Skip to main content

घनघन

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 14/09/2012 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
घन मंदावले मन धुंदावले जळ वाकून वाकून ओघळले झाकलेल्या कळा आत ओढाळल्या रंग हिरव्यात दाटल्या ऊन सावल्या झाडपानात सण पळ श्रावण श्रावण अंग अंगणात चाहुली पागोळल्या लवे भरून डोळा कणकण हळवेला एक एकटाच जीव होई खुळा बावळा पापणीची स्थिती आळवावी किती ओठ शब्दांसवे चहु ओर नाचती नागमोडलेली वाट चिंब ओला घळघाट नव्या नवरीचा थाट जणू हीच पावती .........................अज्ञात
काव्यरस

कताई शास्त्र ३

लेखक बापू मामा यांनी शुक्रवार, 14/09/2012 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा आपण कपडे वापरतो तेव्हा आपल्याला माहिती देखिल नसते की त्याला बनवताना किती जणांचे हात लागले आहेत. सर्व प्रथम मान जातो तो बळीराजाला.महाराष्ट्रात कापसाचे पीक विदर्भ, मराठवाडा, खानदेश व माणदेशात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कापूस हे खरीपाचे पीक असून त्याची पेरणी जून -जुलै मध्ये केली जाते. साधारण ९० दिवसात पहिली वेचणी होवून, पुढे ३-४ महिने क्रमाक्रमाने वेचण्या होतात. परदेशात यंत्रांच्या साहाय्याने वेचणी केली जाते. परंतु यंत्रवेचणी पेक्षा हातवेचणीचा कापूस जास्त स्वच्छ असतो, यांत्रिक वेचणीच्या कापसातजास्तट्रॅश(कचरा)असतो.

कताई शास्त्र २

लेखक बापू मामा यांनी शुक्रवार, 14/09/2012 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
सुताचे परत ढोबळमानाने दोन प्रकार आहेत. १) तंतूंना पीळ देऊन केलेले सूत ( स्पन यार्न) , २) सलग तंतू ( फिलॅमेंट यार्न) यातील स्पन यार्न जास्त प्रचलित आहे, कारण छोट्या छोट्या तंतूंना दिलेल्या पिळात हवेच्या पोकळ्या असतात त्यामुळे परिधान करणाऱ्यास सुखद वाटते. कापसापासून निर्मित वस्त्रे देशात तसेच विदेशात जास्त लोकप्रिय आहेत कारण कापसाप्रमाणे गुणधर्म असलेला कोणताही तंतू किंवा कापसाला अद्याप पर्याय मिळालेला नाही. त्यामुळेच कापसाला वस्त्रांचा राजा (King of Textiles) असे संबोधले जाते. आपण मुख्यत्वे कापसाच्या कताईची माहिती घेऊ. सूत निर्मितीत कापसाच्या प्रतीचा सिंहाचा म्हणजे जवळजवळ ८०% वाटा असतो.

घन घुंगूरवाळा आला : पाऊसगाण्यांची फॅनटॅस्टीक ट्रीट!

लेखक योगेश पितळे यांनी गुरुवार, 13/09/2012 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
"घन घुंगूरवाळा आला, कौलावर रुणझूण झाला" मंगेश पाडगावकरांचं पावसावरचं हे गीत टायटल ट्रॅक असणारा "घन घुंगूरवाळा आला" हा नवीन मराठी अल्बम नुकताच मानबिंदू म्युझिक तर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. मंगेश पाडगावकरांबरोबरच लोकशाहीर विठ्ठल उमप आणि तरुण गीतकार सम्राज्ञी आणि वैभव चाळके यांच्या गीतरचना या अल्बममध्ये आहेत.

खरडवह्या.. एक अनमोल ठेवा.

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 13/09/2012 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
हे सर्व लिखाण खरेतर काथ्याकुटात टाकावे, का जनात-मनात तेच कळत नाही. म्हणाले तर ह्यावरती चर्चा होऊ देखील शकेल. पण मंडळाने निर्णय घेतलाच असेल तर त्यावर चर्चा नको म्हणून सरळ जनात-मनात लिहून फक्त भावना मोकळ्या करत आहे.
दिनांक १५/०९/२०१२ रोजी मिसळपाव वरील सर्व सदस्यांच्या खरडवह्या आणि मिपाचा खरडफळा मोकळा केला जाईल. त्यापूर्वी आपल्या खरडवहीत काही महत्त्वाचे असेल तर कृपया त्याची प्रत साठवून ठेवावी.

कताई शास्त्र १

लेखक बापू मामा यांनी गुरुवार, 13/09/2012 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
अन्न ,कपडा, व निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्या पैकी अन्ननिर्मिती ( कृषी तंत्रज्ञान), व गृह अभियांत्रिकी वर बरीच माहिती मराठीत उपलब्ध आहे . परंतु वस्त्रनिर्मिती शास्त्राबद्दल तितकीशी उपलब्ध नाही.

लसुनी मश्रुम आणि बेबी कॉर्न.

लेखक प्रभाकर पेठकर यांनी गुरुवार, 13/09/2012 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
DSC_03880001
साहित्यः बटण मश्रूम १०-१२ नग बेबी कॉर्न १०-१२ नग तेल २ ते ३ मोठे चमचे (टेबल स्पून) लसूण २ ते ३ मोठे चमचे कांदा १ मोठा टोमॅटो १ मध्यम हळद १/२ लहान चमचा ( टी स्पून) तिखट १/२ लहा

बरबटलेले साहित्यक्षेत्र

लेखक Kavita Mahajan यांनी गुरुवार, 13/09/2012 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
अखेर ह.मो. मराठेंना लेखनातून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून अटक झाली. १५,००० रु. च्या जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. एबीपी माझा या चॅनलवर मी या मुद्द्याबाबत बोलले होते, तेव्हा सहसंवादक श्री. सदानंद मोरे म्हणाले होते की,"महाजनताईंचे विचार चांगले आहेत, पण भाबडे आहेत. निवडणुका म्हटलं की हे सारं करावंच लागतं." हे ऐकून काही बोलण्याची संधी मिळाली नाही, कारण ते समारोपाचं बोलले होते.