Skip to main content

'आम्ही ऑलिम्पिक बघितले' : लंडन २०१२ तिकीट - फ्रॉड (झोल) वेब साईट

लेखक स्वरालि यांनी शुक्रवार, 03/08/2012 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
लंडन २०१२ ची तिकिटे resale ला ठेवली आहेत असे समजले. दीड वर्षापूर्वी लंडन २०१२ official वेब साईट वर रजिस्टर करूनही (कोणत्याही खेळाचे) तिकीट मिळाले नाही, म्हणून खूप वाईट वाटत होते...आणि रागही येत होता (विशेषतः टीवी वर ऑलिम्पिक खेळ होताना 'रिकाम्या सीट्स' बघून मनात नुसता राग खवळत होता). लंडन मध्ये असूनही एकही ऑलिम्पिक खेळ बघायला न मिळणे म्हणजे काय?

रद्दीवाला -

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 03/08/2012 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
रद्दीवाला "या कविराज"- म्हणून माझे स्वागत करतो त्याच्या पैशानेच मला तो कटिंग चहा पाजत असतो - मला भेटल्यावरती तो आनंदी अन् खुषीत दिसतो माझ्या कवितेच्या रद्दीवर त्याचा धंदा चालू असतो ! एके काळी 'रद्दीवाला' म्हणून ज्याला हिणवत होतो सलाम करुनी मी आता त्याचे जंगी स्वागत करतो - "आभारासह परती"चा कविता-कचरा माझा घेतो रद्दीवाला धंदा करुनी , धंद्यामधुनी 'सोने' घेतो ! कवितांच्या रद्दीने माझ्या, रद्दीवाला झाला 'राव' 'अध्यक्ष'पदी खुर्चीवरती देणगीसाठी त्याचे नाव - व्यासपिठावर बसून हल्ली तो कविसंमेलन गाजवतो समोर सतरंजीवर बसुनी आम्ही टाळ्या वाजवतो !
काव्यरस

वांग मराठवाडीची संघर्षगाथा...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी शुक्रवार, 03/08/2012 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी मी वांग मराठवाडीला भेट देऊन आलो. त्याबद्दल इथे लिहिलं आणि खूप जणांनी जाहिर / वैयक्तिक प्रतिसाद दिले. काही जणांनी नेमके प्रश्न विचारून या सर्वच प्रकरणाबद्दल अधिक जाणून घ्यायची उत्सुकता दाखवली. काही जणांनी प्रत्यक्ष मदत करायच्या दिशेने पाऊल टाकले. सगळ्यांचेच आभार. मनापासून. त्या लेखात मी म्हणलं होतं की माझी माहिती फार तोकडी आहे. आणि म्हणूनच, या संघर्षात, सुरूवातीपासून आघाडीवर असणार्‍या सुनिती सु. र. यांनी लिहिलेला हा लेख इथे देत आहे. त्यावरून अजून बर्‍याच बाबी वाचकांना नीट समजतील अशी आशा आहे.

वांग मराठवाडी... एक (इन प्रोग्रेस) सत्याग्रह! - २

लेखक श्रावण मोडक यांनी शुक्रवार, 03/08/2012 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
या विषयावरचा मूळ धागा बिपिन कार्यकर्ते यांचा आहे. शीर्षक तेच घेऊन भाग दोन असे स्वरूप केले आहे. त्यासाठी त्यांची परवानगी घेतलेली नाही. त्याबद्दल क्षमस्व. काल मंत्रालयात बैठक झाली. पतंगराव कदम आणि रामराजे नाईक-निंबाळकर त्यावेळी होते. माझ्या मंत्रालयीन स्रोतांकडून मी त्या बैठकीसाठीच्या टिपणातील एक कागद मिळवला आहे. तो नुकताच हाती आला. हे एक कोष्टक आहे. जलसंपत्ती खात्याने तयार केलेले. ते जसेच्या तसे खाली देतोय. या संस्थळाच्या प्रत्येक सदस्याने त्या कोष्टकाचा आपापला अन्वयार्थ लावावा, येथे मांडावा. धरणग्रस्तांचे मुद्दे खरे-खोटे ठरवावेत. यानिमित्ताने तुमच्या मनात येणारे प्रश्न येथे उपस्थित करा.

घुमजाव की --

लेखक शकु गोवेकर यांनी शुक्रवार, 03/08/2012 03:19 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लिमध्ये उपोषण करित असलेले माननीय श्री किसन बाबुराव हजारे उर्फ अण्णा यांनी राजकारणात उडी घ्यायचे ठरविले आहे,हे त्यांचे पाउल बरोबर वाट्ते काय? कारण अगदी काल परवा पर्यंत ते व त्यांचा चमु आम्ही राजकारणी लो़कांच्या बरोबर नाही परंतु आमचा लढा फक्त ठरावीक व भ्रष्टाचार विरोधी आहे असे म्हणत होते,अचानक राजकारण बदलले कसे? हे घुम जाव की-- अण्णांबद्दल जनतेला आदर आहे व तोच त्यांनी राहु द्यावा कारण राजकारणी लोकांचे रंग काही काळानंतर बदलु शकतात--

संत तुकाराम व गौतम बुध्द ह्यांवरील पुस्तक खरेदीबद्दल सल्ला.

लेखक pramanik यांनी गुरुवार, 02/08/2012 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
साष्टांग नम्स्कार,,,,,,,,,,,, मला तुकाराम महाराज लीखीत अभंग जसेच्या तसे,मुळ रुपात वाचायचे आहेत.कींवा एखाद्या लेखकाने अर्थ समजवुन सांगितलेले पण तरीही मुळ अभंग लिहलेले असलेले पुस्तक हवे आहे. येथील पुस्तकप्रेमी जनता एखादे नाव सुचवेल का? मला नेहमीच सुचवलेल्या/प्रख्यात वस्तु आवड्तात कारण त्यामागे अनुभव असतो आणि पुस्तकांच्या खासकरुन धार्मिक पुस्तकांच्या बाबतीत ते खुप खरे आहे. त्याचप्रमाणे मी गौतम बुध्द ह्यांच्या शिकवणी सांगणारे पुस्तक शोधत आहे. Teachings of the Buddha by Jack Kornfield ह्यावर शिक्कामोर्तब करणार आहे.मराठीत एखादे गौतम बुध्दांवरचे चांगले पुस्तक आहे का? आगाउ धन्यवाद.

मानवी हक्कांची पायमल्ली ?

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 02/08/2012 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक देशाची एक संस्कृती असते. ती अर्थातच तेथील लोकानी निर्मान केलेले असते भारतात फारफार पूर्वी म्हणे मुक्त संस्कृती होती. त्यामुळेच खजुराहो सारखी अप्रतीम शिल्पे निर्माण होऊ शकली. मात्र परकीय आक्रमणे आल्यापासून ही संस्कृती लोप पावली. इतराना मुक्त वाग म्हणणारी अमेरीका त्यांच्या नागरीकाना मात्र मुक्तपणा देत नाही हीच बातमी पहा ना http://timesofindia.indiatimes.com/world/us/US-couple-arrested-for-stea… बिचार्‍या लोकाना घरी जागा मिळत नसेल .