Skip to main content

शिवकल्याणराजा - ११ गाणी निवेदनासहित

लेखक कौन्तेय यांनी बुधवार, 18/07/2012 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
॥ शिवकल्याणराजा ॥ लहानपणापासून कॅसेटवर ऐकत असलेली ही गाणी. शिवचरित्राभोवतीचं सगळं भावविश्व चपखलपणे लघुरूपात उभं करणारी. समर्थ रामदास, वीर सावरकर, कुसुमाग्रज, शंकर वैद्य आदि दिग्गजांच्या रचना, हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत, लताबाईंचा आवाज नि खुद्द बाबासाहेब पुरंद्ऱ्यांच्या आवाजात ओजस्वी निवेदन! आणखी काय पायजे? हे संकलन काही वर्षांपूर्वी सीडी स्वरूपात आल्यावर एक एक गाणं वेगवेगळं ऐकता येत नाही ही बोच बरेच दिवस मनात होती. काल रात्री बैठक मांडून हे काम फ़त्ते केलं. सगळी गाणी अन्य उपकरणांवर सहज ऐकता तर येतीलच, पण आयफ़ोन/पॅड/पॉड सिंकेबलही आहेत.

शुक् शुक्

लेखक आनंद भातखंडे यांनी बुधवार, 18/07/2012 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
“सांजच्याला सूर्य बुडायची येळ आणि धोंडीबाची म्हस अडयची वेळ एकच येनार आणि वरून आज अमोश्या? मागच्या दोन चार टायमाला म्हशीची वीत जगतच न्हवती. कालच पारावर भेटला तवा उगा बोल लावत बसला होता. कुणाचा तरी कोप झालंय, मरीआईला बोकड द्यायला हवा. आणि नेमका मी भेटलो तसं लोटांगण घातलं, म्हनला या खेपेस या. तुमचा हात लागला तर ही वीत नक्की जगलं. आता मी काय द्येव हाय? जायला काय न्हाय पण येताना रातच्याला पंचायीत…. बरं घरी शहरातून पोरगं आलाय … कारभारणीने मस्त मटन केलंया. म्हन्जे रातच्याला परतायलाच हवं” सकाळचा बाजार उरकून घरी जाताना सदुभाऊ सवताशीच बडबडत जात होता. गाव तसं लहानच ५ – ५० घरांच. गाव कसलं मोठा पडाच तो.

मधुची गाडी-एक खाद्यसेवा...!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 18/07/2012 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
ही गाडी आम्च्या एस.पी कॉलेज पोस्ट ऑफिसच्या जवळ आहे,,,हा झाला पत्ता सांगण्याच्या जनरितिचा भाग..पण मधुची गाडी हे एस.पी.पोश्ट हापिसचच एक अंग आहे,इतकी ही गाडी त्या पोश्टं नावच्या मानवी आघाडीत तिथे मिसळलेली असते. अता विस/एक वर्ष होत आली ही गाडी इथे आहे.

राजेश'जी खन्ना उर्फ 'आनन्द'ची कायमची एक्झिट....

लेखक मृगनयनी यांनी बुधवार, 18/07/2012 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
बॉलिवुडचे पहिले सुपरस्टार "राजेश'जी खन्ना" यांचे मुम्बईतील त्यांच्या राहत्या घरी (आशीर्वाद बंगला येथे) वयाच्या ७० व्या वर्षी नुकतेच दु:खद निधन झालेले आहे. कालच रात्री लीलावती हॉस्पिटलमधून त्यांना डिसचार्ज दिला गेला होता. आज सकाळपासून त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक झालेली होती. आज दुपारी १-४५ वाजता काका'ने "जिन्दगी'च्या सुहाना सफर"मधून कायमची एक्झिट घेतली.. :| सर्व पिढ्यांना आवडणार्‍या आपल्या लाडक्या काका'ला भावपूर्ण श्रद्धांजली... ~*~*~*~*~*~ ...

