Skip to main content

आर. डी. मल्हार !

लेखक मनोज श्रीनिवास जोशी यांनी शनिवार, 21/07/2012 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
एकंदर संगीताचा विचार केल्यास गाणे गाण्यापेक्षा संगीत रचना करायला अधिक “प्रतिभा” लागते असे मला नेहमी वाटते. गायक हा कवी व संगीतकार यांच्या मधला रसिक श्रोत्यांपर्यंत भावना पोहोचवणारा शेवटचा दुवा आहे. पण अनेक वेळा श्रेय नामावली मध्ये गायकाला विशेष स्थान असते आणि कवी व संगीतकार उपेक्षित राहतात. कवीला संगीताची ज्ञान असणे सक्तीचे नाही पण संगीतकारला काव्याची जाण असणे अनिवार्य आहे. तसेच गायकाला संगीताचे ज्ञान असणे हे अनिवार्य असले तरी काव्याची समज आवश्यक नाही. म्हणून चांगले गीत / काव्य “चांगले गाणे “ म्हणून रसिकांसमोर आणण्यात संगीतकार हा महत्वाचा दुवा आहे. तर संगीतकार आ.डी.

ये कैसी चाल ???

लेखक अर्धवटराव यांनी शनिवार, 21/07/2012 02:47 या दिवशी प्रकाशित केले.
चौसष्ट घरांच्या समरांगणी वजीर सर्वात उपद्व्यापी. तो सरळ, तिरका, कसाही चालेल. पण त्याला देखील मर्यादा आहेत. घोड्याप्रमाणे तो अडीच घरं चालु शकत नाहि. आमचे बारामतीकर काका या वजीराचे देखील बाप म्हणावे लागतील. सगळं काहि सुरळीत असताना शेवटच्या बॉलवर अच्यानक गुगली टाकावी आणि फलंदाज काहि कळायच्या आत बाद व्हावा असल्या भयंकर चाली आमचा राजा खेळतो. गेल्या दोन दिवसांपासुन राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमधुन बाहेर पडण्याच्या बातम्या येत होत्या. आजतर "सकाळ" वर राजीनाम्याची बातमी अधिकृतरित्या पब्लीश झाली. निमीत्त होतं मंत्रीमंडळातील दुसर्‍या स्थानाच्या वादाचं.

अरविंद गुप्ता टोयज.कॉम

लेखक सुकामेवा यांनी शनिवार, 21/07/2012 02:35 या दिवशी प्रकाशित केले.
असाच एकदा फिरत असताना एका पुस्तकाच्या प्रदर्शनात गेलो होतो , तिथे माझ्या मुली करता करून पहा हे अरविंद गुप्तांचे पुस्तक घेतले , घरी आल्यावर पुस्तका बरोबर आलेली CD बघत आसताना त्यात त्यांच्या arvindguptatoys .com याचा ऊल्लेख दिसला म्हंटले पाहावे तरी जाऊन आजून काही मजेशीर खेळणी किंवा टाकाउतून टिकाऊ करण्याकरिता काही कल्पना मिळता आहेत का ते. तर पहिल्याच पानावर मराठी हिंदी व इंग्लिश पुस्तकांचा दुवा दिसला म्हणून जाऊन बघतो तर काय ही मोठी यादी होती.

इन्व्हेस्टमेन्ट बँका नक्की काय करतात?

लेखक क्लिंटन यांनी शुक्रवार, 20/07/2012 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. मोदक यांच्या आर्सेलर-मित्तल वरील धाग्यात दोन्ही बाजूंच्या दिमतीला इन्व्हेस्टमेन्ट बँकर्सचा फौजफाटा होता असे म्हटले आहे. आता या इन्व्हेस्टमेन्ट बँका म्हणजे नक्की काय आणि त्या काय करतात, साध्या बँकांपेक्षा त्या कशा वेगळ्या असतात या प्रश्नांची उत्तरे या लेखातून द्यायचा प्रयत्न आहे. कोणत्याही उद्योगाला आपला उद्योग चालवायला पैसे लागतातच. उद्योग चालवायला मालक स्वतःचे पैसे वापरू शकतात किंवा बँकेकडून किंवा अन्य कोणाकडून पैसे उधार घेऊ शकतात. यापैकी मालकांनी स्वतः उद्योगात गुंतवलेल्या पैशाला इक्विटी (equity) म्हणतात तर इतरांकडून उधार घेतलेल्या पैशांना "डेट" (debt) म्हणतात.

व्हायरस हंटर

लेखक हारुन शेख यांनी शुक्रवार, 20/07/2012 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
त्याला विषाणू संशोधनातला 'इंडियाना जोन्स' म्हणतात. टाईम मासिकाने २०११ साली जगातल्या १०० सर्वात प्रभावशाली लोकांमध्ये त्याची निवड केलेली आहे.'स्टॅनफर्ड विश्वविद्यापीठाचे' सन्माननीय प्राध्यापकपद तो भूषवतो. आणि जिथे आधुनिक युगातील प्रगतीचा आणि सुखसुविधांचा गंधही नाही अशा आफ्रिका आणि आशियाच्या घनदाट वर्षावनांमध्ये अत्यंत खडतर परिस्थितीचा सामना करत रक्ताचे नमुने गोळा करत फिरत असतो. तीन वेळा त्याला मलेरियाचा जीवघेणा संसर्ग झालेला आहे. तिसर्या वेळचा संसर्ग तर इतका भयानक होता कि साक्षात मृत्युच्या दारातून तो परत आलाय.

मी आहे!!

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी शुक्रवार, 20/07/2012 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
तुझा निरोप घेऊन तीनदा 'येतो गं' म्हणून जड पावलांनी मी निघालो हळूच माझ्या मागे येऊन खांद्यावर हात ठेऊन म्हणालीस... "मी आहे!" पाठ वळताच भयाण पोकळी जाणवू लागली तुझ्याविना जगाची तसवीर मला भिववू लागली जलतरंगाचा नाद व्हावा असा तुझा आवाज पुन्हा कधी ऐकायला मिळेल असं वाटू लागलं, तेव्हा फोन आलाच तुझा, म्हणालीस... "मी आहे!" घरी आलो, अगतिकपणे बसलो खिडकीत गाडी सुटली असेल का तुझी, असा खिन्न विचार करत श्रावणातला ऊन-पावसाचा खेळ चालला होता बाहेर धावत येऊन तुला भेटण्याची ओढ दाटून आली तुझा मेसेज आलाच, "मी निघालीये रे..." वाटलं कळवावं का तुला, गर्दीत आहे, सार्‍यात आहे...

मी तसाच पुढे निघालो…

लेखक अज्ञात यांनी शुक्रवार, 20/07/2012 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा जवळ काय घडतय, ह्याची जानिव होवुन, काहीच करता येत नाही त्या वेळी अगतीकता जानवते. न मिळालेली उत्तरं सतावतात, त्या वेळी स्वतवर राग काढन्याशिवाय काहीच करु शकत नाही. मग एक मळीभ दाटून येते...
काव्यरस