Skip to main content

आझाद मैदान ते बेनगाझी, लिबिया

लेखक हुप्प्या यांनी गुरुवार, 13/09/2012 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी असंख्य धर्मांध मुस्लिमांनी आझाद मैदानावर दंगल सुरु केली, नासधूस, विनयभंग, जाळपोळ, मारहाण वगैरे शांततापूर्ण कार्यक्रम झाले. नंतर त्याबद्दल योग्य ते कवित्वही व्यक्त झाले. ह्या सर्व कार्यक्रमचे स्फूर्तीस्थान काय? थोडक्यात सांगायचे तर (आसाम वा म्यानमार मे) इस्लाम खतरेमे अशी आरोळी कुण्या मुल्ला मौलवीने दिली आणि यथावकाश त्यातून हा विध्वंस स्फुरला. काल लिबियातील बेनगाझीमधे अमेरिकन राजदूताला हालहाल करुन ठार मारण्याचा हलाल कार्यक्रम झाला.

एक साधन - दोन कलाकार - भाग १

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 13/09/2012 08:34 या दिवशी प्रकाशित केले.
दोन वेगवेगळे कलाकार एकाच साधनाचा वापर करुन जेंव्हा कलाकृतींचं निर्माण करतात तेंव्हा माझ्यासारख्या कलेच्या क्षेत्रात अघोर अज्ञानी माणसाचे डोळे दिपुन जातात, अशाच डोळे दिपवणा-या दोन कलाभांडारांना भेट देण्याचा योग गेल्या महिन्यात आला, अतिपरिचयात अवज्ञा होउ नये म्हणुन थोड्या उशीरानं त्या कलाभांडारात काढलेली छायाचित्रं इथं प्रदर्शित करतो आहे. तांत्रिक किंवा इतर माहिती फार नाही, पण पुर्वी गविंबरोबर झालेल्या चर्चेनुसार जाणं येणं आणि खाणं याची माहिती शेवटी दिलेली आहे.

<रडारड>

लेखक पिवळा डांबिस यांनी गुरुवार, 13/09/2012 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
कच्चा माल "ए जपून रे!" "काय जपून? अशीच मजा येते!" "म्हणून काय इतकी तिखट भाषा वापरायची?" "नाही तर काय? ही काय चारोळी आहे का?" "ही चारोळी नाहीये... मात्र तू गुंड आहेस हे नक्की!" "आणि तुम्ही माझे काका" "पुरे! लेखणी चालवताना जास्त तिखटपणा नको, नाही तर फटके देईन मी व्यनितून!" "ब्वॉर्र! राह्यलं! पण तुम्ही जरा अजून नवे धागे काढा ना. मस्त सागुती बनवू नव्या मटणाची." "नक्को... आधीच तू सारखे स्वाक्षरीतून धक्के मारतो आहेस ते काय कळत नाहीयेत का मला?" "हा हा हा" "जरा हळू रे... खूप खट्याळपणा वाढवला आहेस... मला भिती वाटतेय...

बडबड

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 12/09/2012 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
"ए हळू रे!" "काय हळू? अशीच मजा येते!" "म्हणून काय इतकी फास्ट चालवायची?" "नाही तर काय? ही काय बैलगाडी आहे का?" "ही बैलगाडी नाहीये... मात्र तू बैल आहेस हे नक्की!" "आणि तू माझी गाय" "पुरे! बाइक चालवताना जास्त चावटपणा नको, नाही तर चिमटे घेईन मागून!" "ब्वॉर्र! राह्यलं! पण जरा अजून जवळ सरक ना. घट्ट पकडून बस ना." "नक्को... आधीच तू सारखे ब्रेक मारतो आहेस ते काय कळत नाहीये का मला?" "हा हा हा" "जरा हळू रे... खूप स्पीड वाढवला आहेस... मला भिती वाटतेय... वळणावर तरी हळू कर ना. प्लीज!" "काही नाही होत गं... माझा कंट्रोल.................

मला पडलेले काही प्रश्न

लेखक मन यांनी बुधवार, 12/09/2012 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
फार दिवसापासून काही प्रश्न पडलेत बुवा. काही वर्षापूर्वी मिळालेली उत्तरं पुरेशी वाटेनात; आता पुन्हा नव्या दमाच्या गड्यांसमोर, काही जुन्याजाणत्यांसमोर सादर करतोय. . १)पिउन गाडी चालवायला मनाइ आहे अस म्हणताय, मग बीअर बारला पार्कंग स्लॉट कशाला ठेवलेत? २)जगातलं पहिलं घड्याळ जेव्हा बनवलं तेव्हा नक्की किती वाजले होते? म्हणजे सर्वात पहिला "वेळ" कुणी पाहिलाय? ३)जर नियम मोडल्यावर दंड भरावा लागत असेल(आणि तेव्हढच करुन सुट्णार असु, तर ) दंड म्हणजे नियम मोडाण्यची फी नव्हे काय? Tax is fine to be correct, fine is the TAx to be wrong!! ४)आपण "पायामध्ये बूट" घालता, की बूटमध्ये पाय घालता? नक्की काय करता?

साय

लेखक लीलाधर यांनी बुधवार, 12/09/2012 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
साय ताजी ताजी हाय दूधावरची साय, ताजी ताजी हाय दूधावरची साय ! दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ? गोर्‍या गोर्‍या वाहिनीची साईसारखी काया, साईसारखी काया तीची वडरुपी छाया, वडरुपी छायेत करील मातृरुपी माया ! सांग कधी आणतोस अशी वहिनी भाऊराया !! गोर्‍या गोर्‍या वहिनीची वाजत गाजत काढेन वरात, कधी घेउन येशील सांग वहिनीला घरात! वहिनी येता घरी मिळेल ताजी ताजी साय, दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ? ताजी ताजी हाय दूधावरची साय, ताजी ताजी हाय दूधावरची साय ! दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ?

राजांचा गड, गडांचा राजा!

लेखक लई भारी यांनी बुधवार, 12/09/2012 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
कुठून डोक्यात आलं होत काय माहित पण राजगडला जावं अस शुक्रवारी वाटलं. कदाचित आंबोली भ्रमंती नंतर पावसाळी ट्रेकची इच्छा अपुरीच राहिली होती. जळगावच्या पाटलांनी उत्साह दाखवला म्हणून शिराळ्याच्या पाटलांकडून माहितीची विचारणा केली. दोघांनीही पाटीलकीला स्मरून ऐन वेळी ठेंगा दाखवला :D तरीपण जुजबी माहिती मिळाली होती आणि मग मिपा/नेट वर बघितलं तर चिक्कार माहिती होती, ती वाचून तर जायची इच्छा प्रबळ झाली! सकाळी उठून पण तळ्यात-मळ्यातच होत. शेवटी २ पराठे घेतले बांधून आणि म्हटलं एकटा तर एकटा निघू!