Skip to main content

अल्लखकरण

लेखक निनाद यांनी शुक्रवार, 30/03/2012 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
अल्लखकरण मी तुला पाहताच मनोमन बद्धरुपांतरण| रोजच ते अनुभववावे तव धन्यमरण|| ती आज आली घेऊन गुलमोहतरण| मला देतेसे चषक तेच अल्लखकरण|| अजूनी ते येतातच पाहताच झल्लकसरण| तसे पाहता नजरेचे हे विक्षेपसंक्रमण|| शब्दांचे असे कसे सदैव कर्षित्रचर्वण| एकटाभयाण विचार ते बिंबाणुश्रवण||

गार्लिक प्रॉन्स

लेखक Mrunalini यांनी शुक्रवार, 30/03/2012 03:00 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः कोलंबी - १/२ किलो लसुण - ३-४ पाकळ्या हिरवी मिरची - १-२ ऑलिव्ह ऑईल - ३ चमचे लिंबाचा रस - १ चमचा हळद - १/२ चमचा लाल तिखट - १ चमचा तंदुरी मसाला - १/२ चमचा हिंग - १/४ चमचा बटर - १ चमचा मिठ चवीनुसार wooden skewers कृती: १. कोलंबी स्वच्छ करुन घ्यावी. २. लसुण व हिरवी मिरची एकदम बारीक चिरुन घ्यावी. ३. एका भांड्यामधे कोलंबी काढुन घ्यावी. त्यात २ चमचे ऑलिव्ह ऑईल, लसुण, हिरवी मिरची, हळद, लाल ति़खट, तंदुरी मसाला, हिंग, लिंबाचा रस व चवीनुसार मिठ टाकुन मिक्स करावे. हि कोलंबी १/२ तास फ्रिजमधे ठेवुन marintae करावी. ४.

पुराणातल्या वांग्याचे भरीत

लेखक पिवळा डांबिस यांनी शुक्रवार, 30/03/2012 02:43 या दिवशी प्रकाशित केले.
कच्चा माल ------------------------------------ ही पाककृती मला आपल्या मिपावरचे मित्र मृत्युंजय यांनी सुचवली आहे. झणझणीत आणि एकदम खमंग अशी ही पाकृ आहे. पुराणांना पाहून नेहमी नाक मुरडणारे विजुभाऊ आणि निळ्याभाऊ हेदेखील आवडीने खातील. मृत्युंजयाचे मनापासून आभार... साहित्यः एक भलंमोठं महाभारताचं वांगं २-३ निवडक कौरव-पांडव (आवडीप्रमाणे कमी-जास्त) २-३ व्यास- वैशंपायन- जनमेजय वगैरे (कोरड्या उपेक्षेने खरपूस भाजून घ्यावेत) एक मध्यम कर्ण (सोलून) एक आख्खा कृष्ण (लीलांसकट) १ नवा येडपट आयडी (खास इन्ग्रेडियंन्ट!!) काड्या - आपा

सूडाची ठिणगी...

लेखक योगप्रभू यांनी शुक्रवार, 30/03/2012 02:14 या दिवशी प्रकाशित केले.
(कृपया कालकुपीत बंदिस्त या कथानकातून कुणीही मस्तकदाह करुन घेऊ नये, अथवा विचित्र अन्वयार्थ शोधू नयेत, अन्यथा मनःस्तापाखेरीज काहीही हाती लागणार नाही.) ................................................................................................................................. एक दीर्घ वळण घेऊन राजरथ इंद्रप्रस्थाच्या बाहेर पडला आणि कुरु राजस्नुषा भानुमतीने अस्वस्थपणे मागे मस्तक टेकले. मोकळ्या वार्‍याची झुळूकही तिला आता सुखावत नव्हती. संतापाने फुललेले तिचे आरक्त नेत्र आता भरुन आले होते. शेजारी बसलेल्या सखी वृषालीने तिची ही अवस्था जाणली.

