मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पालखी

चैतन्य दीक्षित · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
पालखी काळाची थांबली एकदा, बदलण्या खांदा भोईयांचा | त्याच क्षणी माझ्या-समोर ती होती, पेटवून ज्योती, अंतरात | पालखी काळाची गेली निघोनिया, ज्योत ठेवोनिया तेवतीच | आता वाट आहे पहायाची फक्त, 'क्षणा'तून मुक्त होण्यासाठी | -चैतन्य

वाचने 2637 वाचनखूण प्रतिक्रिया 9

राघव Tue, 03/06/2012 - 16:53
मस्त लिहिलं आहेस.. क्लास! :) स्वगतः स्साला हा चैतन्य मधूनच असलं भारी लिहून जातो ना की ज्याचं नाव ते.. राघव

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. काव्यप्रेमी, वृत्त गंडले नाही. ६,६,६,४ असं अभंगाचं वृत्त आहे. त्याच क्षणी माझ्या (६) समोर ती होती (६) पेटवून ज्योती (६) अंतरात (४) (माझ्यासमोर हा एकच शब्द आहे, पण वृत्ताच्या हिशोबाने माझ्या-समोर असा लिहिला आहे) धन्यवाद, चैतन्य.

प्रसाद गोडबोले गुरुवार, 10/29/2015 - 20:38
आता वाट आहे पहायाची फक्त, 'क्षणा'तून मुक्त होण्यासाठी |
अप्रतिम ! 'काही निमित्ताने' आज बरेच दिवसांन्नी ही कविता आठवली म्हणुन धागा वर काढत आहे :)