आता मतदार जागृती अभियान. अण्णा, देअर यू आर..!
गेल्या काही दिवसातल्या घटना -
१) दर दोन महिन्यांनी मोठमोठ्या गर्जना करून टीम अण्णांनी भारतीय घटनेला आणि आपल्या सार्वभौम अशा संसदेला सो कॉल्ड जन-आंदोलनांच्या धारेवर धरणे,
२) टीम अण्णांकडून (आणि काही वेळेला खुद्द अण्णांकडूनही) झालेल्या बेताल वक्तव्यांमुळे,
३) जनलोकपालबाबत 'माय वे ऑर हाय वे..' अशा हुकुमशाही अडेलतट्टू आणि इगोइस्टिक भूमिकेमुळे,
४) सर्वच पक्षात भ्रष्टाचार बोकाळला असताना केवळ काँग्रेस पक्षाबाबतच 'अँटी करप्शन ऐवजी अँटी काँग्रेस' असा छुपा अजेंडा घेऊन आगपाखड केल्यामुळे, (आजतागायत लोकपालसंदर्भात भाजपने केवळ 'कुंपणावरची' अशी अत्यंत सोयिस्कर भूमिका घेतल्याचे आमचे मत आहे.
मिसळपाव