कुठून येतो आणि असा का पैसा खर्च होतो

लेखक छो.राजन यांनी गुरुवार, 29/03/2012 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
मी गेले १५ वर्ष भारता बाहेर राहत आहे. Ankle ची शस्त्रक्रिया अमेरिकेत करून recover होण्या साठी दादर / पुण्याला ५ महिने राहिलो. वेळ municipal निवडणुका ची होती.रोज पापर वाचून मन चलबिचल व्हायचे. पेपर मदगे रोज १०-१२ लोक कार / मुन्किअप्ल truck च्या धडकेने मरतात आहेत. कुठे तेथे KEM / Saasson हॉस्पिटल मध्ये रोग्या ना साधी उशी सुधा मिळत नाही. पण इकडे माझ्या देश्वासियान कडे खूप पैसा आहे. election ला आणि ब्राष्ट नेत्यान पुन्हा निवडून द्याला. आजून रोज loudspeekar वगेरे वेगळेच. कुठून येतो आणि असा का पैसा खर्च होतो? हीच काय जीवन जगण्याची पद्धत आहे?

वळण

लेखक नपा यांनी गुरुवार, 29/03/2012 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या वळणवर, वळताना नजर गेली इथवरच्या मार्गावरती दिसले माझेच पदचिन्हे स्पष्टपणे कधी योग्य, कधी अयोग्य कधी सन्तुलित तर कधी अनिर्बन्ध भयभीत वा निर्भिड थबकलो क्षणभर, स्वत:बद्दलचे समज गैरसमज धुसर झाले हे तर माझेच प्रतिबिंब.. आज़वरचे ..पण अगदि सत्य शहारलो, किती अनभिज्ञ होतो मी स्वत:ला.. वाट माझी खुणवत होती मन मात्र सुन्न होत् सावरलो, अन् पुन्हा लागलो अव्याहत प्रवासाला पूढच्या वळणावर थबकण्या करता..
काव्यरस

असे शब्द होते.. तसे शब्द होते..!

लेखक रसप यांनी गुरुवार, 29/03/2012 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
असे शब्द होते तसे शब्द होते जसा अर्थ घ्यावा तसे शब्द होते कुणा ना कळावे खरे काय होते असे मुक्त वेडे तुझे शब्द होते श्रवून जाहले ते लिहून घेतले ते जपून ठेवले ते खुळे शब्द होते जगी जाणकार कुणी ही असू दे कविता म्हणाया खुजे शब्द होते प्रतिभेस माझे साष्टांग नमन समजलेच नाही कसे शब्द होते अनुवाद व्हावा जरा इंग्रजीत मराठीत बहुदा न हे शब्द होते ऐकता वाचता जाहलो "आडवा" तरीही उरावर उभे शब्द होते..!! (एक जुनीच कविता) ....रसप.... ०३ जानेवारी २००९ http://www.ranjeetparadkar.com/2009/01/blog-post_03.html
काव्यरस

धरणी माय....

लेखक अमितसांगली यांनी गुरुवार, 29/03/2012 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
कत्तल करुनी वृक्षांची, अनाथ केले भू-मातेला, जंगले बांधूनी सिमेंटची, वाकुल्या दाखविल्या निसर्गाला, चक्र असेच दौडले तर, भविष्यातील पिढी विचारेल, हिरवळ म्हणजे काय.....?? नुसताच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय...?? डोस पाजूनी रासायनिक खतांचे, शोषण केले मातीच्या गुणधर्मांचे हव्यास धरुनी अति -उत्पनांचे, दिवस दाखविले वान्झत्वाचे चक्र असेच दौडले तर, भविष्यातील पिढी विचारेल, सुपीकता म्हणजे काय.....?? नुसताच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय...?? विवस्त्र करुनी निसर्गाला, हिंस्रपणे ओरबाडले वरून धूर काढला तर खालून पाणी उपसले उत्सर्जन करुनी विषारी वायूंचे , ओझोनचे काळीज फाडले चटके देऊ
काव्यरस

इडंबन की जय हो...!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 29/03/2012 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
स्वयंप्रेरणा :- ज्या http://www.misalpav.com/node/21154 या धाग्या वरुन हे गीत स्फुरले, त्या धाग्याचे हे गीत म्हणजे स्वयं-उपशमनच आहे ;-) भगवंता रे भगवंता,खरच सांग.....हे काय झाले? टाकला होता डोसा मग, आम्लेट कसे बाहेर आले?