रेल्वे प्रवास!
मध्यंतरी मी रेल्वेच्या AC 2 TIER या वर्गातून सुमारे १०००किलोमीटर प्रवास केला. आरक्षण तत्काळ कोट्यातून आंतरजालावरून केले होते.
सांगायचा मुद्दा असा की तिकिटावर माझे नाव आणि ओळखपत्र नंबर चुकीचा टंकित झाला, त्यामुळे तिकीट परीक्षकाने
माझ्याकडे तिकीटाची पूर्ण रक्कम + २५० रुपये असा दंड मागितला.
मी दंड द्यायला नकार देऊन त्याच्याशी बरीच हुज्जत घातली आणि शेवटी विजयी झालो. याबाबत रेल्वे चा नियम काय आहे?
तिकिटाचे पूर्ण पैसे दिले असताना फक्त नाव आणि ओळखपत्र नंबर चुकीचा असल्याने दंड भरावा काय? (मी ओळखपत्र म्हणून PAN card दाखवले होते)
मिसळपाव
