Skip to main content

फोटोशॉप किडे - भाग १

लेखक स्पा यांनी मंगळवार, 27/03/2012 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांसाठी फोटोशोप शिकवण्याचा हा छोटासा प्रयत्न आपण आज फोटोंवर संस्करण कसे करतात , त्याची ओळख पाहू फोटोशोप उघडा file --- open --- तुम्हाला हवी असलेली image हा फोटो मी घेतलाय आता उजव्या कोपर्यात जी window आहे , त्यात background या नावाने आत्ताच्या फोटोचा layer बनलेला आहे , त्यावर right click करून duplicate layer करा

अलखपैंजणी परखडमोती

लेखक शरदिनी यांनी मंगळवार, 27/03/2012 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
सुशिरनभाले चरित्रक्रांता लखलख दर्जा झुरतो दर्द शिरशिरी बाधा व्याकूळ साहित्याला लुचतो नवगेयाच्या शिंकाळ्यावर तीर्थ दुपारी झडतो झळझळ जिव्हा हरित भुसनळे सम्यकधावन करतो सुकल्या ओष्ठी निबंधतस्कर मारे वारे स्त्रवतो रुधिर धाबळी साजणलपलप आस्वादातून डुबतो विझल्या पणतीवरी धुराच्या नक्षीलाही गिळतो त्या वातीवर त्या गंधावर शतखंडाने जळतो चिवित्रसंध्या गरळगोजिरे मलम विषारी खलतो अलखपैंजणी परखडमोती निरोप दुर्लभ सलतो शरदिनी.... पुणे २६ मार्च २०१२

चंद्रकोर आणि चांदणी

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 26/03/2012 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री पश्चिम क्षितिजावेळ काही काळ एक तेजस्वी चांदणी/ तारा चंद्रकोरीच्या बराच जवळ दिसत होता. अर्थात फोटोमध्ये ते बर्‍यापैकी दूर दिसतात पण ती फ्रेम म्हणजे विस्तिर्ण क्षितिजावरचा एक लहानसा भाग आहे त्यामुळे तसे दिसते. moon1 lr moon2 lr

ग्रेस!!

लेखक शैलेन्द्र यांनी सोमवार, 26/03/2012 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
टीचली काच बिलोरी, दुखा:चा हलला पारा, अस्फुट वेदना जाते, मग वाहे उदास वारा.. एकाकी होता कोणी, रिचवित विषाचे प्याले, हळुवार तरल जखमांचे, गुंफीत मोती ओले.. शब्दांतुन द्यावे त्याने, चरचरीत तलम हुळहुळते, अन जग शोधित बसते, त्याच्याशी आपुले नाते.. रक्तातील गहरी त्याने, काजळी लपवली नाही , नक्षीत कवडश्यांच्या, कधी प्रकाश चोरला नाही.. कोंडले आतुन काही, विष्षण्ण नाद निनादे, झुंबर दचकुन हलले, अन लोलक एक उनावे.. -- शैलेंद्र
काव्यरस

... अस्तित्व माझे

लेखक गणेशा यांनी सोमवार, 26/03/2012 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
जीवणाच्या भावगर्दित मेहमान अस्तित्व माझे बसू कसा पंक्तीत तुमच्या, बदनाम अस्तित्व माझे निसर्गाच्या चक्रात अडकले सूर्य,चंद्र,तारे भावनांच्या बाजारात, बंदिवान अस्तित्व माझे घायाळ नजर शोधती, ओळखीच्या खानाखुना आसवांच्या गावात, गुमनाम अस्तित्व माझे माणसांच्या कल्लोळात हरविले मनाचे स्वैर बंध भासांच्या ताटव्यात, सुनसान अस्तित्व माझे सुगंधाच्या मायाजाळात अडकली फ़ुलपाखरे झुगारले नभाला असे, बेगुमान अस्तित्व माझे रात्रीस, सांजवेळी साद घालतो जख्मी सूर्य झाकोळले अंधारात, दीपमान अस्तित्व माझे छप्परविरहीत घरट्यात उभ्या असंख्य भिंती नभांकणात विखुरले, बेभान अस्तित्व माझे स्वरविरहीत शब्दांचे उठते निशब्द क

क्षणभर!

