भोजनालय का.......
हंपीला दोन वर्षापूर्वी गेलो होतो. गाडी थांबवताच मन थक्क झाले. या भेटीदरम्यान बरेच म्हणजे खुपच फोटो काढले ते फोटो आणि इतिहास याची सांगड घालून एक भला मोठ्ठा (नेहमीप्रमाणे :-) ) लेख लिहायचे मनात आहेच पण त्या अगोदर एक लक्षात आलेली गोष्ट तुम्हाला सांगायचीय. जे मी लिहीणार आहे ते बरोबर आहे का हे ठरवायचे काम तज्ञांचे आहे. आपले मत मांडायला काय हरकत आहे ? या विचारातून धाडस करून हा उद्योग करत आहे. ( कदाचित हे अगोदरच कोणी सांगितले असल्यास व तसे कळवल्यास हा लेख काढायला हरकत नाही )
आमच्या गाईडने आम्हाला हंपी मधे खूप फिरवले. जवळ जवळ चार दिवस आम्ही त्या भग्न शहरात हिंडत होतो. एका ठिकाणी तो आम्हाला “चला तुम्हाला सैनिक जेथे जेवण करायचे ते ठिकाण तुम्हाला दाखवतो” असे म्हणून घेऊन गेला.
गेल्यावर बघतो तो काय मधे एक छोटा कालवा काढला होता आणि त्याच्या दोन्ही बाजूला दगडात कोरलेले केळीची पाने, वाट्या व ताटे. गाईड म्हणाला “ या कालव्यातून त्या काळी पाणी वहात असे. जेवण झाले की त्या वहात्या पाण्यात हात धुवायचे, उरलेले अन्न त्यात टाकून दिले की झाली स्वच्छता. अजूनही काही पर्यटक, त्यात काही विदेशीही होते, आश्चर्यचकीत होऊन विस्फारलेल्या डोळ्याने ते भोजनालय पहात होते. आमचा गाईडही खूष.
मला शंका आली ज्या राजाच्या पदरी लाखो सैनिकांचे सैन्य होते, त्याच्या शरीररक्षकांसाठी तरी ही व्यवस्था कशी पुरेल ? मी ही शंका त्याला विचारल्यावर त्याने खास सरकारी उत्तर दिले “ मी सरकारी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि त्यात आम्हाला हेच सांगण्यात आलेले आहे, तेच मी तुम्हाला सांगतोय”.
तेवढ्यात एका ठिकाणी माझे लक्ष गेले आणि मी मनात म्हटले अरेच्या या ताटाला उलट्या वाट्य़ा कशाला जोडल्यात ? मी त्याला पुढे जायला सांगितले आणि तेथे थोडा वेळ निरिक्षण केले. फौंड्रीत काम केले असल्यामुळे माझ्या लक्षात आले की ते सगळे Permanent Die Moulding चे साचे असावेत. ज्याप्रमाणे मोल्डींग बॉक्सचे दोन भाग असतात त्याप्रमाणे याचेही होते. जादा रस व हवा वाहून जाण्यासाठी खाचाही मारलेल्या होत्या. एवढेच नाही तर याच्यावर दोन्ही साचे एकामेकांवर बरोबर बसावेत म्हणून Dowels ही आहेत. बहुतेक याच्यात तांब्याची ताटे तयार करत असावेत व ते मोल्ड फोडल्यावर आतील ताट लगेच गार करण्यासाठी त्या वाहत्या पाण्यात टाकत असावेत....
खालील छायाचित्रे बघा आणि सांगा पटते आहे का मी काय म्हणतो आहे ते ......
यात एकही साच्याची जोडी दिसत नाही पण थोडी शोधली तर मला वाटते सापडेल. जरा उत्खनन करायला लागेल. खालच्या पेट्यांची रांग अगोदर टाकतात मग त्यावर वरची पेटी टाकतात व मातीने लिंपतात मग त्यात रस ओततात. थोडे गार झाल्यावर तो साचा परत फोडतात व आतील वस्तू लगेच पाण्यात टाकतात....
थोडक्यात हे भोजनालय नसून एक फौंड्री आहे...... हे पटले तर पुढच्या वेळेस तेथे जाल तेव्हा हेच सांगा....की ही १००० वर्षापूर्वीची Permanent Die फौंड्री आहे...
जयंत कुलकर्णी.

वाचने
13529
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म!
जयंत काका
(गणेशाज्वर बाधीत) सोडून बाकी
In reply to जयंत काका by मी-सौरभ
प्रकार रोचक आहे. इथे शेयर
छान..
+अमर्याद
In reply to छान.. by चिगो
नक्की जाईन हे बघायला
मस्त. पटण्यासारखा
कदाचित प्राचीन कवणे काळी
In reply to मस्त. पटण्यासारखा by यकु
माझ्याही मनात हाच प्रश्न
In reply to कदाचित प्राचीन कवणे काळी by बटाटा चिवडा
कितीही डोकं लावलं तरी हत्तीचे
In reply to माझ्याही मनात हाच प्रश्न by यकु
हम्म.. पटणेबल गवि.. पण खडक
In reply to कितीही डोकं लावलं तरी हत्तीचे by गवि
पोळले असेल म्हणुन हत्ती लंगडी
In reply to मस्त. पटण्यासारखा by यकु
जबरदस्त निरीक्षण...
जबरदस्त निरीक्षण... पटण्यासारखं आहे..
पटलं
मस्त संशोधन. असेच असू शकते.
+++
संशोधन पटले...वेगळ्या वाटेने
मानलं बुवा तुमच्या 'पारखी
बरोबर ! Proud to be a Fdyman
In reply to मानलं बुवा तुमच्या 'पारखी by जोशी 'ले'
लेख आवडला. त्या काळी तांबे,
मानलं बुवा तुमच्या 'पारखी
मानलं बुवा तुमच्या 'पारखी
मानलं बुवा तुमच्या 'पारखी
तो पहिला फोटो वनमानवाची
>तो पहिला फोटो वनमानवाची
In reply to तो पहिला फोटो वनमानवाची by गणपा
धन्यवाद आणि अभिनंदन
अतिशय उत्तम नजर आहे तुमची
सहमत..
उत्तम....
छान!
जयंत कुलकर्णी साहेब उत्सुकता