Skip to main content

फक्त धडाडीच्या गुंतवणूकदारांकारिता ! ( केबीआयएल : एक खिडकी ५ दारे )

लेखक तर्री यांनी बुधवार, 11/07/2012 03:02 या दिवशी प्रकाशित केले.
दोस्तांनो , श्री.सदानंद ठाकूर ह्यांच्या एका धाग्यावर मी दिवीस लॅब ची शिफारस केली होती. ( विमेनी त्याला झकास बुच मारले , त्याचा बदला घेण्याचे प्लान सुरु आहेत ) आज दिवीस लॅब १०५० पर्यन पोहोचला आहे . १० % परतावा १ महिन्यात मिळतो आहे. ह्या मध्ये अजुन दम आहेच पण त्याबरोबर एक नवी शिफारस आपल्याला करतो. टायटल मध्येच डिस्लेमर आहे . एक्सिट क्र. १ : धडाडी असेल तरच पुढे वाचा अन्यथा नको. रू .२५० ई.पि.एस. असलेली कंपनी रू. ८०० मध्ये मिळत असेल तर ?

विश्वास

लेखक मराठे यांनी बुधवार, 11/07/2012 02:15 या दिवशी प्रकाशित केले.
सुमेधा रंगपटात आली तरी प्रेक्षागृहात टाळ्यांचा कडकडाट चालूच होता. आज तिच्या नाटकाचा पन्नासावा प्रयोगही हाऊसफुल होता. "एक्सिलंट ! माइंड ब्लोइंग परफॉर्मंस !!' टाळ्या वाजवतच रमेश आत आला. थकल्या चेहर्‍यावरचा मेकप पुसता पुसता आरशातूनच तिनं रमेशकडे पाहिलं. रमेशचा फ्रेश हसरा चेहरा पाहून तिचा सगळा थकवा कुठल्याकुठे पळून जात असे. रमेशचा स्वभावही असाच होता. त्याच्या सहवासात आल्यावर क्षणभरातच तो कोणालाही आपलंस करून घेत असे. रमेश म्हणजे सुमेधाचा जुना मित्र. अगदी कॉलेजमधे असल्यापासून. कॉलेजमेधे त्यांचा मोठा ग्रूप होता. रमेश त्या ग्रूपचा प्राण.

स्त्रीची खरी शत्रु स्त्रीच का?

लेखक मराठमोळा यांनी मंगळवार, 10/07/2012 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्रीची खरी शत्रु स्त्रीच? खरं तर उशीर झालाय पण आम्ही बेंचावर असल्याने रात्र आणि दिवस सारखेच आम्हाला. :) असो या प्रतिसादावरुन इथे मुद्दाम चर्चा घडवत आहे. अर्थात इथे शतकी धाग्याची अपेक्षा न ठेवता फक्त चर्चा अपेक्षित आहे एवढेच. मी तज्ञ नाही, महाविचारी नाही, पण एक सामान्य माणूस आहे. स्त्री ही दुर्लक्षित आहे, पुरुषांच्या अत्याचाराने पिडीत आहे हे कितपत सत्य आहे? आणि आजच्या जगात? प्रत्येक ठिकाणी स्त्रियांना जातीप्रमाणे आरक्षण देणे पटत असले तरी स्त्रिया याचा जातीयवादाप्रमणे दुरुपयोग करत नसाव्यात का?

विक्रमादित्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी मंगळवार, 10/07/2012 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या क्रिकट पंढरीत जन्मलेलं ५ फूट ४ इंच उंचीचं उत्तुंग व्यक्तिमत्त्व. मुंबईचं 'खडूस' क्रिकेट नसानसांत भिनलेला - गार्नर, होल्डिंग, रॉबर्ट्स, मार्शल, लिली सारख्या भयावह बोलर्सच्या नजरेला नजर भिडवून बचावाची अभेद्य तटबंदी उभी करणारा लढवय्या. १९७१ च्या स्वप्नवत सुरुवातीनंतर विल्यम हॅरिस ह्या त्रिनिदादियन गायकाला: It was Gavaskar We real master Just like a wall We couldn't out Gavaskar at all, not at all You know the West Indies couldn't out Gavaskar at all ह्या ओळी लिहिण्यास प्रवृत्त करणारा कलाकार. भारतीय क्रिकेटला जिंकायला शिकवणारा धुरंधर.

घरातल्या भिंतींना...

लेखक अज्ञात यांनी मंगळवार, 10/07/2012 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याच वेळा आपल्या घरातील लहानगे भिंती रंगवतात... त्या रंगवेल्या भिंतींचा कौतुकही कोणाला एवढ नसत किवा त्या कोणाला खराबही वाटत नाही, पण काळाच्या ओघात त्या भिंतींना नवीन रंग दिले जातात आणि त्या नक्षी रंगाच्या पडद्या आड लपल्या जातात... थोडासा प्रयत्न ह्या आठवणी चाळण्याचा... आणि मनाच्या कोपर्यात जिवंत ठेवण्याचा... घरातल्या भिंतींना आता नवीन रंग दिलाय... त्याच्यामागे एक काळ झाकला गेलाय... समोरची हि मोठ्ठी भिंत...
काव्यरस

पारिजातक

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी मंगळवार, 10/07/2012 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
आठवतं तुला? दोन वेगळ्या वाटांवर चालता चालता एका वळणावर आपण अवचित भेटलो होतो तेव्हा तू हातात हात गुंफुन थरथरत्या ओठांनी मला म्हणालीस एकत्र चालायचं का रे? "अगं पण......" पण काय?