लेखक भारी समर्थ यांनी सोमवार, 26/03/2012 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
ही ऊन उतरली संध्या भावप्रखर तळपते जे नसते नशीबी त्याचे कढ काढून काढून जळते मज प्रेमच वाटे माझे जरी फिरलो माघारी दोष जरी का माझा दुसर्‍याच्या माथी मारी तो पसरी रंग सोन्याचे ढळता भास्कर गगनी अभागी आम्ही मात्र रमतो आत्मभजनी हर्ष असो वा दु:ख राग लोभ वा मत्सर अपुल्या मनाचे घोडे सावरून घे क्षणभर!

देव खरच नवसाला पावतो का?

लेखक निश यांनी सोमवार, 26/03/2012 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
देव खरच नवसाला पावतो का? ह्या शंकेच उत्तर मला अजुन मिळाल नाही आहे. ह्याला कारणही तसच घडल. काल रवीवारी , मी व माझे दोन मित्र एका प्रसिध्द देवळात देवाच्या पाया पडायला गेलो होतो. बाहेर बरीच लांब रांग लागली होती. त्या रांगेत उभे रहीलो असतो तर सहजच आम्हाला दोन ते तीन तास लागले असते देवाच्या पाया पडायला. माझ्या मित्राने तिथे असलेल्या स्वयंसेवकाला विचारले आज ही रांग एव्हढी लांब का आहे? तर तो म्हणाला नवसाचि आहे. ती रांग एव्हढी लांब होती की मला खरच नवल वाटल की जर देवाला नवस करुन जर ते नवस खरे होत असतील तर मग हे जग मग फक्त नवसांवर चालायला हवे. कर नवस घे नवसाच फळ.

ऒंजळीत हिरव्या काचा

लेखक भारी समर्थ यांनी सोमवार, 26/03/2012 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
ऒंजळीत हिरव्या काचा माझ्या रिकाम्या हाती प्राणसखी ती माझी मज सोडून झाली पुढती हा काळ एकटा झाला की नशीब माझे रूसले गालावरले झरले थेंब मी स्वहस्ताने पुसले या वेळी संसाराच्या का तुजविन जगणे आले आठवणीच सार्‍या तुझया अन् कल्लोळ मागे थांबले कोण जाणील सांग गूढ गुपीते अपुली अंधारातही धरली होती माझ्यावर तु सावली व्यसन झाल्या सवयीचे हे खुंटत कुढणे काय? माणसांचा भवती पसारा मला ओळखील काय? आता धरतो उराशी सगळे कढ तुझे नी माझे शांत एकटाच आता म्हणतील मला हे मागे.

कुत्रेकुई, पळता भुई, झोप जाई!!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 26/03/2012 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
एका बातमीनुसार हायकोर्टाने म्हटल्याचे आठवते की झोप हा माणसाचा मुलभूत हक्क आहे. म्हणून रात्री दहा नंतर लाऊडस्पीकर वाजवण्यावर बंदी केली आहे. पण, रस्तोरस्ती भटकणाऱ्या कुत्र्यांबद्दल कोर्टाची आणि महानागरपालीकांची भूमिका काय आहे? रात्री कामावरून घरी परत येणारया नागरिकांना, लहान मुलांना चावणे, त्यांचेवर भुंकणे, त्यांच्या वाहनामागे पळणे, तसेच रात्रभर कुत्र्यांचा घोळका एकत्र येवून कर्कश्य आवाजात मोठ्ठ्याने भुंकणे असे प्रकार अनेक शहरातील वेगवेगळ्या परिसरात वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांची झोप हैराण झाली आहे. या भटक्या कुत्र्यांना काही गेटच्या आत राहून भुंकणारी पाळीव कुत्रीही साथ देत असतात.