धडकी भरली ना शीर्षक वाचून? हे गाणं आहे 'मेरे ब्रदर की दुल्हन' या अविस्मरणीय चित्रपटातलं. परवा टीव्हीवर हा चित्रपट बघण्याचा योग आला. करण्यासारखे इतर काहीच नव्हते. ते तसेही कधीच नसते. म्हणजे वाटतं खूप, हे करावं, ते करावं, असं केलं तर खूप मजा येईल, तसं केलं तर जिंदगी बदल जायेगी वगैरे वगैरे पण ऐनवेळेस अस्मादिकांचा अवसानघातकी आळस आमच्या आवेशावर अगदी अलगदपणे ओकतो आणि मग आमचा अमूल्य वेळ आम्ही सोफ्यावर लोळत घालवतो. असाच मी आळसावत पडलो होतो आणि टीव्हीवर 'मेरे ब्रदर की दुल्हन' नुकताच सुरु होत असलेला पाहिला. हिट चित्रपट म्हणून बघायला सुरुवात केली. कत्रिनाचा आमच्या धुंद, स्वप्नील डोळ्यांमध्ये चढलेला कैफ हे देखील कारण होतेच.
चित्रपट सुरु होतो इम्रान खानचा लंडनस्थित भाऊ त्याला स्वतःसाठी (म्हणजे लंडनस्थित भावासाठी) बायको शोधण्याची कामगिरी सोपवतो या प्रसंगापासून. म्हणजे साधारण अशा अर्थाची चित्रपटाची सुरुवात आहे. हा भाऊ म्हणजे 'तेरे बिन लादेन' मधला अली जाफर. हाच चित्रपटाचा दिग्दर्शकदेखील आहे.
तर हा 'भाईसाहब' लंडनमध्ये काहीतरी खूप मोठं काम करत असतो. रोजचे कपडे बदलावेत त्याप्रमाणे आपल्या गर्लफ्रेण्ड्स बदलणे हे त्याचा मोठ्ठ्या कामांपैकी एक काम असते. शेवटी आपला भाऊच आपल्यासाठी एक चांगली बायको शोधू शकेल असा त्याला साक्षात्कार होतो आणि ही अवघड कामगिरी तो आपल्या भावावर सोपवतो. इकडे इम्रान सिनेमा क्षेत्रात वगैरे काहीतरी काम करत असतो. आता एवढं जोखमीचं काम अंगावर येऊन पडल्यावर याला काही सुचतयं का? हा हात धूवून भाईसाहबसाठी बायको शोधण्याच्या कामात स्वत:ला अगदी झोकून देतो. मग इम्रानला आणि याच्या टोळभैरव मित्रांना एक आयडिया सुचते. ते सिनेमाच्या पोस्टरसारखे एक पोस्टर तयार करून पेपरमध्ये छापून आणतात. मित्रांना नेहमीप्रमाणेच स्वतःचं आयुष्य, काही कामधंदे नसतातच; त्यामुळे ते २४ तास आपल्या जीवश्च कंठश्च मित्राच्या सेवेत स्वतःला वाहून घेतात. मग काय, खूप प्रपोजल्स येतात. प्रत्येक ठिकाणी इम्रान आणि त्याचे आई-वडील मुलगी बघायला जातात. मुली अत्यंत बाष्कळ प्रश्न विचारतात. एक मुलगी त्याला 'तुझी शिवून देऊ का?' असं विचारते. तो घाबरतो. च्यायला, हा काय प्रकार आहे? कधी फाटली? मग तो विचारतो 'काय'? ती म्हणते 'शर्ट'. तो प्रश्नार्थक चेहर्याने बघतो. ती एक्स्प्लेन करते की तिला शिवण्याचा छंद आहे. अशा उच्च दर्जाचे विनोद पाहून मन थक्क होत होते.
नंतर कंवलजीत इम्रानला फोन करून घरी येण्याची विनंती करतो. स्वत: लग्नाळू असल्याप्रमाणे तो आणि त्याचे आई-वडील जातात. तिथे कत्रिना कैफला बघून इम्रानला झीट येते.
'तुम?'
'तुम?'
