Skip to main content

मदत हवी आहे...

लेखक अव्यक्त यांनी शनिवार, 31/12/2011 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
...पुत्ररत्नाची प्राप्ती होणे हा काय सुखद अनुभव असतो ह्याचा प्रत्यय मला नुकताच सुखावून गेला...मला वसुबारस, रमा एकादशी ह्या शुभ मुहूर्ती पुत्र रत्नाची प्राप्ती झाली...आता नाव काय ठेवायचं हा यक्षप्रश्न माझ्या समोर उभा ठाकला...बर्रीच नावे पालथी घातली...पण एक नाव पसंतीस उतरेल तर शप्पथ.. बरयाच द्राविडी प्राणायामानंतर एक नाव पसंतीस उतरले...मी माझ्या सुपुत्राचे नामकरण "चि. शौनक" केले. पण बरयाच जणांना हे नाव अपरिचित होते.अगदी आप्तांना सुद्धा... मलाही शौनकची दोनच उदाहरणे ठाऊक होत्ती.....१.

(ती येते आणिक जाते )

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 31/12/2011 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता येते मग येते निर्माण अपेक्षा करते नाक उंचावल्या जाते हुळहुळ अशी लावते ताण डोळ्यान्ना देते काहीही ना दिसते लबाड येवढी असते जगाचा विसर पाडते स्फोटाची तयारी होते मुठी वळवून सोडते आह्ख छ्छी केव्हा वाजते जग सारे वाट पहाते उंचावलेले डोके झुकते हुळहुळीची चिडचिड होते नाकाला अतृप्त सोडून ती न येताच जाते ************
काव्यरस

१ जानेवारी... चलो पेरणेफाटा...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 31/12/2011 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
ऐतिहासिक पेरणेफाटा... पेरणे गावापासून दोन किमीदूरवर नव्याने हायवेला झालेली नागरवस्ती म्हणजे पेरणेफाटा होय. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याची हद्द इथे समाप्त होते. भीमा नदीवरील पूल ओलांडला की शिरूर तालुका लागतो. नव्याने वसलेल्या गावास इतिहास असू शकतो का? पण होय. पेरणेफाट्याला ऐतिहासिक महत्त्व आहे.

म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 31/12/2011 02:57 या दिवशी प्रकाशित केले.
काव्यरस

तोल हा मनाचा तू जरा सावर रे.

लेखक santosh waghmare यांनी शुक्रवार, 30/12/2011 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
दिशाहीन वाहणाऱ्या वाऱ्याला तू जरा आवर रे, तोल हा मनाचा तू जरा सावर रे. झालेल्या व्यथा ते उगाचच आठवत, गतकालातून दुख जणू ते पोखरून काढत, सुखलेल्या जाख्मानाही मग फुटे वेदनेच पाझर रे , तोल हा मनाचा तू जरा सावर रे. बाह्य आकर्षणाला ते सतत भुलत, शोभेच्या फुलालाही नाकाशी धरू लागत, पण मृगजळात तहान नाही भागत रे, तोल हा मनाचा तू जरा सावर रे. प्रेत्येक कर्माच फळ त्याला पटकन हव असत, पिउनी हळद त्याला लगेच गोर व्हायचं असत, पण पिकण्या अगोदर आंबा कसा लागणार गोड रे, तोल हा मनाचा तू जरा सावर रे. समोरच्याकडून ते अधिक अपेक्षा करत, जणू लहानश्या झोळीत ते गावभर बाजार भारत, मग छिद्र पडुनी झोळीस सारा बाजार निघुनी ज

बसचा प्रवचा, वैद्य सी.के. राजगुरू, मूळव्याध, वाक्यरचना वगैरे वगैरे..! :)

लेखक कॉमन मॅन यांनी शुक्रवार, 30/12/2011 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच शहरी बसने प्रवास करत होतो. बसच्या आतल्या बाजूने ज्या जाहिराती लावलेल्या असतात त्यापैकी एका जाहिरातीकडे आमचं लक्ष गेंलं. जाहिरातीतलं एक शीर्षकवजा वाक्य होतं - 'निष्णात वैद्य राजगुरू यांच्या मूळव्याधीसारख्या आजारावर उपाय उपलब्ध..' हे वाक्य वाचल्यावर आमचा थोडा घोटाळाच झाला. वाक्यरचना थोडी चुकीची वाटली. कारण ते वाक्य आम्ही असं वाचलं - 'निष्णात वैद्य सी. के. राजगुरू यांच्या मूळव्याधीसारख्या आजारावर उपाय..' म्हणजे खुद्द वैद्यबुवांनाच मूळव्याध झाली आहे आणि या जाहिरात्रीद्वारे कुणी आम्हाला त्यांच्या मूळव्यधीवर उपाय करण्याचे आवाहन करत आहे किंवा कसे?

कोंबडी म्हणाली कोंबड्याला

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 30/12/2011 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
'पहाटे ओरड पाहिजे तेवढे-' कोंबडी म्हणाली कोंबड्याला, 'ऐकावी लागणार दिवसभर नंतर पक् पक् माझी तुला !' मांजर निघाले घाईघाईत शिकार उंदराची करायला - आडवा आला माणूस नेमका परतावे लागले मांजराला ! मुंगळयाने पाहिली गुळाची ढेप निघाला तुरुतुरु खायला - मधेच एक माशी शिंकली माणसाच्या पायाखाली आला ! एक खेकडा सकाळी उठला पूर्वेकडून पश्चिमेला निघाला - संध्याकाळ होईपर्यंत उत्तरेला नेमका पोहोचला !