मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गर्भातील चिमुकलीचे काही अनुत्तरीत प्रश्न.....

अमितसांगली · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी, प्रेमिकेसाठी घेतो प्रियकर, उंच उंच भरारी, मग सांगा, ताईविना दादा अन मुलीविना पालक, हि कहाणी नाही का अधुरी......... ? बाबांसाठी मुलगी असते स्वप्नातली परी, 'लेकच हवी' हा आग्रह कोणी न धरी, जिवंत स्त्री गर्भाचा जन्मापूर्वी अंत करी, मग सांगा, राक्षसच नांदतो ना यांच्या अंतरी......... ? जन्म घेतला जिच्या पदरी, ती एक मुलगीच, हे हि तो विसरी, वंशाचा दिवा हवा आहे दारी, मग सांगा, फक्त एका मुलासाठी, आणखी किती लेकी धाडणार देवाघरी........ ? मुलगी असते धनाची पेटी, प्रकाश देणारी जीवन ज्योती, मुलींशिवाय समाजाची होईल का हो प्रगती, मग सांगा, कधी मिटणार हि भेदभावाची दरी........ ?

वाचने 2539 वाचनखूण प्रतिक्रिया 9

Hrushikesh 17/03/2012 - 17:38
सुंदर कविता: छानच आहे. तुम्ही एका चांगल्या विषयावर लिहिले आहे. मागे एका परिचित कुटंबाने या मार्गाचा वापर केल्याचे मला कळले आणि तथाकथित पांढरपेशे, मध्यम वर्गीय / ऊच्च मध्यमवर्गीय / वर्ण / जाती यामध्ये सुदूर पसरलेल्या या कॅन्सरची भीषण जाणीव मन पोखरून राहिली.
अमितसांगलि साहेब, खरच विचारकरायला लावणारी कविता समाजात असेहि लोक आहेत जे मुलीना जन्माला येण्याआधीच मारुन टाकतात. हि आपल्या समाजाचि फार मोठी समस्या आहे.शोकांतिका आहे. एका बाजुला देविचि नवरात्र साजरी करायचि व त्याच वेळी त्या देवीचे रुप असणारी मुलगी मारुन टाकयचि अस चालल आहे. खरच अतिशय वाईट वाटत. शिकलेल्या समाजात हे आज ही होत आहे. ह्याचि शरम वाटते मला कि मी असल्या समाजात रहातो म्हणुन.

In reply to by निश

पक पक पक 17/03/2012 - 18:21
समाजात असेहि लोक आहेत जे मुलीना जन्माला येण्याआधीच मारुन टाकतात. म्हण्जे समाजात दोन्ही प्रकारचे लोक आहेत हे आपल्याला मान्य आहे तर. शरम वाटते मला कि मी असल्या समाजात रहातो म्हणुन. त्यात शरम वाटायचे काय कारण ,जिथे चांगले लोक आहेत तिथे वाईट लोक असणारच्..

In reply to by पक पक पक

पक पक पक साहेब, तुमच मत पटल पण.... पण शहाणी हुशार लोक असुनहि मुलींचे अपमॄत्यु व्हायच थांबल नाहि आहे तर वाढत चालले आहेत, असा सरकारि अहवाल सांगतो त्याच काय? उलट आपला देश सुपर पावर च्या दिशेने वाटचाल करत असताना मुलिंचे जन्माला यायच प्रमाण घटत आहे त्याच काय? सरकार ला मुलगा कि मुलगी ठरवणार्‍या चाचण्यांवर बंदि घालावि लागली त्याच काय? आणि एवढ करुनहि त्या राजरोस पणे केल्या जातात त्याच काय?

