...खरच जमलंय !!
जमलंय मला सावरायला
उसने अवसान आणायला..
आणि उगीचच हसायला...
...खरच जमलंय....
नात्यांच्या ह्या गोत्यातून
स्वताचे भावविश्व आकारायला
सगळ्यांमध्ये असूनहि
सगळ्यांपासून दूर जायला
---खरच जमलंय...
जमलंय डोळ्यांना खरंच
पाणी अडवायला ...
जमलंय शब्दांना खरंच
अर्थ बदलायला ....
त्या पाण्याचे, शब्दांचे कौतुक करायला ...
...खरच जमलंय मला.....
अर्थातली निरर्थकता ......
निरर्थकतेतला अर्थ सांगायला
खरच जमलंय या शब्दांना
कविता सजवायला .....
निखळलेले शब्द मांडायला
आणि वाह वाह मिळवायला
.....खरच जमलंय
लेखनविषय:
याद्या
1313
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
खरंच -
वाह!!
खूप छान आहे
छान कविता आहे
...खरच जमलंय !!
खरच जमलंय !!!