Skip to main content

ताम्हिणी घाट

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 16/08/2012 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
काल सकाळी ऑफिसमध्ये ध्वजवंदन करून हिंजवडी-माण-घोटावडे-अंबडवेट-पौड मार्गे मुळशी ताम्हिणीत भटकंती करून आलो. त्यादरम्यान टिपलेले काही फोटो. १. चाचिवली गावाजवळून दिसणारा मुळशी जलाशय २. दावडीचे उपकेंद्र ३. मुळशी जलाशय ४.

हिमरंग

लेखक शरद यांनी गुरुवार, 16/08/2012 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
3

सरदार अजितसिंह यांना आदरांजली

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 15/08/2012 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
ajit singh सरदार अजितसिंह यांचा जन्म नवान्शहर तहसिलातील खट्करकलान येथला. जन्मदिवस दिनांक २ फेब्रुवारी १८८१. ज्या कुळात जन्म घेतला ते सिंधु कुल म्हणजे साक्षात क्रांतिचा कल्पवृक्ष. सरदार अजितसिंहांचे वडील सरदार अर्जुनसिंह हे प्रखर राष्ट्रवादी आणि आधुनिक विचारसरणीचे. आपले ईंटर आर्ट्स चे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी शिक्षकाची नोकरी सुरू केली.

माधवनगरचे विठ्ठल मंदिर

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 15/08/2012 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
मोठ्यांच्या छोट्या आठवणी
बालगंधर्व चित्रपट पाहिला आणि बालगंधर्वांच्या माझ्या मनातील आठवणी जाग्या झाल्या. साल असावे १९६२- ६३. सांगलीजवळ माधवनगरची कॉटनमिल प्रसिद्ध होती. तिचे मालक शेठ गंगाधर ल. नातूंना आध्यात्मिक वाचनाचा व श्रवणाचा नाद होता. माझ्या वडिलांचा कापडव्यवसाय कॉटन मिलच्या आश्रयाने होता. माझे वडील अध्यात्मिक मनन व चिंतनात रमणारे असल्याने त्यांची व नातू शेठजींची धंद्याच्या व्यतिरिक्त आध्यात्मिक चर्चेच्या कारणांनी घसट होती.

तेंव्हा आणि आता.....

लेखक डॉ अशोक कुलकर्णी यांनी बुधवार, 15/08/2012 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
* तेंव्हा आणि आता तेंव्हा होती तमन्ना......सरफरोशीची आणि होती इच्छा... शत्रूच्या बाहूतली ताकद आज्मावण्याची आज आहे इच्छा.... दोस्ताच्या सरफरोशीची... आणि जागलीय तमन्ना .... गृहयुद्धाची!! **** तेंव्हा गायलं स्तोत्र... अधमांच्या रक्तानं रंगलेल्या सृजनांनी पूजलेल्या .... स्वतंत्रतेचं आज आहे स्वातंत्र्य.... अधमांना सृजनांच्या रक्तानं रंगण्याचं !! **** तेंव्हा पाहिलं स्वप्न.... रात्रीच्या गर्भातल्या उष:कालाचं आज आहे सावट उष:कालीच आलेल्या काळरात्रीचं !! **** -अशोक

अवचित

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 14/08/2012 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
झुलले मार्दव झरल्या अगणित; झुळझुळल्या पागोळ्या एकांती निश्वासांचे झाले अवचित स्वर गोळा ओठात कुणी पोटात कुणी हृदयात सजविल्या कुणी गंधमय रांगोळ्या अपघातच हे सुखस्वप्नांचे गतकाळाची ही शाळा रे कुणी बांधले झोके विसरुन वास्तवातले धोके,.. वडवानळ झाली पाणी जाळित अंतरातली ज्वाळा पुंकरले बावरले आठवल्या निखार्‍यातल्या वेळा पावलांत घुटमळले भिजलेले मन कातर वय सोळा ..........................अज्ञात
काव्यरस

गृहमंत्री माझा लाडका

लेखक चेतन माने यांनी मंगळवार, 14/08/2012 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
गृहमंत्री माझा लाडका हल्लीच मुंबईत झालेल्या हिंसाचारच्या पार्श्वभूमीवर (भलतीच जागा आठवली!) काही उल्लेखनीय गोष्टींचा इथे उल्लेख करावा वाटतो. वारंवार "कडक कारवाई " मुळे टिकेच लक्ष ठरलेल्या गृहमंत्र्यांनी यावेळेस मात्र हा शब्द वापरणे टाळले त्यामुळे थोड्याफार टीका कमी झाल्यात. दुसरी उल्लेखनीय कामगिरी हि पोलिसांनी बजावली. संयम हा पोलिसांचा उगाचच जनतेने नाकारलेला गुण दिसून आला. पण संयम पाळल्यामुळे बऱ्याच पोलिसांना मार खावा लागला.