असे शब्द होते
तसे शब्द होते
जसा अर्थ घ्यावा
तसे शब्द होते
कुणा ना कळावे
खरे काय होते
असे मुक्त वेडे
तुझे शब्द होते
श्रवून जाहले ते
लिहून घेतले ते
जपून ठेवले ते
खुळे शब्द होते
जगी जाणकार
कुणी ही असू दे
कविता म्हणाया
खुजे शब्द होते
प्रतिभेस माझे
साष्टांग नमन
समजलेच नाही
कसे शब्द होते
अनुवाद व्हावा
जरा इंग्रजीत
मराठीत बहुदा
न हे शब्द होते
ऐकता वाचता
जाहलो "आडवा"
तरीही उरावर
उभे शब्द होते..!!
(एक जुनीच कविता)
....रसप....
०३ जानेवारी २००९
http://www.ranjeetparadkar.com/2009/01/blog-post_03.html
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1713
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा...व्वा...व्वा...!
+१
In reply to व्वा...व्वा...व्वा...! by अत्रुप्त आत्मा
छान!
एकंदरीतच अजूनही काही ठिकाणी
In reply to छान! by पैसा
मस्तच
तुझे तेच होते माझे तेच
अरे वाह! एकटाकी का ? मस्तच!!
In reply to तुझे तेच होते माझे तेच by जेनी...
शब्द
छान.