मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वळण

नपा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आयुष्याच्या वळणवर, वळताना नजर गेली इथवरच्या मार्गावरती दिसले माझेच पदचिन्हे स्पष्टपणे कधी योग्य, कधी अयोग्य कधी सन्तुलित तर कधी अनिर्बन्ध भयभीत वा निर्भिड थबकलो क्षणभर, स्वत:बद्दलचे समज गैरसमज धुसर झाले हे तर माझेच प्रतिबिंब.. आज़वरचे ..पण अगदि सत्य शहारलो, किती अनभिज्ञ होतो मी स्वत:ला.. वाट माझी खुणवत होती मन मात्र सुन्न होत् सावरलो, अन् पुन्हा लागलो अव्याहत प्रवासाला पूढच्या वळणावर थबकण्या करता..

वाचने 2141 वाचनखूण प्रतिक्रिया 6

नपा 29/03/2012 - 20:19
धन्यावाद..!!

निनाद 31/03/2012 - 14:06
छान हे तर माझेच प्रतिबिंब.. आज़वरचे ..पण अगदि सत्य शहारलो, किती अनभिज्ञ होतो मी स्वत:ला.. हे आवडले.

कर्नलतपस्वी 11/06/2025 - 12:55
बरेच काही सांगून जाते. कविता आवडली,पटली.