केरळ भ्रमंती ५ - पेरियार जंगलात निसर्गभ्रमंती
सकाळी सहाला उठुन पटापट आवरुन सगळ्यांनी चहा घेतला. जंगलात तीन तास भटकायला जायचे म्हणजे येताना घामाघुम होणारच तेव्हा दूरदर्शीपणे अंघोळी केल्या नव्हत्याच. साडेसहाला गाडी काढली. पुन्हा एकदा जंगलाच्या प्रवेशद्वारावर तिकिटांची रांग मग तिथुन आंत अडीच-तीन किलोमिटरचा प्रवास मग पुढे एक किलोमिटर पायी चाल असे करत सात वाजुन गेल्यावरच आम्ही वनाविभागाच्या कचेरीत पोचलो. तिथल्या माणसांनी आमची पावती तपासली, सगळ्यांना नजरेखालुन घातलं आणि कुणी लहान मूल बरोबर नसल्याची खात्री करुन घेतली.
मिसळपाव