गटारी

लेखक नाना चेंगट यांनी बुधवार, 18/07/2012 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी आज आणि उद्या गटारी ! :) सर्व मिपाकर मित्र आणि मैत्रिणींना गटारीच्या शुभेच्छा आणि प्रेमाची भेट ! :) तुम्हाला जी आवडेल ती यामधून निवडा ! :) शँम्पेन (निवडक चोखंदळांसाठी) व्हिस्कीप्रेमींसाठी मस्ट :) रमप्रेमींनो घ्या !

पाणीवाली बाई!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 18/07/2012 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
त्यावेळी गोरेगाव खरंच एक छोटंसं गाव होतं. गावातले बहुतेक लोक एकमेकांना ओळखायचे. पश्चिमेला ग्रामदैवत अंबाबाईचं देऊळ आहे. त्याला लागूनच, एका बाजूला अ. भि. गोरेगावकर शाळा आणि दुसर्‍या बाजूला केशव गोरे स्मारक ट्रस्टची इमारत. मंदिरात नेहमीच येणं जाणं असल्यामुळे केशव गोरे हे नाव अगदी ओळखीचं आणि आठवणीत फिट्ट बसलेलं. गोरेगाव त्यावेळी समाजवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जायचं. प. बा.

दवबिंदू..!

लेखक वेणू यांनी बुधवार, 18/07/2012 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
मी व्यर्थसा दवबिंदू पानावर गोठलेला, धरणीला जो नकोसा आकाशाने त्यागलेला..! तुज रुपवान भासे, मज भासे, मी अभागी उदास घुसमटतो, थिजतो, बसल्या जागी...! क्षणभंगूर सारे काही जाणतो आपण सारे, देखणे दिसणे फक्त हे जगणे आहे का रे..? पानावर ओल्या ओल्या मी खिन्नसा बसलेला टिपेल का मज कोणी, आशेवर बेतलेला.. मज नाते ना रुचते ना जमते बिलगाया, थिजणे संपून जावे वाटे जन्म नवा घ्यावा! जिथे स्वैर मी असावे अलगद मी रुजावे, अन् माझ्या रुजण्याने जन्म नवे उमलावे.. ही इच्छा अधू आहे ही आसही कोरी कोरी, मज ठाव आहे सारे जन्म, ना कोणी उद्धारी! घे जगून संपतो आहे मी मिथ्या जगलो आहे, इच्छा लपेटून सार्‍या जागीच विरतो आहे! माझ्

प्राँन्स घस्सी / गस्सी

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 18/07/2012 04:14 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: ताजी कोळंबी साफ करून, काळा धागा काढून घेतलेली ३-४ टेस्पून खोवलेला ओला नारळ १ छोटा कांदा बारीक चिरलेला २-३ टेस्पून नारळाचे घट्ट दूध ३-४ लाल सुक्या मिरच्या (आवडीप्रमाणे कमी-जास्त) १ टेस्पून धणे १ टीस्पून जीरे ४ लसूण पाकळ्या १ टीस्पून काळीमिरीपूड (तुम्ही अख्खे मिरे वापरू शकता) १/४ टीस्पून मेथीदाणे १ टेस्पून चिंचेचा कोळ १/३ टीस्पून हळद मीठ चवीनुसार बारीक चिरलेली कोथींबीर .

एक काथ्याकुट कसा असावा?

लेखक मराठमोळा यांनी मंगळवार, 17/07/2012 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, काथ्याकुट - म्हणजे काथ्या कुटणे - काथ्या म्हणजे काय? हे किती जणांना माहित आहे? असो... तर काथ्याकुटात तुम्हाला नक्की काय अपेक्षित आहे हे जाणण्यासाठी हा धागा (कदाचित वांझोटा) काथ्याकुटाचा: पहिला मुद्दा : विषय कसा असावा? तर माझ्या मते हा एखादा ईमेलप्रमाणे असावा..( आलेल्या ईमेलप्रमाणे एका वाक्यातच तो उघडावा की नाही हे सांगणारा) दुसरा मुद्दा: आषय: आषय हा नेहमी विषयाला अनुसरुन असावा. यात प्रेषकाने स्वतःचे विचार नीट आणि मुद्देसूद मांडावेत. यात अधिक आणि उणे दोन्ही बाजू नीट प्रेषकाने मांडावेत. तिसरा मुद्दा: वरील विषयावर प्रेषकाने स्वतःचे विचार मांडावेत.