....पुन्हा!!
सांज साजरी
सखी लाजरी,
आठव बोचरी
रुतली पुन्हा...
पेटलेले रान
उन्हाला तहान
सुन्न वहीचे पान,
मिटले पुन्हा...
दमलेला श्वास
श्रमलेली आस,
अवघडले त्रास
दुर्मुखले पुन्हा...
तू असण्याचे भास
मनाचे खोटे कयास,
निराशेने खास
गाठले पुन्हा...
आशेनेच फसवणे
जगासवे हेलकावणे,
मिळवून गमावणे
घडले पुन्हा...
शुभ्र तेवती वात
काळावरही मात,
एक नवी सुरुवात
भरारले.... पुन्हा!!
-बागेश्री
मैफिल नववर्षाची
आसमंती हा बहर बसंती
सरे पानगळ शिशिराची
कोकील कंठी सुरु होतसे
मैफिल ही नव वर्षाची
नवे सूर अन् नवे तराणे
नव्या दिशा, उन्मेष नवा
नवीन स्वप्ने, नवी भरारी
नवी दृष्टी अन् जोश नवा
नवसूर्याचे तेज लेऊनी
सृष्टी गाई गीत नवे
उधळण होता सप्तसुरांची
इंद्रधनुवर रंग नवे
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा !!
कंदमूळ-उन्हा़ळ्याचं फळ
आपल्याला कंदमुळ या नावावरुन सामान्यतः सुरण/रताळी इ.इ. कंद जमातीची अठवण होते...पण आज मी एक वेगळाच कंद प्रथम पाहिला... म्हणजे खाऊनही पाहिला.आणी तोही मिळावा कुठे..? तर आमच्या त्या अजब दुनियेत...मार्केटयार्ड मधे...! उद्या पाडवा असल्यानी फुलं आणायला मुद्दामच यार्डात ११:३० ला गेलो होतो,कारण सगळीकडचा मालही आलेला असतो,आणी बाजारही जरा बरा मिळतो,म्हणुन. आधी उन्हानी फुल्लं तापलेलो होतो.तेंव्हा आधी जरा एक शहाळं मारावं,आणी मग आत गाळ्यात उकडुन निघायला घुसावं अश्या विचारात होतो... तर कडेनीच जाणार्या एका हार वाल्यानी...
आनंद, सुख, जगणे इ इ
नमस्कार मंडळी. गुढी पाडव्याच्या शुभेच्छा! सण आनंदाचा जावो. नववर्षात आनंद, सुख, संपत्ती, समृद्धी लाभो.
पैसा व सुख असे शब्द ऐकले की एखाद्याला फक्त पैसा मोजणारी, कालच्यापेक्षा आज आधीक अशी जीडीपीचा उदो उदो करणारी पाश्चात्य संस्कृती आठवत असेल तर एखाद्याला भूतानच्या राजाने प्रसिद्ध केलेली ग्रॉस नॅशनल हॅपीनेस ही संज्ञा पण आठवत असेल. आता आपण तत्त्ववेत्या भारतीयांना सुख हे मानण्यात असते इतके माहीत असतेच. चला मग सुखाचे ते नेमके मानले गेलेले क्षण कोणते त्याची यादी करुया.
वरदान
गेल्यावेळी घरी गेलो तेव्हा लहान भावाला मोबाईलवर मित्रांशी संवाद साधताना बघून खूप खूप आनंद झाला. तोपर्यंत मित्रांना केवळ एसएमएस करूनच समाधान मानवं लागण्यामूळे खट्टू होणारा तो आणि आता ३जी च्या माध्यमातून मित्रांशी गप्पा मारणारा, तो हाच काय यावर सांगून सुद्धा विश्वास बसला नसता.
आधीच मर्यादीत शब्दसाठा त्यातच भाषेचे पूर्ण ज्ञान नसल्याने होणार्या चूका यामूळे कित्तेक वेळातर मलासूद्धा त्याचे मॅसेजेस कळत नसत. मग तो काय सांगायचा प्रयत्न करतो आहे हे आशयावरून समजावे लागे. आई-बाबांशी मी फोनवर बोलताना तो तीथे उभा राही व केवळ चेहर्याच्या हावभावांवरून काय बोलणं सुरू आहे याचा अंदाज लावी.
ढक्कन खोलना नहीं आता ! इंदुरी दुकानदारीची एक झलक
नुकताच झालेला, शेअर करण्यासारखा फाऊंटन पेनचा किस्सा आहे.
आत्मशून्य इथे आला तेव्हा आम्ही असेच राजवाड्याशेजारच्या रोडवर बाजारातून फिरत होतो. जुनी कळकट दुकाने बंद व्हायची रात्रीची वेळ. एक फाऊंटन पेनचं दुकान दिसलं. फाऊंटनपेन भलेही रोज वापरत नसलो तरी दुकान दिसलं की पहावे, घ्यावे वाटतातच. त्या दुकानदाराने नेहमीचीच सत्तर, शंभर रुपयांची शाईपेनं समोर मांडली. त्यापैकी बरीच ऑलरेडी इथेतिथे पडून आहेत. मूड गेला. पण दुकानातून निघून कसं यावं म्हणून उगी शान मारत -
''अरे नहीं नहीं, ये तो सब चालू माल है, कलेक्शन के लिये कुछ है तो दिखाईये '' अशी वाक्ये फेकली.
मिसळपाव