Skip to main content

अरेरे...अगग

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 27/07/2012 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
अरेरे आणि अगग हे दोन उद्गार. दोन्हीचे अर्थ वेगळे होतात अरेरे हा शब्द एखाद्याबद्दल सहानभुती दाखवताना वापरला जातो. अरेरे या शब्दाला जोडून आपोआपच बिच्चारा हे शब्द अध्याहृत असतात. एखाद्याची परीस्थिती काळजी वाटण्याजोगी असेल / फारच कणव येण्याजोगी असेल तर अरेरे बिच्चारा च्च्च्च्च्च वाईट झाले हो. असे शब्द येतात. अरेरे.म्हंटल्यानंतर ऐकणार्‍याच्या मनात आपोआपच एक कणव तयार होते. सहानभुती ची मदतीची भावना येते. हताशपणा /आपण काही करू शकत नाही अशी काहिशी हतबलतेची /करुणतेची भावना येते अगग हा शब्द एखाद्या वस्तुचे वर्णन करायला त्या वस्तुची व्याप्ती अफाट असेल तर वापरतात.

प्रदेश

लेखक पेशवा यांनी शुक्रवार, 27/07/2012 03:38 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे हात नाग गळ्याभोवताली सुर-केवड्याचे रान बहरून आले देहवाटेवरी मिठीचा चकवा हरवणे सापडावे नव्याने जीवघेणे सुखाचा बसे काळजास दंश शरीरावरी शरीर ठिणगी सोसणारे विष-वादळानंतर उरे दगडदेह अन मन पिसापरी तरंगणारे चांदणे रमावे असा हा प्रदेश स्पर्शाच्या समेवर निःश्वास सांडणारे -पुर्वप्रकाशित
काव्यरस

मी,मी,मी,म्या,म्याउ!!!

लेखक कवितानागेश यांनी गुरुवार, 26/07/2012 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
मी माऊ. मी फार फार हुशार आहे. आणि मुख्य म्हणजे मी प्रचंड लाडावून ठेवलेली आहे. कुणी म्हणून काय विचारता? मी स्वत: मी इतकी स्वयंपूर्ण आहे की माझे लाड मी स्वत:च करत राहते. सतत मी फक्त माझेच लाड करते आणि माझेच गुणगान गाते.आता ज्यांना मुळात गाणंच समजत नाही त्यांना माझे गाणं बेसूरच वाटतं. जाऊ दे. तसे माझ्या आजूबाजूला अनेक प्रकारचे प्राणी राहतात. पण माझी बातच काही वेगळी. मी काही कुठल्या इतर तुच्छ प्राण्यांकडे लक्ष देत नाही. मी आपली स्वत:च्याच आनंदात मग्न घुर्र घुर्र करत बसते. काही प्राण्यांना कळते काहींना नाही. त्यांना मी पुन्हा तीच घुर्र घुर्र ऐकवते. शेवटी त्यांना मी काय बोलतेय ते कळतेच.

एका म्यानात दोन तलवारी

लेखक आळश्यांचा राजा यांनी गुरुवार, 26/07/2012 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी नऊ वाजता चीफ डिस्ट्रिक्ट मेडीकल ऑफिसर डॉ कर यांचा फोन आला. कलेक्टरांनी उचलला. "गुड मॉर्निंग सर. मला लगेच भेटायचंय, येऊ का?" "गुडमॉर्निंग डॉक्टर. या. काय अर्जंट? " कलेक्टर उत्तरले. "सर मी चाललो तुमच्या जिल्ह्यातून. मी एकही क्षण इथे थांबणार नाही. माझ्यावर काय अ‍ॅक्शन घ्यायची ती घ्या. " उत्तेजित स्वरात डॉक्टर बोलले. कलेक्टर म्हणाले, "लगेच या डॉक्टर. बोलू आपण." ********* कलेक्टरांना आश्चर्य वाटले. डॉ करांना जिल्ह्यात येऊन चारच महिने झाले होते. आल्यापासून त्यांनी कलेक्टरांना कसलीच तोशीस पडू दिली नव्हती. एनआरएचएमचा कोट्यवधी रुपयांचा व्याप सांभाळणे साधी बाब नव्हती.

