Skip to main content

रवा इडली (प्रकार २)

लेखक प्रभाकर पेठकर यांनी सोमवार, 30/07/2012 02:36 या दिवशी प्रकाशित केले.
Rava-Idli साहित्यः जाडा रवा १ वाटी दही १ वाटी मीठ चविनुसार इनो सॉल्ट १ लहान चमचा.(टी स्पून) फोडणी साठी: मोहरी १ लहान चमचा जीरं १ लहान चमचा भिजवलेली चणा डाळ २ मोठे चमचे (टेबल स्पून) उडीदाची डाळ १ मोठा चमचा मिरच्या २-३ बारीक चिरुन कढीलिंबाची पाने ५-६ तेल २ मोठे चमचे. सजावटः जाड किसलेले गाजर ४-५ मोठे चमचे कोथींबिर ४-५ मोठे चमचे तळलेले काजू तुकडा १५-२० (तुकडे) वाफवलेले मटार १/४ वाटी कृती: दह्यात पाणी मिसळून घट्ट ताक करून घ्या. रव्यात हे ताक घालून मिसळा.

ऑलिंपिक उद्घाटन सोहळा....अविस्मरणीय अनुभव

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 30/07/2012 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
लंडन ऑलिंपिक उद्घाटन सोहळा २०१२ - आइल्स ऑफ वंडर आयुष्यात प्रत्यक्षात पाहीलेला मी हा पहिलाच सर्वात मोठ सोहळा, अगदी डोळे दिपून गेले भव्य रोषाणाईने. एक-दीड महिन्यापासून रोज... अगदी न चुकता ऑनलाईन तिकिटे मिळवण्याचा प्रयत्न सुरु होता, खरं तर तिकिटे एखाद्या खेळाची मिळावीत असा कल होता...अशी संधी पुन्हा-पुन्हा मिळणार नव्हती :) लॉन-टेनीसची तिकिटे मिळाली तरीही मन प्रयत्न करायचे सोडायलाच तयार नव्हतं . अचानक..

मेलोड्रामा -गायकीचे शहनशाह - मोहंमद रफी

लेखक चौकटराजा यांनी रविवार, 29/07/2012 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय सिनेमाला आता शंभर वर्षांचा इतिहास आहे व संगीताचे आज चित्रपटातील महत्व तुलनात्मक रित्या कमी झालेले असले तरी संगीत हा भारतीय बोलपटाचा ( टॉकी) एकेकाळी प्राण होता यात शंका नाही. भारतीय बोलपटांच्या विषयात काळाच्या संदर्भाप्रमाणे बदल झाले तसे संगीताच्या शैलीतही.पहिल्या कालखंडात गायक व नट ही भूमिका एकच व्यक्ति करीत असे. त्यामुळे अभिनय यथातथा असला तरी चालेल पण गाता आले पाहिजे अशी अट असे. पु़ढे तांत्रिक प्रगति होऊन पार्श्व गायनाचे युग निर्माण झाले. सैगल, पंकज मलिक, सुरेंद्र, श्याम, यांची जागा तलत महमूद, रफी, मन्ना डे, हेमंतकुमार किशोरकुमार यानी घेतली.

शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 29/07/2012 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
'राजा शिवछत्रपती' हा ग्रंथ म्हणजे मराठी माणसाची अस्मिता. राजा शिवछत्रपती न वाचलेले किमान आमच्या पिढीतले तरी कुणी शोधुन सापडणार नाही. लहानपणी म्हणजे प्राथमिक शाळेत असताना मला बाबासाहेबांची राजा शिवछत्रपती ही व्याख्यानमाला ऐकायची संची मिळाली. पहिल्या पुष्पातच सर्व श्रोते अगदी भारावुन गेले होते. त्यावेळी बाबासाहेबही पन्नाशीत होते. तेजस्वी चेहरा, लकाकणारे डोळे आणि आवेशपूर्ण आवाजाच्या या शिवशाहीराने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन ठेवले होते.

आद्य आंदोलक- गोदाईवा

लेखक खेडूत यांनी रविवार, 29/07/2012 05:03 या दिवशी प्रकाशित केले.
आता अण्णा पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करणार आणि कदाचित नेहमीप्रमाणे ते संपणार किंवा कसे याबद्दल विचार सुरु होते. कारण ‘ नेमेची येतो’ प्रमाणे दर संसद अधिवेशना आधी ते होऊ लागलंय. एकूणच आंदोलनं वगैरे कधी सुरु झाली असावीत? राजेशाहीत तर ते दुर्मिळच. लोकशाही किंवा त्यासदृश राज्य व्यवस्थेतच ते शक्य आहे. असंच एक आंदोलन इंग्लंड मध्ये झालं होतं. ते वेगळं अशासाठी की ते लोकांचं नव्हतं पण लोकांसाठीच होतं. हेच कदाचित पाहिलं आंदोलन असेल.. इंग्लंडवर पण परकीय आक्रमण करून रोमन आणि नंतर जर्मन राजानी राज्य केलं होतं. नंतर अनेक वर्षं राजेशाही सुरु होती. सन दहाशे त्रेचाळीस! अंग्लो-साक्सन राजवटीचा काळ.

शब्द .. शब्द .. शब्द ..

लेखक विदेश यांनी शनिवार, 28/07/2012 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांच थैमान डोक्यातल्या कप्प्यातून घुटमळतात शब्द तेच मनांत कधीपासून - डोकावतात संधी साधत बेटे लेखणीतून घरंगळत पहुडतात कागदावर कविता बनून !
काव्यरस

यात काही तथ्य आहे का?

लेखक नाना चेंगट यांनी शनिवार, 28/07/2012 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी अधुन मधून कुणीतरी काहीतरी माहिती इमेलवर देत असतं. कुठल्या तरी लिंका असतात. काहीतरी अनुमान, निष्कर्ष असतात, काही मजेशीर असतात. काही गंभीर असतात. अशीच एक लिंक नुकतीच मिळाली. वेगवेगळ्या फास्टफुड रेस्टॉरंटबद्दल काही माहिती त्यात दिली आहे. मिपावर अनेक सदस्य या विषयाबद्दल बरेच काही जाणून असतात अशी खात्री आहे. तेव्हा या लिंकमधे असलेल्या माहितीत कितपत तथ्य आहे, याबद्दल विचारावे म्हणून धागा काढला आहे.

प्रबळ सौन्दर्य

लेखक सौरभ उप्स यांनी शनिवार, 28/07/2012 02:17 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/२२३४३ वरील धाग्याला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. प्रबळ ला ट्रबल करत चाललेल्या प्रवासात कही सुन्दर असे फोटोस टिपन्याची संधि मिळाली... खरतर फोटोग्राफी ची आवड जपताना ट्रेकिंग ची आवड कधी लागली कळलच नाही म्हणून ट्रेकिंग चे काही मी काढलेले फोटोस वरच्या धाग्यात स्पा ने टाकले आहेत... मुद्दामून काही ख़ास असे निसर्गाचे फोटोस वेगळ्या धाग्यात टाकत आहे... Camera साधा - sony cybershot DSC-W510 वापरला आहे... १.