असा शंभरदा बघितलेला प्रसंग घडतो आणि मग इम्रानच्या पँटवर अवघड ठिकाणी चहा सांडतो. आलोकनाथछाप गिळगिळीत हसत कंवलजीत कत्रिनाला त्याला आत घेऊन जायला सांगतो. कत्रिना त्याला डाग धुवायला मदत करते आणि मग पुसण्यासाठी नॅपकीन देते. तो मनात 'दाग अच्छे हैं' असे म्हणतही असेल कदाचित. अर्थात, पँट धुतल्याने ती मोक्याच्या ठिकाणी ओली होते हा गडगडाटी हसायला लावणारा विनोद आपल्याला गडबडा लोळायला लावतो. मग दोघे टेरेसवर येतात आणि गेस व्हॉट? कत्रिना इम्रानला एकदम सिगारेट मागते.
'चल निकाल'
आता बोला. एका तरूण आणि सुंदर मुलीने एका तरुण आणि उपाशी मुलाला (त्याने तिच्याकडे आल्यानंतर काही खाण्याच्या आतच हा प्रसंग घडतो) 'चल निकाल' असे म्हटले तर त्याची काय अवस्था होईल? डोळ्यासमोर काजवे चमकतील? माझ्यासारख्यांना आजोबा-पणजोबा आठवतील; वरण-भात आठवेल; गौरी-गणपती आठवतील; 'आमची माती आमची माणसं' आठवेल; पन्हं आणि कोकम सरबत आठवेल...इम्रान निमूटपणे सिगारेट काढून देतो. ती आई-बाप, भाऊ, आणि बघायला आलेले पाहुणे अंगणात बसलेले असतांना निवांत सिगारेट ओढते. सिगारेट ओढल्यानंतर येणारा तोंडाचा वास, हाताचा वास कसा घालवायचा या प्रश्नामुळे कित्येकांची सिगारेट सुटली आहे. जगात हाच एक प्रश्न अजून अनुत्तरित आहे. असं जर काही संशोधन झालं आणि असं जर काही रामबाण प्रोडक्ट बाजारात आलं तर 'अॅपल'च्या आयफोन्सपेक्षा जास्त नफा कमावून ती कंपनी शतकानुशतके बिनबोभाट बिझनेस करेल यात शंका नाही. माझा एक मित्र घरी जातांना सिगारेट ओढतो आणि संशय येऊ नये म्हणून दोन्ही हात (स्वत:च्या) काखेत आणि दिवसभर पायात आणि बुटात घालून घामेजलेल्या सॉक्समध्ये येथेच्छ फिरवतो. यामुळे संशयास्पद वास येत नाही असं त्याचं म्हणणं आहे. हॉल्स, कश्मीरी सौंफ, मेंटॉस हे सगळे संशयित म्हणून आधीच ख्यातकीर्त आहेत. असं करतांना घाण वाटत नाही का या माझ्या प्रश्नावर त्याचं उत्तर होतं की काख आपलीच, पाय आपलेच, बूटही आपलेच आणि सॉक्सही आपलेच; मग त्यात घाण काय वाटायचं? आपल्या सकाळच्या काही सवयींच्या बाबतीत आपले निर्ढावलेपण कदाचित याच स्थितप्रज्ञ वृत्तीतून आले असावे. असो. तर अशी ही बिनधास्त कत्रिना सिगारेट ओढून निवांत खाली येते. इथे फ्लॅशबॅक सुरु होतो.
एक सहल. कत्रिना कैफ मुलींच्या गाडीच्या डिझेलच्या टाकीत साखर टाकते. का? तर मुलींना मुलांच्या बसमध्ये बसता यावे म्हणून. मग जोरदार आरोळी ठोकून ती मुलांच्या बसमध्ये शिरते. घटाघट बिअरचा कॅन रीता केल्यावर 'भारतरत्न' पुरस्काराप्रमाणे ती मुलांना बिअर कॅन्स देते. मुलं पागल होतात. नंतर तंबूत एक मुलगा तिला 'स्पर्श' करतो. ती लगेच भडकून बाहेर येते. 'मैं नये खयालों की हूं इसका मतलब ये नही के मैं किसीके साथ भी सो सकती हूं...' वगैरे फंडे मारून ती बाहेर येऊन बसते. मग इम्रान तिला चहा देतो. ती शांत होते.