पैठणचा ताजमहाल

लेखक डॉ अशोक कुलकर्णी यांनी गुरुवार, 26/07/2012 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
पैठणचा ताजमहाल ============== पैठणला कार्यभार घेतला, तेंव्हा स्वागत समारंभारात एका कर्मचा-यानं स्टाफ साठी क्वार्टर्स नसल्याची व्यथा मांडली आणि मी त्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली. मला प्रोमोशन मिळून मी पैठणला आलो होतो. त्या आनंदात मी प्रयत्न करण्याचं आश्वासन देवून टाकलं. हळूहळू हे आश्वासन निभावणं किती कठीण आहे ते कळायला लागलं. पैठणचा सरकारी दवाखाना म्हणजे औरंगाबादच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचं ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र. त्यामुळे ते वैद्यकिय शिक्षण खात्याच्या अखत्यारीत. पण आरोग्य सेवा देत असल्याने आरोग्यसेवा खात्याशी पण संबंध.

डॉक्टर डॉक्टर

लेखक आनंद भातखंडे यांनी गुरुवार, 26/07/2012 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
नेहेमी प्रमाणे ऑफिस मधून उशिरा न येता वेळेवरच आलो …. जरा चेंज म्हणून बरं असतं कधी कधी. थोडा घसा पण दुखत होता. तरल पदार्थाव्यतिरिक्त कुठलीही इतर खाद्य वस्तू घश्याखाली उतरताना आतून चिमटे काढत जात आहे असे वाटत होते. कदाचित आत्ताच गावी जाऊन आल्यामुळे तेथील पाण्याचा त्रास झाला असावा. तेथील पाण्या मध्ये घालून काही द्रव पदार्थ घेतला असल्याचे शल्य घशात डसत असेल असा मौलिक निष्कर्ष माझ्या बायकोने काढला होता. बऱ्याच बाबतीत आमचे जसे एकमत होत नाही ते या बाबतीत देखील झाले नाही हे उघड झाले.

आसाममधील वांशिक हिंसाचार

लेखक आनन्दा यांनी गुरुवार, 26/07/2012 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
एव्हाना बातम्या वाचून सर्वाना कळले असेलच की आसाम मध्ये वांशिक हिंसाचार चालू आहे. गुजरात दंगल १० वर्षानंतर देखील उ:करून काढणार्‍या आपल्या 'जबाबदार' आणि मानवतावादी माध्यमाना याबद्दल बातमी देण्यासही वेळ नाही. बातम्यांमधून असे दिसते की हा हिंसाचार स्थानिक 'बोडो' जमातिचे लोक आणि त्या भागात स्थायिक होणारे मुस्लिम यान्च्यात होत आहे.

हट्ट!

लेखक चैतन्य दीक्षित यांनी गुरुवार, 26/07/2012 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
हट्ट कोणता करू तुजकडे? थिट्या मनाची झेप थिटी फिरून येती मनात इच्छा भेट हवी मज, हवी मिठी | आणि हासुनी ओळखशी तू, देउन जाशी हवे तसे मंतरल्यासम ते क्षण जाता, इच्छांचे त्या पुन्हा पिसे | 'थांब थांब तू, नकोस जाऊ' सांगावेसे तुज वाटे, त्याच क्षणी अन् सभोवताली काजळगहिरे तम दाटे | म्हणून जाशी मिठी छेडुनी झिणिझिणि वलये गात्रात अन् पुढल्या भेटीची होते मनी अनावर सुरुवात | असंख्य वेळा अशी भेटशी मिठीत घेशी हळुवार 'थांबवून ठेवावे तुज' ही इच्छा अपुरी, अनिवार | हट्ट सांग मी करू कोणता? थांबशील जो पुरवाया, थांबशील का अजून थोडी आज एवढे ठरवाया? -चैतन्य दीक्षित
काव्यरस

हिंदू धर्माभिमान्यांसाठी...

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 26/07/2012 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय संस्कृतीच्या रक्षणाचा मक्ता घेतलेल्या संस्था आणि संघटनानी संस्कृतीच्या स्वच्छतेसाठी काही केलेले दिसत नाही. गंगेच्या घाटांवर केल्या जाणार्‍या अंत्यसंस्कारांबद्दल मी बरेच ऐकले होते पण ते फारच सौम्य होते. ते इतके भयानक आहे हे फकत परदेशी लोकांमुळे कळले. कृपया आमीर खानच्या पुढाकाराची वाट बघू नका अधिक काही लिहीण्यासाठी माझ्यापाशी शब्द नाहीत. कमकुवत मनाच्या लोकांनी ही छायाचित्रे पाहू नयेत. http://www.chinasmack.com/2010/pictures/filthy-india-photos-chinese-net…