Skip to main content

तुमचीच गोष्ट.... बिन नावाची!!

लेखक अमोघ शिंगोर्णीकर यांनी शुक्रवार, 06/07/2012 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण नुकताच संपलेला. सप्टेंबरमधला तो एक दिवस, वेळ सकाळी आठची. "तो" वडाळा स्टेशनवर उभा, आठची पनवेल पकडायला. जसे आपण सगळे इंजिनिअरिंग स्टुडंट्स म्हणवतो, तसाच तो हि नुकताच इंजिनिअरिंग स्टुडंट बनलेला. ट्रॅकजवळील गवताची पाती, नुकताच पडलेल्या उन्हामुळे स्वत:च्या हिरवट-पिवळ्या रंगांच्या दवबिंदूत चकचकीत अविष्कार दाखवित होती. तो फर्स्ट क्लासला उभा. तीन नंबर प्लॅट्फॉर्मवर ८.१० ची अंधेरी पनवेल आली. त्यांच्या समोर लेडीज फर्स्टक्लास आला. "ती" गोरीपान... नाजूक. उभ्या-उभ्याच त्याची नजर तिच्यावर खिळली. अचानक मोबाईलचे सिम ब्लॉक व्हावे तसे झाले. "ती" मात्र स्वत:च्याच धुंदीत.

फॉरेस्ट गंप अन इतर

लेखक शिल्पा ब यांनी शुक्रवार, 06/07/2012 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मिपावर बरंच वैचारीक वादळ घोंघावलं होतं...त्यामुळे हे जरा लाईट कैतरी म्हणुन. आताच नवर्‍याने फॉरेस्ट गंप लावला होता. कितीही वेळा पाहीला तरी नविन काहीतरी आवडत जातं. अगदी निरागस अशा फॉरेस्टच्या आयुष्यात बरंच काय काय होतं...तो त्याला कसा सामोरा जातो. अगदी वेगळा विषय, वेगळी मांडणी अन मुख्य म्हणजे टॉम हॅन्क्सचा अभिनय. तसंच कास्ट अवे सुद्धा. अजुन असे कोणते चित्रपट आहेत जे कितीही वेळा पाहीले तरी आवडतात?

ज्यूलीचे चौघडे

लेखक मन यांनी गुरुवार, 05/07/2012 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
साल १९७५. स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी जन्मलेली पिढी ऐन तारुण्यावस्थेत आलेली. तरुण स्वातंत्र्यसैनिक म्हणून मिरवलेल्यांच्या डोक्यावर हलकीशी चंदेरी रेषा उमटू लागलेली. म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व विचार, समाजमन मागे पडत चाललं तरी अजून पुसलं गेलं नव्हतं. शहरातल्या सर्वसाधारण महाविद्यालयात मुलींचा वावर थोडासा वाढू लागला असला तरी कुणीही अनोळखी भिन्नलिंगी व्यक्तीशी बोलणे म्हणजे अजूनही "जगावेगळी" गोष्ट होती. पोरींशी डायरेक बोलणे हे फिल्मी हिरो नि रोडरोमियोलाच शोभते असा मध्यमवर्गाचा(आणि निम्नमध्यमवर्गाचा) समज. सर्वाधिक संख्येने ह्यांचीच मुले कॉलेजात जात्.श्रीमंतांची संख्या देशातच कमी.

मिंट मॅजीक

लेखक jaypal यांनी गुरुवार, 05/07/2012 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडली, नावा वरुन कळलच असेल या रेसीपीत मिंट (पुदिना) महत्वाचा घटक आहे.

खंड कपारी

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 05/07/2012 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
अभिषेकाचे ओढे नाले वाहुन गेले माघारी शिरी बोडके उरले कातळ हिरवळ सुकली संसारी तळी साचले मुके सरोवर किमया प्रतिबिंबित सारी अगणित लेणी खंड कपारी दिसल्या मजला गाभारी काठ किनारे भिजलेले आकाश पृष्ठ्भर निजलेले रंगात निळ्या लहरींवरती पवनाचे स्पर्श पहुडलेले जड एक कोपरा माझाही काळजात काहुर दडलेले कजळरात्री अंधार नभी चांदणे भ्रमात विखुरलेले .........................अज्ञात
काव्यरस

पिंकी प्रामाणिक

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 05/07/2012 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
पिंकी प्रामाणिक या नावाच्या खेळाडूने सध्या धुमाकुळ घातला आहे. खरे तर त्निने धुमाकुळ घातला आहे म्हणण्यापेक्षा मिडीयाने घटनांना धुमाकुळाचे रूप दिले आहे. खरे तर पिंकी ही भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवून देणार्‍या चमुतील एक खेळाडू. एक भारतीय नागरीक आनि सर्वात मुख्य म्हणजे एक 'माणूस'! तिच्यावर एका महिलेने बलात्काराचा (लग्नाचे वचन देऊन फसवल्याचा) आरोप केला आहे व पिंकी ही स्त्री नसून पुरूष आहे असाही दावा केला आहे. या दाव्याची सत्यता पडताळणे हे कोर्टाचे कामच आहे आणि ते झालेच पाहिजे.

आरसा

लेखक शुचि यांनी गुरुवार, 05/07/2012 02:45 या दिवशी प्रकाशित केले.
"तुला माझ्या प्रेमाची पर्वाच नाही!" - लटक्या रागाने , आपले गोबरे गाल फुगवत या महीन्यात पाचव्यांदा तरी नंदिनी हे उद्गारली. यावेळेस मात्र मी जय्यत तयारीतच होतो. मी उठलो. मेजावरचा तिचा सुबक आरसा घेऊन तिच्याजवळ गेलो आणि आरसा तिला देत मिष्किलपणे म्हणालो - "बाईसाहेब, हा प्रश्न तुम्ही योग्य व्यक्तीला का बरे नाही विचारत? तुझ्या सर्व तक्रारी उपकचेरींना धाडण्याऐवजी, मुख्य कचेरीलाच धाड ना. तुझे सर्व भावनाप्रधान, संवेदनशील मुद्दे हाताळण्यास मला तरी बघ बुवा हीच व्यक्ती योग्य आणि जबाबदार वाटते.