Skip to main content

चिकन किसाडिया / किसादिया (Quesadilla)

लेखक सानिकास्वप्निल यांनी शनिवार, 07/01/2012 05:44 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः ४ तोरतीया तयार ड्राय चिकनचे तुकडे स्लाईसेस करुन (तंदूरी चिकन, बार्बेक्युड चिकन, मराठमोळा ह्यांचे पेरी-पेरी चिकन सुध्दा चालेल :) ) एका कांद्याच्या पातळ चकत्या करून घेणे १/४ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर ३-४ हॅलेपिनो मिरच्या चिरून ( आवडीप्रमाणे कमी-जास्त) हिरव्या भोपळी मिरचीचे तुकडे आवडीप्रमाणे (रंगीत भोपळी मिरच्याही वापरू शकतो) १ वाटी किसलेले चीज (मी Cheddar चीज वापरले आहे तुम्हाला जर का मेक्सिकन Montary Jack मिळाले तर उत्तम) १ वाटी तयार टोमॅटो सालसा (विकतचा नाही मिळाला तर टोमॅटो बारी

त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (श्रावणबेळगोळ) भाग - ४

लेखक दशानन यांनी शनिवार, 07/01/2012 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भागात आपण बेल्लुर पाहिले. आता म्हैसूरपासून ९०-९५ कि.मी. दूर असलेल्या विंध्यगिरी पर्वतावर जैनधर्मियांचे मोठे तिर्थक्षेत्र आहे श्रावणबेळगोळ. मराठी माणसाला श्रावणबेळगोळ व तेथील गोमटेश्वराची मुर्ती माहिती असण्याचे कारण म्हणजे त्या मुर्तीच्या पायथ्यावर मराठीमध्ये केलेले शिलालेखन. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांना ही माहिती सर्वसामान्य जनतेसमोर आणण्याचा मान जातो.

बोस्की-इंटीमेट आणि सी -९०

लेखक रामदास यांनी शुक्रवार, 06/01/2012 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
१९६९ किंवा ७० साल असावं . एल निनोचं नाव तेव्हा कुणालाच माहीती नव्हतं. नैऋत्य मोसमी वारे आणि खारे वारे -मतलई वारे इतकंच भूगोलाचं ज्ञान होतं.. याच दरम्यान एक नविन वारं खेळायला लागलं. दुबईचं सोनेरी वारं .या वार्‍याची जाणीव आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांना उशीराच झाली . दुपारच्या वेळी पारवळं पकडत उनाड फिरणारी तांबोळ्याची आणि अत्ताराची पोरं दिसेनाशी झाली आणि अचानक वर्षभरात रमझान इदेला झगझगीत पांढर्‍या कपड्यात गले मिलताना दिसायला लागली . इस्माईल पारटेची गाडी उलाल होऊन अंगणात उभी होती पण पारट्याची पोरं दिसेनाशी झाली .खोताची पाड्यावरची जमीन मकबूलनी दामदुपटीनी घेतल्याची आवई कानावर आली .

मासे ३७) घोळ

लेखक जागु यांनी शुक्रवार, 06/01/2012 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
घोळात घोळ नव्हे घोळ म्हणजे मासा घोळीचे सर्वच भाग खाण्यासाठी वापरतात. मोठी घोळ चविष्ट असते. वरील फोटोपेक्षाही घोळीचा मोठा मासा असतो. घोळ माश्याला मोठी खवले असतात. ह्याच्या डोक्याला घबाड म्हणतात. हे डोकेही चविष्ट म्हणून खास कालवणासाठी डोके मासेखाऊ नेतात. घोळीचा मधला काटाही कालवणासाठी वापरतात.

अर्धसत्य

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 06/01/2012 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
मंतरलेली शीळ कुठुनशी चित्तसदन मन होते मंथर अंदोलत उलगडते प्रतिमा झुळुक मिटविते पुरते अंतर कोष रेशमी लय कांचनमय रात्र झुलविते रास निशाचर गोत्र मिरविते मोरपिसांचे अमानवी संस्कार शिरावर मिटल्या डोळ्यां-आंत सरोवर झुरते काजळ उभय तिरांवर जाग मत्सरी येते अवचित अर्धसत्य मग होते गोचर ..............अज्ञात
काव्यरस

अलंग-मदन-कुलंग

लेखक sagarpdy यांनी शुक्रवार, 06/01/2012 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात राहून गेल्या काही वर्षात सिंहगड, राजगड, तोरणा, लोहगड-विसापूर इ. किल्ल्यांना भेट देण्याचा आणि अर्थात काही प्रमाणात गिर्यारोहणाचा बऱ्यापैकी अनुभव आला - छंदच जडला म्हणा ना. सध्या कार्यालयीन कामकाजातून जसा वेळ मिळेल तसा कोणत्यातरी नवीन ठिकाणी जायला बघत असतो.

काकडीची खमंग धिरडी ....

लेखक पियुशा यांनी शुक्रवार, 06/01/2012 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरानो , नवीन वर्षातली ही माझी पहिली जिलेबी ......;) ओह ! आय मीन रेसेपी ;) एकदम झटपट बनवता येणारा अन चवीला लाजवाब असा प्रकार आहे .
काकडीची धिरडी
साहित्य : एक काकडी. (किसलेली ). एक मध्यम कांदा (किसलेला ). एक वाटी बाजरीचे पीठ. अर्धी वाटी बेसन पीठ . आलं अर्धा इंच . लसूण पाकळ्या ६-७ , हिरव्या मिरच्या ६-७ . तीळ एक चमचा . जीर एक छोटा चमचा.

स्टफ्ड चेरी टोमॅटो

लेखक Mrunalini यांनी शुक्रवार, 06/01/2012 03:26 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः चेरी टोमॅटो - १ पाकीट सॉफ्ट चीज - १ पाकीट लसुण - २ पाकळ्या कांद्याची पात - १/४ कप बारीक चिरुन. (फक्त पात कांदा नाही) काळी मिरी पावडर - १/२ चमचा लिंबाचा रस - १/२ चमचा ऑलिव्ह ऑइल - १ चमचा मिठ चवीनुसार कृती: १. चेरी टोमॅटो धुवुन, पुसुन घ्यावेत. त्याचा देठाचा भाग कापावा. तसाच एकदम थोडा खालचा भाग ही कापावा, ज्यामुळे टोमॅटो निट उभे राहतील. २. देठाच्या भागाकडुन टोमॅटोच्या आतला सगळा गर काढुन घ्यावा व टोमॅटो फ्रिज मधे ठेवुन द्यावे. ३. चीज एका बाउल मधे काढुन घ्यावे.

महात्मा गांधी.. एक विचार

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 06/01/2012 02:05 या दिवशी प्रकाशित केले.
नोट : सदर लेखन हे माझे नसुन माझा नेट फ्रेंड 'दिपक साळुंखे' याचे आहेत. हे लेखन येथे देण्याचे कारण फक्त येव्हडेच आहे कीहे लेखन वाचुन कोणा एकाच्या जरी विचारात बदल झाला तर या धाग्याचे उद्दीष्ट्य साध्य होयील. तसेच मागे एकदा सांगितल्या प्रमाणे गांधीजींच्या बद्दल असणारा विचार माण्डणार असे बोलण्याने हा धागा देत आहे. पार्श्वभुमी : मी अगोदर गांधीजींचा उल्लेख आजचे कित्येक तरुण मंडळी करतात तसाच "टकल्या" म्हणुन करायचो. तेव्हा "मी नथुराम गोडसे बोलतोय.." नाटक पाहिलं होतं आणि त्याच्या प्रचंड प्रभावाखाली होतो.