Skip to main content

दु:खाचा महाकवी हरपला

लेखक सांजसंध्या यांनी सोमवार, 26/03/2012 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
अत्यंत दुर्बोध कविता अशी टीका पचवून पुढे दु:खाचा महाकवी या रसिकांनी दिलेल्या बिरूदाला शेवटपर्यंत जागलेले श्री माणिक गोडघाटे उर्फ ग्रेस हे आपल्यात राहीले नाहीत या बातमीवर विश्वास बसत नाही. मर्ढेकरांनतरच्या पिढीतले ते एक महत्वाचे आणि प्रमुख कवी होत. १० मे १९३७ रोजी ग्रेसजींचा जन्म नागपुरात झाला. त्यांचं बालपण विलक्षण गेलं. त्याबद्दल त्यांनी मौन पाळणं पसंत केलं. पण मनात खदखदणारं दु:खं प्रतिमांची सोबत घेऊन आलं. एखाद्या पदार्थाची चव जशी मोजता येत नाही तशीच भावनेची तीव्रताही. ती तीव्रता वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रतिमांचा वापर केवळ ग्रेसजींसारखे कवीच करू शकतात.

साहित्यातील 'माणिक' हरपलं ....

लेखक सुहास झेले यांनी सोमवार, 26/03/2012 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
जीव राखता राखता तुला हाताशी घेईन झडझडीचा पाऊस डोळे भरून पाहीन तुझे सोडवीन केस त्यांचा बांधीन आंबाडा देहझडल्या हातांनी वर ठेवीन केवडा तुझे मेघमोर नेसू तुला असे नेसवीन अंग पडेल उघडे तिथे गवाक्ष बांधीन दूध पान्ह्यात वाहत्या तुझ्या बाळांच्या स्तनांना दृष्ट काढल्या वेळेचा मग घालीन उखाना तुझे रूप थकलेले उभे राहता दाराशी तुझा पदर धरून मागे येईन उपाशी मुक्या बाहुलीचा खेळ देवघरात मांडीन नथ डोळ्यांशी येताना निरांजनात तेवीन तुझ्या चिमण्यांची जेव्हा घरी मळभ येईल वळचणीचा पाऊस माझा सोयरा होईल भाळी शिशिराची फुले अंगी मोतियांचा जोग तुझ्या पापण्यांच्या काठी मला पहाटेची जाग नाही दु: खाचा आडोसा नको सुखाच

झाड झाडासवे बोले.. (अष्टाक्षरी)

लेखक वेणू यांनी सोमवार, 26/03/2012 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
झाड झाडासवे बोले, काय गूढ आहे सारे? नाही प़क्षी घरट्यांत कसे झाले बंद वारे? झाड उत्तरे झाडाला, अरे सारे बदलले, पक्षी रमती बाहेर घेत वार्‍यासवे झुले.. झाड झाडासवे बोले, काय सांगतोस असे? नाही पक्षी नाही वारा आता जगायचे कसे? झाड उत्तरे झाडाला, नको होउस उदास, वय तुझे माझे झाले त्यांचे तारुण्य भरास.. झाड झाडासवे बोले उरे पानगळ अशी, होतो बहरलो जेव्हा सारे होते माझ्यापाशी... झाड उत्तरे झाडाला, जगण्याची रीत खरी पंख फुटता फुटता पक्षी भरारी भरारी झाड झाडासवे बोले, आत दाटून रे येते रोज बोलतो जरी हे फिरुनीया तेच वाटे..! यावा बहर बहर भेट चिमण्यांची व्हावी, माझ्या अंगाखांद्यावर पुन्हा हसावी खेळावी.. प

फिल्मी चक्कर

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 26/03/2012 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
हिन्दी सिनेमातले काही संवाद उगाळून उगाळून पकावू झाले आहेत. तरीही अजून देखील कित्येक सिनेमात तेच ऐकायला मिळतात. मग बापुडे प्रेक्षक जमेल तेव्हा त्या संवादाची खिल्ली उडवून स्वतःचे मनोरंजन करून घेतात. सोनी टीव्हीच्या कॉमेडी सर्कसमधे असेच एक दमदार विडंबन ऐकायला मिळाले... बाप एकाला सांगत असतो- “मैने अपने बेटोँको पेट काट काट कर पाला है!” समोरच्यावर काही परिणाम झाला नाही हे पाहून बाप पुन्हा म्हणतो- “विश्वास नही होता तो इनके पेट देखो.

द अंडरटेकर!

