Skip to main content

वारूळ

लेखक पेशवा यांनी गुरुवार, 19/07/2012 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
पावलांचे मुंगळे निघाले त्या वारुळातील योगी मंत्रामागून मंत्र उसवत राहील तर नागवे होणाऱ्या शरीराची कुठली असेल पोळणारी जात? मांडी घालून म्हणता येतात सहिष्णू शब्दरचना त्याच वेळी निराकार जनावर वेटोळे (? ) घालून रचत असते जहरोत्तम द्वंद्वगीत... सहज मनाच्या गाभाऱ्यातील समईची जखम रुंदावायला लागली की एखादी पालखी हमखास येते भोयांच्या खांद्यावरून अनेक समाप्तीच्या कथा पायउतार होतात पाठ वळवून, ती धून ऐकण्यासाठी देवळे मिटून घेतात शयनगृहाचे दरवाजे असहायपणे हेलकावे घेत राहते बाहेर कडी एक... दोन...

सेन्टी मेन्टी : ती - एक गुणगुण

लेखक सुहास.. यांनी गुरुवार, 19/07/2012 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
,एसडी ( व्हाट अ ग्रेट मॅन ! ) एकदा पंचमदा ( अनादर ग्रेट मॅन ! ) ला म्हणाले होते की " भारतीयांना फावल्या वेळात गाणे गुणगुणायला फार आवडते, तु अशी गाणी बनव जी गुण-गुणता येतील " आणि त्याचा परिणाम....छोटी सी कहानी से, बारिशों के पानीसे...ते....रूठ न जाना तुमसे कहुं तो....पर्यंत दिसून येतो.कधी तरी एकट्याने फिरता-फिरता,बाईकवर, प्रवासात, सिगरेटचा पफ मारता-मारता, एकांतात एखादे गाणे सुचले नसेल तर नवलच !

आवाज साळुंख्यांचा

लेखक जागु यांनी गुरुवार, 19/07/2012 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या आवारात बर्‍याच साळुंख्या येतात. त्यांचे सततचे अस्तित्व जाणवुन देत असतो त्यांचा आवाज. त्यांच्या वेगवेगळ्या परिस्थितीनुसार त्यांचे आवाजही वेगवेगळे ऐकू येत असतात. त्यांचा जेंव्हा चांगला मुड असतो, सर्वसामान्य परिस्थितीत असतात तेंव्हा त्यांचा गोड आवाज ऐकू येतो. त्यांचा एक कर्कश्य आवाज निघतो तो साप दिसल्यावर. ह्या साळुंख्या इतकया शुर असतात की साप कुठे दिसला रे दिसला की सापाला धुडकाउन लावण्यासाठी कर्कश्य आवाज करत अगदी त्याला टोचायला जातात. ह्यांच्या जोडीला एखादा कावळाही असतो. आधीच त्याचा आवाज कर्कश्य असतो त्यात अजुन कर्कश्य आवाज तोही काढतो.

फीस्ट (ऊर्फ फेसबुकचे इनोदी स्टेटस)

लेखक रमताराम यांनी गुरुवार, 19/07/2012 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
आजच चेपुवर एका ग्रुपमधे एका सदस्याने अत्रंगी फेसबुककरांच्या लीलांचा विषय काढला. त्याने (त्याची परवानगी न विचारल्याने नाव देत नाही, पण स्टेटस हा 'ओपन टू आल' मामला असल्याने इथे पेस्टायला हरकत नसावी.) त्याने एका फेक नावाने आलेल्या दीडशहाण्याच्या स्टेटस नोटस ची यादी दिलेली ती अशी. _______________ त्यांची सर्व 'भाशा'वैशिष्ट्यासह साधारण सूची येणेप्रमाणे: १)(भारतीय प्रमाणवेळ ७.२०) : Hy, frends........haw r yoo? gud mornig.. २) (भारतीय प्रमाणवेळ : ८.१०) oopeeth khayla yaa@Kurundwad 3)(भा.प्र.वे. ११.००) chyayla, raaw kantalaa ala raao..yetaaw kaa nadiwar dumbuya? 4)(भा.प्र.वे.

काका आप कहाँ है?

लेखक भिकापाटील यांनी गुरुवार, 19/07/2012 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
धमालपंत बरेच दिवसापासून मिपावरुन गायब आहेत. समस्त भारतीय खरडखेचक आणि खरडफेकक असा नावलौकीक अस्लेला धमाल मुलास आपण एवढ्यात पाहीले आहे का? मिपाच्या नवरत्नापैकी एक असलेले धमालपंत आजकाल मिपावर दिसत नाही. त्यांच्या गैरहजेरीमुळे दरबार सुनासुना झाला आहे. बराच शोध घेवूनही ते आम्हास गवसले नाहीत. तुम्हाला माहीत आहे का? धमालपंत कुठे गेले? धमालकाका तुम्ही जेथे असाल तिथून परत या. आम्ही तुमची वाट पहात आहोत. तुम्हाला कोणीही रागावनार नाही.

कांदासंस्थानाचे चिलखती उत्तर

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी गुरुवार, 19/07/2012 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
कांदा संस्थान, दि. १८ जुलै. - संस्थानात खास भरवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संस्थानाच्याच संशोधन संस्थेत बनवलेल्या चिलखताची चाचणी दाखवण्यात आली. कांदा संस्थान ग्रामपंचायतीतल्या सर्व स्तरातल्या ग्रामस्थांनी या प्रकल्पात सहभाग घेतल्याचे आवर्जून सांगण्यात आले. काय आहे हे चिलखत? ऐकू या संस्थानाच्या संशोधन संस्थेच्या प्रभारी श्रीमती ज्योतीकिरण छेदी यांच्याच शब्दांत. ""असभ्य पुरूषांचा उपद्रव न झालेली स्त्री दाखवा, १०० कांदे मिळवा" या आमच्या योजनेला अतिशय गेल्या वर्षी अतिशय थंडा प्रतिसाद मिळाला म्हणून आम्ही पारितोषिकाचे मूल्य दुपटीने वाढवले. तरीही कोणीही मुलगी, स्त्री समोर आली नाही.