पापभीरू
एका वृत्तवाहिनीवर अत्यंत गंभीर चेहरा करून तावातावाने एक वृत्तनिवेदक राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनात सुरु असलेल्या घोटाळ्याबद्दल बोलत होता आणि आयोजनासाठी जबाबदार असलेल्या एका राजकारणी व्यक्ती आणि त्याचे सहकारी-कम्-चमचे यांच्यावर, झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल पुराव्यांसकट आरोपांवर आरोप करत सुटला होता.
दोशी मोहित मर्जर... (भाग १)
"परदेसी परदेसी जाना नही...मुझेऽऽऽ छोडके... मुझे छोडके"
स्वारगेट बस स्ट्यांड्च्या ३ नंबरच्या प्लाट्फार्म वर 'दोशी वडेवाले' या पुण्याच्या दोन नंबरच्या वडापाव सेन्टरच्या मालकाचा; गायधनी दोशीचा नोकिआ १२०० मोबाइल वाजला.
अनोळखी नंबर मोबाईल स्क्रीन वर बघून तो बावचळला. पर्वतीहून तो फोन आला होता.
गायधनी दोशी: "ह्यालो...?"
पलीकडचा आवाज:
"गायधनी, मी मोहित नाइक बोलतोय. एक कर्त्यव्य म्हणुन तुम्हाला कॉल केलाय. उद्या मोहित वडेवाले तुमच्या उपहारग्रूहामधे काम करणार्या सगळ्या पोरांना डबल पगाराची खुल्ली आफर देणार आहे. "
क्लिक! (गायधनीने कॉल कट केला.)
मोहित नाईक: "आयला! काय उमजेनासं झालयं...
प्रबळ ट्रबल
शुक्रवार ची संध्याकाळ फोनाफोन करण्यातच गेली . एका वेळी अनुक्रमे वल्ली, मोदक , आणि किसन शी बोलत होतो, मधेच गणेशा फोन करत होता.
कलावंतीण ट्रेक ठरलेला होता.. पण पावसाळ्यात तो खूपच रिस्की आहे , तेंव्हा तो जमल्यास स्किप करा असे बर्याच जणांनी सांगितले . तेंव्हा हो नाय म्हणता म्हणता ४ पर्याय
डोळ्यासमोर उरले . माहुली, शिवनेरी , लोहगड-विसापूर , आणि प्रबळगड .
शेवटी प्रबळगडावर शिक्का मोर्तब झाले , आणि सर्वांना फोनवून सांगितले. शनिवारी भल्या पहाटे बाईक काढली , सौरभ आलेलाच होता .. मी सौरभ हर्शल आणि सिद्धू असे चौघ निघालो.. किसन पनवेलला भेटणार होता .. गणेशाने आयत्यावेळी टूल्ली दिली .
गणपुले काकू
(जानेवारी २०१२ मध्ये हा लेख लिहिला होता. माझ्या आयुष्यात ज्या माऊलीने अमुलाग्र बदल घडवून आणला त्या गणपुले काकू यांच्या बद्दलच्या भावना या लेखात प्रकट केल्या आहेत.)
काही दिवसांपूर्वी राहुलचा फोन आला होता. म्हणत होता सोमवार, १६ जानेवारी बद्दल कळलं ना??? फेसबुकवर मेल टाकलं आहे. काकूंचा वाढदिवस साजरा करायचा आहे, शुभमंगल हॉलमध्ये, संध्याकाळी ७ ते ९. जरूर ये.पण काकूंना काही बोलू नकोस, त्यांना हे सरप्राईज आहे. मी येतो म्हटलं आणि १६ ला संध्याकाळी कुठलही काम ठेवायचं नाही असं मनाशी पक्कं केलं.
भक्तीची शक्ती?
परवाचा दिवसच साला सुरु झाला तोच बेक्कारपणे.. ऑफीसला जायला निघणार तेवढ्यात फोन आला, " सर, इथून जवळच एक अपघात झालाय. एक बस पलटलीय.." म्हटलं, बोंबला ! आधी किती जखमी, मृत असतील ह्याची भिती. त्यातून मृत असतील तर बॉडीज हलवायला लागतात पटकन, नाहीतर जनक्षोभ, लॉ & ऑर्डर प्रॉब्लम नी काय काय.. मनात हे टेंशन असतांनाच हॉस्पिटलला फोन लावला, उपचारादींची तयारी करुन ठेवा म्हणून.
ह्या धाकधूकीत स्पॉटवर पोचलो. बस घसरुन उलटली होती तो गड्डा जेमेतेम ६-७ फुटांचा असल्याने, सुदैवाने जिवीतहानी झालेली नव्हती. तोपर्यंत लोकांनीही जखमींना इस्पितळात हलवलेले होते.
घोस्ट इफेक्ट ! (Ghost Effect)
सध्या मला माझा कॅमेरा घेउन वेगवेगळे प्रयोग करायचा छंद लागला आहे...
जालावर फोटोग्राफी संबंधी विविध लेख वाचायचे आणि त्याचे जमतील तसे प्रयोग करुन पाहावयाचे...
सध्या जालावर एचडीआर (High dynamic range) फोटोंची धूम चालु आहे... मी सुद्धा यात सामिल व्हायचे ठरवले,मग काय प्रयोग सुरु.
यातला पहिला प्रयोग म्हणजे घोस्ट इफेक्ट ! एचडीआर फोटोग्राफी मधे नको असलेला एक अडथळा...
मी याच अडथळ्याचा वापर करायचे ठरवले.माझा एचडीआर फोटोग्राफी एक प्रयोग थोडासा सफल झाला आहे,पण अजुन हवी तशी लोकेशन किंवा सबजेक्ट सापडला नाही...पुढच्या भागात बहुधा मी एचडीआर फोटो टाकण्याचा प्रयत्न करीन....
तो पर्यंत तुम्ही घोस्ट इफेक्ट पहा.
आहोत तर हे तुम्ही का सांगताय
आजच्या मटामधे (इथे बहुसंख्य विरोधात असतील मटावाचनाबाबत) एक बातमी वाचली.
त्यात चीनमधील लोकांच्या प्रतिक्रिया चायनास्मॅक नावाच्या साइटवर आल्या आहेत. त्यात भारत हा एक गलिच्छ देश असल्याचे म्हटले आहे आणी ह्या गोष्टीच्या पुष्ट्यर्थ त्यांनी काही फोटोही दिलेले आहेत.
त्याची लिंक खाली देत आहे. फोटो प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीवर पहावेत.
मिसळपाव

