेमिया हा फक्त मधुमेह असलेल्या व्यक्तीलाच होत असावा? by सुधीर काळे
मला पण.
In reply to मला पण. by गवि
त्याला
In reply to त्याला by प्रचेतस
उपोषण आणि प्रायोपवेशन यातला
बरेचसे मुद्दे पटले. एकंदर
लेख पटला.
हिडन
In reply to हिडन by चिरोटा
+१
In reply to +१ by प्रियाली
>>>अण्णांना प्रभावी बोलता येत
In reply to >>>अण्णांना प्रभावी बोलता येत by प्रशांत
माझे मत
In reply to माझे मत by प्रियाली
अन्यथा अण्णांचे मराठीमिश्रीत
In reply to अन्यथा अण्णांचे मराठीमिश्रीत by विसोबा खेचर
कायद्याची भाषा
In reply to अन्यथा अण्णांचे मराठीमिश्रीत by विसोबा खेचर
तात्या, टकल्या बापटाचा संताप
In reply to +१ by प्रियाली
झी टीव्हीवर झालेल्या
In reply to झी टीव्हीवर झालेल्या by मराठी_माणूस
हो
In reply to +१ by प्रियाली
http://en.wikipedia.org/wiki/Arvind_Kejriwal
In reply to http://en.wikipedia.org/wiki/Arvind_Kejriwal by सुधीर काळे
+१ आनी ह्ये पन वाचा
टुकार
In reply to टुकार by आदिजोशी
सहमत!
In reply to टुकार by आदिजोशी
असेच म्हणतो. सबंध लेखामधेच
In reply to टुकार by आदिजोशी
+१+१+१
शिर्षक सोडल्यास लेख सगळा काही
Just a thought Can we bribe
In reply to Just a thought Can we bribe by विजुभाऊ
+१ आणि हा हा हा
In reply to +१ आणि हा हा हा by कानडाऊ योगेशु
मल्टी करोड रुपयांच्या
In reply to +१ आणि हा हा हा by कानडाऊ योगेशु
+२
In reply to Just a thought Can we bribe by विजुभाऊ
अर्रे वा
अबक ...यांचा हिडन अजेंडा .....
केजरीवाल,बेंदीसारख्या
In reply to केजरीवाल,बेंदीसारख्या by कानडाऊ योगेशु
सहमत. आण्णांचे उपोषण तसेच जरा
In reply to केजरीवाल,बेंदीसारख्या by कानडाऊ योगेशु
जय हो, अरविंदभाई!
भारतीय लोकांचा प्रॉब्लेम हा
In reply to भारतीय लोकांचा प्रॉब्लेम हा by नगरीनिरंजन
+१
डॉ. अभय बंग
In reply to डॉ. अभय बंग by विकास
चांगली मुलाखत
In reply to चांगली मुलाखत by धनंजय
शक्य आहे
In reply to चांगली मुलाखत by धनंजय
गर्दी थोड्या काळासाठी
In reply to डॉ. अभय बंग by विकास
फक्त त्यात एक बोलताना जे काही
In reply to फक्त त्यात एक बोलताना जे काही by अप्पा जोगळेकर
मला वाटले...
फक्त पंतप्रधान, राहुल गांधी अथवा पृथ्विराज चव्हाण
In reply to फक्त पंतप्रधान, राहुल गांधी अथवा पृथ्विराज चव्हाण by सुनील
म्हणजे...
In reply to म्हणजे... by विकास
मला तर
In reply to मला तर by प्रियाली
माझंही असंच काही ...
In reply to माझंही असंच काही ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
अण्णा काळजी घ्या.
In reply to अण्णा काळजी घ्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विद्वान मंडळी या आंदोलनाला
In reply to विद्वान मंडळी या आंदोलनाला by llपुण्याचे पेशवेll
गांधींप्रमाणे आण्णांनीही