तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है !
आभाळ भरुन येतं. काळेकुट्ट ढग चहूबाजूंनी घेरुन टाकतात. कधी अचानक हलका वाहणारा वारा उग्र रुप धारण करतो तर कधी स्तब्ध बनून कोंडून टाकतो. वार्याने तोंडावर सगळीकडे पसरलेले काळेभोर केस सावरणारी ती अशीच दिसायची. मग मी हलकेच तिला काहीतरी चिडवायचो. बघता बघता तिचे डोळे भरुन यायचे. कधी कधी शिडकावा पण व्हायचा. माझी त्या शिडकाव्यात भिजायची लगबग पाहून ती खुदकन हसायची. श्रावणात उनपावसाचा खेळ कसा असतो हे तेव्हा मला कळलं. भादव्याचं ऊन अजून लांब होतं. चिंब धारांनी भिजणं चालू होतं.
तिची आणि माझी पहिली भेट सुद्धा पावसातलीच. तसं तिला मी पहात होतो. ती मला पहात होती. कधी तरी एका रस्त्यावर नजर भेट होत होती.
मिसळपाव
अश्याच एका कोणत्या तरी दिवशी 'बघुया काय आहे ते' या विचारानी मी ते पुस्तक उघडलं आणि मग मात्र त्यात गुंगून गेलो.
मग दुसरा दरवाजा उघडण्यासठी तिने पुन्हा अॅक्सेस कंट्रोल पाशी बुब्बुळ दाखवले. ती तिच्या कॅबिनेट मधे दाखल झाली. डॉ. वसुंधरा सुब्रमण्यम वय वर्षे ४३. अविवाहित. ती एम. बी. बी. एस.