प्रभाकर पेठकर 17/03/2012 - 19:42
चांगली आहे कविता. ज्यांना कवितेच्या माध्यमातून व्यक्त झालेले विचार पटतात त्यांच्या हृदयाला ती लगेच भिडते. ज्यांना ते विचार पटत नाहीत (किंवा पटवून घ्यायचे नसतात) त्यांच्या हृदयापर्यंत हे विचार पोहोचतच नाहीत. समाज प्रबोधनाची गरज आहे. मुलींशिवाय समाजाची होईल का हो प्रगती, मग सांगा, कधी मिटणार हि भेदभावाची दरी........ ? ह्या ओळी जरा खटकल्या. समाजाच्या प्रगतीसाठी (की वृद्धीसाठी?) जितकी मुलींची गरज आहे तितकीच मुलांचीही गरज आहे. त्यामुळे, मुला-मुलींशिवाय समाजाची होईल का हो प्रगती, मग सांगा, कधी मिटणार हि भेदभावाची दरी........ ? अशा त्या ओळी असायला पाहिजे होत्या. नाहीतर कुणाही एकाच लिंगाची भलामण करून आपण भेदभावालाच खत पाणी घालतो आहोत असे चित्र उभे राहते.
कविता सुंदर ! त्यामागील विचार पण तितकेच सुंदर.. असे विचार करणारी माणसे आता वाढत असल्याने, समाजात आता मुलीचा गर्भातच अंत आता खुप कमी होत आहे. आनंद आहे. जे लोक असे निर्घुन कार्य करतात त्यांना देहदंड देण्यात यावा आणि तो ही एका कन्येकडुन तेंव्हाच पोलिओ जसा भारताने हद्दपार केला तसेच ह्या मनोवृत्तीला पण भारत हद्दपार करु शकेन

शुचि 18/03/2012 - 09:50
सुंदर कविता. पुलेशु. या कवितेवरून मीना अग्रवाल यांची पुढील कविता आठवली. ही कविता कविताकोष.ऑर्ग वरून घेतली आहे. सपने में आई ठुमकती-ठुमकती रुनझुन करती शरमाई, सकुचाई नन्ही-सी परी ! धीरे से बोली माँ के कान में माँ ! तू मुझे जनम तो देती मैं धरती पर आती मुझे देख तू मुस्कुराती, तेरी पीड़ा हरती दादी की गोद में खेलती-मचलती घुटवन चलती, ख़ुशियों से बाबुल की भरती मैं झोली, पर जनम तो देती माँ ! तू जनम तो देती ! मैयाँ-मैयाँ चलती बाबुल के अँगना में डगमग डग धरती, घर के हर कोने में फूलों-सी महकती, घर की अँगनाइयों में रिमझिम बरसती, माँ-बापू की बनती मैं दुलारी, पर जनम तो देती माँ ! तू जनम तो देती ! तोतली बोली में चिड़ियों को बुलाती, दाना चुगाती उनके संग-संग मैं भी चहकती, दादी का भी मन बहलाती, बाबा की मैं कहलाती लाड़ली, पर जनम तो देती माँ ! तू जनम तो देती ! आँगन बुहारती गुड़ियों का ब्याह रचाती बाबुल के खेत पर रोटी पहुँचाती, सबकी आँखों का बनती मैं सितारा, पर जनम तो लेती माँ ! जनम तो लेती ! ऊँचाइयों पर चढ़ती, धारा के साथ-साथ आगे को बढ़ती, तेरे कष्टों को मैं दूर करती, तेरे तन-मन में दूर तक उतरती, जीवन के अभावों को भावों से भरती, तेरे जीवन की बनती मैं आशा, पर जनम तो देती माँ ! तू जनम तो देती ! ओढ़ चुनरिया बनती दुल्हनियाँ अपने भैया की नटखट बहनियाँ, ससुराल जाती तो दोनों कुलों की लाज मैं रखती, देहरी दीपक बन घर को भीतर और बाहर से जगमग मैं करती, सावन में मेहा बन मन-आँगन भिगोती, भैया की कलाई की बनती मैं राखी, बाबुल के तपते तन-मन को देती मैं छाया, पर जनम तो देती माँ ! जनम तो देती ! माँ बनती तो तेरे आँगन को मैं खुशियों से भरती, बापू की आँखों की दृष्टि बनकर रोशनी लुटाती, तेरे आँगन का बिरवा बनकर तेरी बिटिया बनकर माटी को मैं चन्दन बनाती, दुख दूर करती सुख के गीत गाती, तेरे और बापू के बुढ़ापे की लकड़ी बनकर डगमग जीवन का सहारा मैं बनती, उदास मन को देती मैं दिलासा, पर जनम तो लेती मैं जनम तो लेती माँ ! जनम तो देती तू मुझे जनम तो देती !