Skip to main content

रजनी

लेखक शुचि यांनी रविवार, 19/08/2012 03:30 या दिवशी प्रकाशित केले.
खलील जिब्रान यांच्या "नाईट" या लेखातील एका उतार्‍याचे स्वैर रुपांतर - जिने हाती भीतीरुपी तलवार धारण केलेली आहे, मस्तकी चंद्र ल्यालेला आहे आणि नीरव शांततेची वस्त्रे जिने परिधान केलेली आहेत अशी जीवनाच्या गूढर्भी लाखो नेत्रांनी पहाणारी रजनी, नि:शब्द मौनात हजारो कर्णांनी मृत्यूचे भयगीत ऐकते. हे रजनी समस्त कवी, प्रेमिक, गायकांचे विश्रामधाम अशी तू , तुझ्या गर्भात काळोख्या , गूढ सावल्या, आत्मे आणि चित्रविचित्र भासाभासांचा निवास आहे.

एकहार्ट

लेखक संजय क्षीरसागर यांनी रविवार, 19/08/2012 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
सत्य किती सोपंय, किती सहज आहे पाहायचं असेल तर जगात आज एकमेव व्यक्ती आहे, एकहार्ट! कोणताही चमत्कार नाही, सिद्धाच्या लक्षणांचं कोणतंही अवडंबर नाही. तुम्ही दखल घेतली नाही तर लक्षातही येणार नाही इतका साधा एकहार्ट. त्याचं पॉवर ऑफ नाऊ प्रकाशित होऊन अनेक वर्ष झाली. तो भारतात येऊन गेला. इथली आध्यात्मिक बजबजपुरी त्यानं पाहिली, त्याबद्दल अवाक्षर काढलं नाही. अनेक वर्ष त्याच्याकडे कुणाचं लक्षही गेलं नाही. एकदा ओप्रा विनफ्रेनं त्याला टॉक शोला बोलावलं आणि तो प्रकाशात आला. आजही तो इतक्या सादगीनं जगतो की तुम्ही रिसेप्टीव असाल तरच त्याला समजू शकाल.

"प्रे (सावज)" एक थरकापवून टाकणारी विज्ञान कादंबरी

लेखक सागर यांनी शनिवार, 18/08/2012 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकाचे नावः प्रे (सावज) मूळ लेखकः मायकल क्रायटन अनुवादकः प्रमोद जोगळेकर प्रकाशकः मेहता पब्लिशिंग हाऊस किंमत : रु. ३००/- मायकल क्रायटन हे नाव आता मराठी वाचकांना अपरिचित राहिलेले नाहिये. जुरासिक पार्क, लॉस्ट वर्ल्ड, डिस्क्लोजर, काँगो अशा कित्येक कादंबर्‍या मायकेल क्रायटनने लिहिल्या आहेत व त्याच्या कादंबर्‍यांवर बेतलेले हॉलिवूड मधील हे इंग्रजी चित्रपटही अतिशय गाजलेले आहेत. अतिशय थरारक अशी कथानकाची रचना करणारा लेखक म्हणून मायकल क्रायटन सर्वांना परिचित आहेच.

ट्रेक - सुधागड

लेखक स्पा यांनी शनिवार, 18/08/2012 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
अरे तुम्हाला साडेसात सांगितलेले ना.. अजून तू कल्याण लाच आहेस.. कधी घरी जाणार आणि निघणार? माझ डोकच फिरलं होत. मी कसाबसा हापिसातून लवकर कट्लेलो होतो , आणि वेळेत तयार होतो, पण आमच मित्रमंडळ अजून घरीच पोचत होतं , पुण्याची टीम निघाली पण होती खोपोलीत भेटायचं ठरलेल होतं . संध्याकाळी पनवेल किती प्याक असत हे अनुभवाने माहित होत .. आणि आम्हाला पालीला पोचायचं होतं , ८ इकडेच वाजले होते. कस काय होणार होतं .. शेवटी दोघ मित्र एका बाईक वर. आणि मी एकटा माझ्या यमी (माझ्या यामाला मी लाडाने यमी म्हणतो ;) ) सोबत निघालो . रात्री जास्त पळवता पण येत नाही , कसे बसे ९.३० च्या दरम्यान पनवेल च्या पुढे आलो .

आज नेताजी सुभाष यांची ६७ वी पुण्यतिथी

लेखक सर्वसाक्षी यांनी शनिवार, 18/08/2012 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
akherJPG आज नेताजी सुभाशचंद्र बोस यांची ६७वी पुण्यतिथी. सशस्त्र क्रांतिच्या पर्वाचा कळस ठरलेल्या, आझाद हिंद सेनेच्या पराक्रमाने आपल्या ध्येयाच्या अगदी जवळ येउन ठेपलेल्या - मोइरांग येथे येथे १४ एप्रिल १९४४ रोजी तिरंगा फडकावणार्‍या नेताजींना स्वतंत्र हिंदुस्थान पाहायचे भाग्य लाभले नाही. मात्र साम्राज्यावर निर्णायक घाव हा नेताजींच्या आझाद हिंद सेनेचाच होता. नेताजींच्या ६७ व्या स्मृतिदिनी नेताजींना सादर प्रणाम

कोळशाच्या धंद्यात हात काळे!

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 18/08/2012 04:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपले परमप्रिय, महान ज्ञानी, धोरणी, स्वाभिमानी, संयमी, विचारी, द्रष्टे, स्थितप्रज्ञ, थोर पंतप्रधान मनमोहनसिंग हे भ्रष्टाचाराच्या बाबतीत धुतल्या तांदळासारखे, नव्याने पडलेल्या बर्फासारखे वा त्यांच्याच दाढी मिशांप्रमाणे पांढरे शुभ्र आहेत असा एक सार्वत्रिक समज होता.

धर्म आणि हिंसा

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 18/08/2012 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
धारयति इति धर्म: असे म्हणतात. धर्म हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आहे. सर्वव्यापी आहे. पण धर्म आणि पंथ यात आपण गल्लत करतो असे वाटते. पंथ म्हणजे संप्रदाय - हा केवळ आपल्यापुरते पाहणारा असतो. आमचा पंथ मानणारे किंवा इतर अशी जगाची विभागणी पंथवाले करतात. पंथ संकुचित असतो.

वाटतं, जागवावं, कुशीत घ्यावं

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 17/08/2012 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
हळू हळू येतेय बिनपावली तुझ्या खांद्यामागे सकाळ सोनसळी पांढूरल्या तावदानात धीट होत, सूर्य येतोय आत उशीवर बरसताहेत तुझे केस तू अजूनही झोपेतच आहेस! वाटतं, जागवावं, कुशीत घ्यावं सांगितलेलं गुपित, पुन्हा सांगावं बघ, मी सकाळ देतोय तुला हा दिवसही घे, माझ्या फुला! येतील हलत्या पडद्यामागे सूर्याची किरणे फडफडणाऱ्या पापण्यामागे स्वप्नांचे फिरणे झोपेत तुझे स्वप्नांना बिलगणे सुखाचे क्षण आठवून ओठांचे विलगणे वाटतं, जागवावं, कुशीत घ्यावं सांगितलेलं गुपित, पुन्हा सांगावं बघ, मी सकाळ देतोय तुला हा दिवसही घे, माझ्या फुला!