Skip to main content

तेव्हा येईल अर्थ खरा जगण्याला

लेखक गोंधळी
Published on शुक्रवार, 16/03/2012
कधी करावे भांडण अंधाय्रा दु:खाशी कधी करावे स्वागत आनंदरुपी उजेडाचे कधी भरकटावे बिन्धास विचारांच्या जंगलात कधी उडावे उंच मनाच्या आभाळात कधी सुटावे सुसाट वाय्राच्या जगात कधी यावे पोहुन भावनांच्या समुद्रात कधी बघावे बसुन अनुभवाच्या शाळेत कधी दरवळावे होउन प्रेमाचा सुगंध मग बनावे प्रकाश दिवा होउन शेवटी व्हावे लुप्त मेणासारखे जळुन तेव्हा येईल अर्थ खरा जगण्याला जाताना ही मग खेद नसेही कुठला.
लेखनविषय:

वाचन संख्या 1438
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

मग बनावे प्रकाश दिवा होउन शेवटी व्हावे लुप्त मेणासारखे जळुन तेव्हा येईल अर्थ खरा जगण्याला जाताना ही मग खेद नसेही कुठला..... ---^--- जीवनातला आध्यात्मिक आशावाद अवडला :-)