गेल्या सहा महिन्यांपासून मी माझे डोक्याचे केस थोडे मोठे राखलेले आहेत. एकदम पोनी घालण्याइतके ते मोठे नाहीत पण शर्टच्या कॉलरच्या खाली गेलेले आहेत. ते तसेच अजून कंटाळा येईपर्यंत ठेवण्याची इच्छा आहे.
मी माझ्या डोक्याच्या केसांना अगदी दररोज तेल लावत नाही. आठवड्यातून दोनदा लावतो. एखादे दिवशी किंवा ते केस धुतल्यानंतर कोरडे दिसतात.
आता माझा प्रश्न:
असे कोरडे दिसणारे केस केवळ ओले दिसण्याकरता काय उपाय करावा?
जेल वैगेरे वापरून केस ओले दिसतात पण ते कडक होतात. केस मऊ, उडते ठेवून ओले दिसण्यासाठी काही क्रिम आहे काय? असल्यास ते क्रिम कोणत्या ब्रांडचे आहे? आणि हो, केस ओले म्हणजे तेल लावल्यासारखा चिपचिपा परिणाम अपेक्षीत नाही.
केस कर्तन करणार्या माझ्या कारागीराने मला 'Livon' नावाचे क्रिम घेण्यास सांगितले. ते क्रिम नसून एक लिक्वीड होते. त्याचा उपयोग केस धुतल्यानंतर गुंता न होता विंचरण्यासाठी होतो. थोडावेळ केस ओले दिसतात पण नंतर कोरडे होतातच.
माझ्या काही मित्रांनी केस दररोज धुवावेत, त्यांना दही लावावे, उष्ण टॉवेलची वाफ द्यावी, पाणी मारावे, हार्डनिंग जेल लावावे असले उपाय सांगितलेले आहेत. त्यात एकदोन जणांनी कोणतेसे क्रिमही वापरलेले आहे पण त्यांना नक्की नाव आठवत नाही.
आंतरजालावर तपासले असता त्याने पोमेड वैगेरे सांगितले आहे. ते अंतरराष्ट्रीय उत्पादने आहेत. मला भारतातली काही उत्पादने सांगितलेतर बरे होईल.
Bryletyne नावाचे पांढरे क्रिम मी मागे हौस म्हणून वापरले होते. त्याचा नक्की कोणता परिणाम होतो त्याबाबत मी अनभिज्ञ आहे.
जाणकार बंधू, माता भगीनींनी केस ओले दिसण्याचा उपाय सांगितल्यास माझ्या व्यक्तिमत्वात चांगला बदल दिसण्याची शक्यता आहे.
उपाययोजकांना आधीच धन्यवाद.
वाचने
8079
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
जवळ पाण्याचा स्प्रे ठेवायचा
जबरी
In reply to जवळ पाण्याचा स्प्रे ठेवायचा by पक पक पक
हा...हा
In reply to जवळ पाण्याचा स्प्रे ठेवायचा by पक पक पक
कॉलेजात असताना माझ्या एका
.
:)
विजुभाऊंना विचारा
प्रेषक सुहास.. Tue,
In reply to विजुभाऊंना विचारा by सुहास..
अरे सुहाशा. मला सुद्धा हाच
In reply to प्रेषक सुहास.. Tue, by विजुभाऊ
श्या !
कॉलींग डान्राव
कोकनट नारीयल तेल
हिमानी नवरत्न लाल तेल किंवा
भगवान शंकरांना देखील हाच प्रश्न पडला होता
क ड क !!!
In reply to भगवान शंकरांना देखील हाच प्रश्न पडला होता by ज्ञानोबाचे पैजार
केस रंगवा..उपयोग होतो
..
>>रोज डोक्यावरच्या केसांना
In reply to .. by मी-सौरभ
>> गेल्या सहा महिन्यांपासून
In reply to >>रोज डोक्यावरच्या केसांना by सूड
श्री बटुकनाथ चिवड़ेश्वर यांना
मनी वसे ते चित्ती दिसे