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी सोमवार, 26/03/2012 04:09 या दिवशी प्रकाशित केले.
बास! शिर्षक वाचल्यावरच अनेकांचा थरकाप उडेल. अनेकांना आश्चर्य वाटेल. अनेकांना उत्साह वाटेल. आणि अनेकांना विचित्रही वाटेल. मात्र 'कोण हा अंडरटेकर?' असा प्रश्न कुणालाच पडणार नाही. रेसलींग या नावानं प्रसिद्ध असलेली कुस्ती तुम्हाला आवडत असेल अथवा नसेल, आणि डब्ल्य़ुडब्ल्य़ुएफ (किंवा आता डब्ल्य़ुडब्ल्य़ुई) अनेक वर्षांपासुन पाहिले असेल अथवा नसेल; परंतु 'अंडरटेकर' हे नाव आणि हे व्यक्तीमत्त्व याबद्दल काहिच कल्पना नाही; असा माणुस सापडणे विरळाच! आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्रालाच आपल्या नावानं ओळखलं जाण्याचं सौभाग्य एखाद्याच सचिन तेंडुलकरला मिळतं आणि एखाद्याच अंडरटेकरला! मार्क विल्यम कॉलॉवे.

"पुरुषांची" खरच गरज आहे का ?

लेखक तर्री यांनी रविवार, 25/03/2012 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व सजीव सृष्टीत दोन मूलभूत प्रेरणा असतात. १.स्वतःचे संरक्षण आणि २.प्रजोत्पादन. सगळ्या सृष्टीमध्ये मानव प्रगत आहे पण हया दोन प्रेरणा मानाव जातीतही तीव्रतेने दिसून येतात. उत्क्रांतीमुळे मानवाच्या बुद्धीचा विकास झाला. हया बुद्धी-विकासाने मानवाला विज्ञानाचे वरदान लाभले.मानव जात ही कळपाने रहाणारी / समाज प्रिय मनात आहे. कळपाने रहाणार्या प्राण्यामध्ये अनेक प्राण्यांप्रमाणे मानव जात ही “मादी-केंद्रित” (female centered) ,“मातृ-सत्ताक” होती. चाकाच्या शोधा नंतरचा महत्वाचा शोध - शेतीचा शोध मानवाला लागला. शेतीच्या शोध लागे पर्यंत मानाव भटका होता. स्त्री ही कुटुंब प्रमुख होती.

*** चैत्र नवरात्र ***

लेखक मदनबाण यांनी रविवार, 25/03/2012 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या ठाण्यात चैत्र नवत्राचे उत्सवी दिवस सुरु आहेत्,ठाण्यातल्या जांभळी नाका इथे असलेल्या मैदानात दरवर्षी प्रमाणेच याही वर्षी देवी स्थानापन्न झालेली दिसली आणि मला तिचे दर्शन घ्यायची इच्छा झाली. जमेल तसे फोटु काढण्याचा प्रयत्न केला आहे कृपया गोड मानुन घेणे. :) प्रवेश करता क्षणीच गजाननाचे लोभस दर्शन झाले.

" स्वप्नामधली जमाडीजंमत "

लेखक विदेश यांनी रविवार, 25/03/2012 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
कावळा करतो कुहू कुहू कोकिळा करते काव काव फोडते मांजर डरकाळी वाघोबा करतो म्याव म्याव पळे सर सर सर हत्ती निवांत चाले हळू खार ती कोल्होबा चिडीचूप बसतो ससोबा गुरगुरगुर करतो आरोळी उंदीरमामाची ती वनराजाला वाटे भीती माकड चाले जमिनीवर कासवाची उडी झाडावर आई छान सांगते गंमत बंडू ऐके पेंगत पेंगत रंगुनी जाई बघत बघत स्वप्नामधली जमाडीजंमत

गावी जमिन घेण्यापुर्वी आवश्यक गोष्टी ....

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 25/03/2012 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच एक लेख वाचनात आला...अर्थात "मिसळ-पाव" वर... जमिन, घर आणि मनस्ताप.... तो लेख आणि त्याच्यावर आलेल्या प्रितिक्रिया वाचुन, मी पण जमिन घेण्यापुर्वी खालिल गोष्टीन्ची तयारी आधी करावी असे म्हणतो... १. शस्त्र आणि परवाना घेणे .....(आधी शस्त्र आणि मग परवाना घ्यावा म्हण्तो...सध्या तरी वारे असेच वाहत आहे) २. आधी घर बान्धावे आणि मग परवानगी काढावी असा "आदर्श" पहिल्यापासुनच आहे.... ३. रोज दारु पिवुन गावात धुमाकुळ घालावा... ४.