Skip to main content

लष्करी हुकूम अर्थात आर्मी कमांड्स

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 02/01/2012 06:18 या दिवशी प्रकाशित केले.
आर्मी कमांड्स
(एनसीसी त असतांना या कमांड्स ऐकायची सवय होती. आता सहज आठवल्या. गेयता येण्यासाठी काही शब्द अ‍ॅडावलेले आहेत. या हुकूमांना कोठेतरी लय असते म्हणून काव्यविभाग निवडला आहे. रोष नसावा.
काव्यरस

नको रे दिवा

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 02/01/2012 03:58 या दिवशी प्रकाशित केले.
नको रे दिवा नको रे दिवा तू मालवू असा उजेड का नकोसा उलघाल मनाची होई लाज आली अशी थोडी वेडी पिशी जरा थांबलीस का वेळ निघूनी जाई मोहरून येई जवळी स्पर्श घेई करूनी का उगाच अंगी काटा फुलूनी येई चढली ही रात्र थकले रे गात्र चिंब यौवन मात्र तुझ्या हाती येई नको रे तू असा नको करू राजसा हातामधे तुझ्या नकळत का हात जाई नको रे तू असा नको करू राजसा हात हातामधे नकळत का जाई ऐक गोड गुपीत हे सांगतो मी कानी सखी तूच माझी आता एकरूप होई - पाभे
काव्यरस

जपा निरागसता.

लेखक किचेन यांनी रविवार, 01/01/2012 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
बालगीतांची गरज आहे अस कोणाकोणाला वाटत? शेजारचा नुकताच बालवाडीत जायला लागलेला पिंट्या आज शाळेत काय शिकवलं,किवा एखादी कविता म्हणून दाखव अस म्हंटल तर कमेरेचा पट्टा हलवत दाबंग करायला लागला.त्याचा मोठा भाऊ रावण किती डेंजर आहे हे सांगत होता. परवा डोरेमोन मध्ये योगेतो आणि डोरेमोन हे त्या मुलीला शेपटी आली हे बघून लालेलाल झाले होते! कराटे कीड मध्ये १२ वर्षाचा मुलगा किस करतो? लहान मुलांचे कार्यक्रम खरच लहान मुलांचे राहिलेत का? दूरचित्रवाणीच्या जाहिराती ह्या पूर्ण कुटुंबाने बघण्यासारखा असतात का?

हवेचा रंग कुठला?

लेखक गणपा यांनी रविवार, 01/01/2012 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
परवा लेक घरात शिरली ती एक प्रश्न मनात घेऊनच. “आई, हवा कुठल्या रंगाची असते?” इति लेक. “अगं हवेला रंग नसतो.” तिच्या बाला सुलभ प्रश्नाच बायकोने निरसन केल. “हरलीस?” “?” “अग हवेचा रंग गुलाबी असतो.” लेकीने तारा तोडला. आताशी बायकोच्या भूवयांच धनुष्य झाल होतं. “ते गाणं नाहीये कां ‘ही गुलाबी हवाऽऽऽऽऽऽ वेड लावी जीवाऽऽऽऽऽऽ’ येव्हाना लेकीने तालही धरला होता. मग एकदम खिदळली आणि म्हणाली “अग आई, पीजे होता”. “पण आई खरंच गुलाबी हवा म्हणजे काय?” बायकोचा छोटा पॉज. “कसला विंचार करतेयस आई.” “मोठ्या माणसांना वेगळ्या शब्दांत सांगाव लागत. लहान मुलांना साध्या सोप्प्या शब्दांत समजेल अस सांगाव लागत.

पदमविभूषण ई.श्रीधरन यांस मानाचा मुजरा!

लेखक नरेंद्र गोळे यांनी रविवार, 01/01/2012 20:28 या दिवशी प्रकाशित केले.


पदमविभूषण डॉ. ईलत्तुवलपीळ श्रीधरन व्यवस्थापकीय संचालक, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन.

चिकन (रस्सा व कोरडे)

लेखक किचेन यांनी रविवार, 01/01/2012 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर कसे टंकावे हे सांगितलात तर मांसाहारी पदार्थांच्या आणि गोड-धोडच्या पाककृती टाकेल अशी लालूच दाखवली होती.तुम्ही सर्वांनी मला खूप मदत केलीत त्याबद्दल धन्यवाद! तसेच नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा.नवीन वर्षात खूप ख,खायला घाला आणि मिपावर भरपूर लेखन करा. काल घरच्या घरी जी पार्टी होती त्यात मी केलेलं हे चिकन. साहित्य: १.

बाबा गनुश

लेखक गणपा यांनी रविवार, 01/01/2012 06:15 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व रसिक खवय्यांना इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!! २०१२ ची सुरवात एका शाकाहारी पाककृतीने करत आहे. आशा करतो आपल्याला आवडेल. मध्यपुर्वेत रहाताना तिथल्या पदार्थांनी भुरळ घातली होती. शवरमा (शोरमा), फलाफल, वेगवेगळ्या प्रकारचे कबाब, हमस आदी माझ्या काही आवडत्या डिश. आज त्या पैकी बाबागनुशची पाककृती आपल्या पुढे घेउन आलो आहे. खुबुस वा पिट्टा ब्रेड डीप करण्यासाठी बाबा गनुश हे एक प्रकारच डीपिंग आहे.

थांब जरासा..

लेखक राघव यांनी रविवार, 01/01/2012 03:45 या दिवशी प्रकाशित केले.
संदर्भः नववर्षाच्या शुभेच्छा!! याचसाठी म्हणून काही लिहावे म्हटले, पण भराभर ओळी सुचत गेल्या अन् लिहित गेलो. या कवितेसाठी मागच्या ज्ञात इतिहासापासून ते आजपर्यंत घडलेले कोणतेही मृत्यूचे तांडव उदाहरणादाखल घेता येईल, ज्याला जे म्हणून घ्यायचे ते घेण्यास अडचण नसावी. पण त्यातून काहीतरी स्फूर्तीदायक अंगांगातून शिरशिरत उठले पाहिजे म्हणजे ही कविता लिहिल्याचे सार्थक झाले. अरे मानवा, नववर्षाला भेट परंतू, थांब जरासा.. आठव थोडा मृत्यूचा तो नाच पुन्हा अन्‌..