नंतर (की आधी?) ती 'धुडकी धुडकी धुडकी लागे' हे गाणं मोठ्या झोकात म्हणते. तिला गाता येतं, तिला गिटार वाजवता येते, सिगारेटी फुंकता येतात, दारू ढोसता येते, भांडणं करता येतात, अगदी कमी कपडे घालून नाचता येतं...असं तिला सगळं काही येत असतं. मग गाणं म्हणत असतांना तिला पोलीस पकडून घेऊन जातात. भगतसिंग जसे हसत-हसत फाशीच्या तख्तापर्यंत गेले असतील तशी ही बया हसत-हसत चेकाळलेल्या पोरांना अभिवादन करत पोलीसांसोबत हातकड्या घालून जाते.
पुन्हा वर्तमानात. इम्रानला ही पोरगी आपल्या भावासाठी पसंत पडते. दारू ढोसून टुन्न होणारी, सिगारेटी फुंकणारी, मनमुराद त्वचादर्शन घडवणारी, अटक होण्यात आनंद मानणारी ही सर्वगुणसंपन्न मुलगी त्याला आपली वहिनी म्हणून अगदी योग्य वाटते. कारण?
'तुम मुझे बहुत ऑनेस्ट लगती हो.'
आम्ही खल्लास. उद्या कोणी रात्री खून करून सकाळी हजर झाला आणि कुणालातरी म्हटला:
"साहेब, तुमच्या बायकोचं आणि माझं झेंगाट होतं. मी तिला माझ्यासोबत पळून जाण्यासाठी खूप समजावून सांगीतलं; ती म्हणायची की तुमची आबाळ होईल. माझी सटकली. काल रात्री तिचा मुडदा पाडला. आपण जे करतो ते प्रामाणिकपणे कबूल करतो. कहा-सुना माफ करना, दिल भी अपना साफ करना. जेलमधून आलो की बसू आँटीच्या बारमध्ये...काय?"
तर साहेबांनी गलबलून त्याला उराशी कवटाळावं. कढत आसवांची दोन टीपं त्याच्या खांद्यावर पडावीत आणि मग साहेबांनीच त्या पश्चात्तापदग्ध सोन्यासारख्या लख्ख माणसाला चहा करून पाजावा.
"भीम्या, तुझ्यासारखा प्रामाणिक माणूस नाही पाहिला. (तुझे उपकार मी कसे फेडू?)"
अशातली बात झाली ही. असो.
मग व्हिडीओ-चॅटींगद्वारे भाईसाहब आपली होणारी बायको बघतात. त्यांना ती आवडते. मग सगाईचा दिवस येतो. इतके दिवस इम्रान आणि कत्रिना (म्हणजे होणारे दीर-वहिनी) मनसोक्त भटकतात. त्यांना कुणीच काही म्हणत नाही. कत्रिनाचं इम्रानला कडकडून भेटणं, अगदी दोघांच्या बॉड्या एक होतील की काय असं भेटणं, कपडे बदलवून त्याला दाखवणं वगैरे जोमात सुरु असतं. कुणालाच काहीच आक्षेप नसतो. रात्री-अपरात्री स्विमींग पूलवर बसून गप्पा ठोकणं, दारू ढोसणं हा कार्यक्रम मस्त सुरु असतो. त्याला ही काही प्रॉब्लेम नसतो. कसा असणार? ती जे काही करते त्यात ऑनेष्टी असते ना!! कोई कर भी क्या सकता हैं? आता इतकं एकमेकांच्यात घुसळल्यावर दुसरं होणार काय हो? मग जसाजसा लग्नाचा दिवस जवळ येतो तसातसा दोघांना साक्षात्कार होतो की दोघांच्या नुसत्या बॉड्याच नाही तर दिल पण एकमेकांच्या घुसळलेत. आता आली का पंचाईत? आता काय करावं?
इम्रानला एक आयडिया सुचते. तो भावाला खूप भांग पाजून त्याच्याकडून त्याच्या आधीच्या गर्लफ्रेंण्डवर त्याचं खूप प्रेम आहे असं वदवून घेतो आणि तिला लंडनवरून ताबडतोब बोलवून घेतो. ती झटक्यात आग्र्याला येते. तिला बघून भाईसाहेबांची तंतरते. मग तो इम्रानकडे येतो. इम्रान म्हणजे आयडियाजची खाणच असतो. इम्रानला पुन्हा एक आयडिया सुचते. तो भाईसाहबला त्याच्या गर्लफ्रेंण्डसोबत पळून जायला सांगतो. शेवटी तो पळून जातो आणि खानदान की इज्जत रखने के लिए इम्रान कत्रिनाशी लग्न करतो आणि हा विनोदपट एकदाचा संपतो!!!
वाचने
14306
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
प्रतिक्रिया
भन्नाट
विश्वरूप दर्शन
ह. ह. पु. वा!
+१००० ह्,ह्,पु.वा
In reply to ह. ह. पु. वा! by स्वैर परी
+१००००
In reply to +१००० ह्,ह्,पु.वा by पियुशा
धम्माल!
__/\__
+१
In reply to __/\__ by सोत्रि
इतके डंब, बिनडोक चित्रपट हे
raging
पटतंय पण साली कैथ्रीना मध्ये
In reply to raging by sagarpdy
आय्ला!
In reply to पटतंय पण साली कैथ्रीना मध्ये by किचेन
मस्त लिहलं आहे.
खुसखुशीत लेखन. सोकाजींप्रमाणे
हा भाऊ म्हणजे
अर्रर्रर्रर्रर्रर्र...मिष्टेक
In reply to हा भाऊ म्हणजे by दिपक
कहर !
काय माहित
In reply to कहर ! by परिकथेतील राजकुमार
अगदी अगदी
In reply to काय माहित by समीरसूर
:)
In reply to अगदी अगदी by परिकथेतील राजकुमार
हा हा हा भन्नाट लिहिलय. परवा
दंडवत...
सुन्दर लिहिलय ....
>>तिचे चित्रपट कसे चालतात देव
In reply to सुन्दर लिहिलय .... by गौरी१२
कैथ्रीना त्यामानाने चांगली
In reply to >>तिचे चित्रपट कसे चालतात देव by किचेन
नुसते सुंदर दिसून चालत नाही
In reply to कैथ्रीना त्यामानाने चांगली by गौरी१२
काय पण ते बाकी कतरिना वर
In reply to नुसते सुंदर दिसून चालत नाही by गवि
गौराक्का, ललिता पवारांचा
In reply to काय पण ते बाकी कतरिना वर by गौरी१२
_/\_
ओ राव.... आजच येक जर्मन युन
एकडाव
In reply to ओ राव.... आजच येक जर्मन युन by वपाडाव
दणदणीत ...
ह.ह.पु.वा.
कतरिनाचे चित्रपट 'फक्त
+१
In reply to कतरिनाचे चित्रपट 'फक्त by प्यारे१
जबराच बरं झालं फुक्टही बघितला
खतरनाक परिक्षण! _/\_
सहहीच, मजा आली. हे धुडकी
मराठी चित्रपटासाठी प्रचंड
प्रश्न प्रचंड आवडला.
In reply to मराठी चित्रपटासाठी प्रचंड by मराठी_माणूस
मराठी माणसे ही अव्वल दर्जाची
In reply to प्रश्न प्रचंड आवडला. by विश्वनाथ मेहेंदळे
अभिमान आपल्याला पण आहे की
In reply to मराठी माणसे ही अव्वल दर्जाची by गौरी१२
इतका बेक्कार आहे होय हा
धुनकी म्हण्जे काय ?
In reply to इतका बेक्कार आहे होय हा by यशोधरा
धुनकी
In reply to धुनकी म्हण्जे काय ? by पुष्करिणी
ओहो...म्हण्जे थोडक्यात वशिकरण
In reply to धुनकी by परिकथेतील राजकुमार
बरोबर आहे
In reply to इतका बेक्कार आहे होय हा by यशोधरा
:)
In reply to बरोबर आहे by समीरसूर
शाहिरांची आठवण
In reply to बरोबर आहे by समीरसूर
>>'बँड बाजा बारात' मधले एक
In reply to बरोबर आहे by समीरसूर
+१
In reply to >>'बँड बाजा बारात' मधले एक by विश्वनाथ मेहेंदळे
जस्त = Quest असा शोध आम्हाला
In reply to बरोबर आहे by समीरसूर
क्या बात है.
मस्त समीक्षा. अफलातून. खो खो
आवडला!
श्या! कसला टुकार शिनेमा
वाचलो.. बरे झाले डालो नाही
खो खो हसवलेत
लैच म्हंजे लैच ब्येक्कार...